Home | Magazine | Madhurima | Suranga Date wrires about kokum sarbat

आमसुलाचं सार

सुरंगा दाते, मुंबई | Update - Jun 12, 2018, 01:00 AM IST

आमसुलाचं सार

 • Suranga Date wrires about kokum sarbat

  बरणीवर सावली पडली
  आणि आमसुला टरकली.
  आता कोणीतरी येणार, आपल्याला नेणार
  आणि आमटी
  नाहीतर कुळथाच्या पिठल्यात
  आपला भविष्यकाळ ठरलेला.
  रातांब्याच्या बनातले बालपण,
  मोहक फिक्कट पांढऱ्या-गुलाबीसर
  गराला कवटाळून काढलेले दिवस,
  आणि मग एके दिवशी इतर
  रातांब्यांच्या सालांबरोबर उन्हात घर.
  पण या वेळी वेगळेच घडले.
  थंड पाण्यात थोड्या वेळ डुंबणे,
  कोणाच्या तरी हाती लागून चुरले जाणे,
  आणि मग
  ते सर्व पाणी गाळून,
  जणू सोमरस असल्यासारखे पातेल्यात.
  थोडे पाणी घालून उकळणे,
  आणि मग एक सुंदर तूप जिऱ्याची
  मीठ मिरची साखर जिरेपूड घालून फोडणी
  आमसुला अगदी हुरळून गेली.
  मग अचानक एका काचेच्या सुंदर ग्लासमध्ये
  पडणे,
  आणि त्याच काचेतून
  स्वप्नात असल्यासारखं
  आपल्या कर्त्याकडे बघून
  कौतुकाने हसणे.
  तसं बघितलं
  तर आमटी, पिठलं आणि सारात विहरणारी
  ती कोकणातली पहिलीच.
  इश्श. कैरी पिठल्यात कोणी घालतं का?

  suranga.date@gmail.com

Trending