आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधुनिक संकल्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाबांनी आईला नवा स्मार्टफोन भेट दिला. तिला त्या मोबाइलमध्ये फक्त फोन करणे आणि आलेला फोन उचलणे इतकेच जमायचे. मग दुसऱ्या दिवशी तिचा मला फोन आला. ती म्हटली की, व्हाॅट्सअॅपवर फोन कसे करतात? सुरुवातीला मला आनंदच झाला की, ती अशा गोष्टीत रस दाखवत आहे. पण मग तिला व्हॉटसअॅप काॅल करण्याची पद्धत सांगायची होती. हे ऐकायला सोपं वाटतंय. पण या गोष्टीला वेळ लागला, एक तास पाच मिनिटे. मी तिला फोन स्पीकरवर घ्यायला सांगितला आणि तिथून सुरू झाला प्रवास. प्ले स्टोअरवर जा, वरच्या पट्टीवर whatsapp टाइप कर ->डाउनलोडवर टच कर - १००% डाउनलोड होऊ दे - > app ओपन कर - >मोबाइल नंबर टाक - >otp मेसेज या app वरून शोध ->परत whatsapp ओपन करून त्यात टाक. पण शेवटी ती ऑनलाइन, chatting, video calling, internet वापरायला शिकली. यातून एक गोष्ट मला कळली की, बऱ्याचशा गृहिणी आहेत ज्या अनेक गोष्टींबाबत कुटुंबातील सदस्यांवर अवलंबून राहतात. जसं की, स्मार्टफोन हाताळणे, कंप्युटर, इंटरनेट चालवणे, बँकेचे व्यवहार, स्कूटी, कार चालवणे व अजून कितीतरी. दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची त्यांना सवयच पडून जाते. म्हणून वेळ आहे आता स्मार्ट बनण्याची, स्वतंत्र होण्याची, थोडासा सास-बहूच्या मालिकांमधून वेळ काढण्याची, बायकांच्या कट्ट्यावर आधुनिक गप्पांची. चला तर मग करा यादी अशा गोष्टींची, आणि घ्या नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच संकल्प. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.


- तेजस्विनी पाटील

बातम्या आणखी आहेत...