आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नोफॉलची मजा लुटायची असेल दिल्लीजवळील या ठिकाणी जाच!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- थंडीच्या दिवसात दोन गोष्टींची आपण वाट पाहत असतो. त्यात एक म्हणजे कधीतरीच हवाहवासा असणारा सुर्यप्रकाश आणि दुसरे म्हणजे स्नोफॉल. मात्र काही जण बर्फबारीचा आनंद लुटू शकत नाहीत कारण त्यासाठी डोंगराळ व पहाडी भागात जावे लागते. ट्रिप प्लानिंग साईट iXiGO.com द्वारे आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांची माहिती देणार आहोत जी दिल्लीपासून जवळ आहेत व तुम्ही त्याची मजा घेऊ शकता.

नैनीताल- दिल्लीपासून 274 किलोमीटर दूर वसलेल्या नैनीतालची बर्फबारी पाहण्यासाठी सगळ्यात परफेक्ट ठिकाण आहे. बर्फबारीबरोबरच आपण नंदादेवीची उंच अशी टेकडीही पाहू शकता. तिथे तुम्ही ट्रेकिंगची मजाही लुटू शकता. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात तुम्ही येथे स्नोफॉल एंजॉय करु शकता.

मनाली- दिल्लीपासून 531 किलोमीटरवर वसलेल्या मनाली शहरातही तुम्ही बर्फबारी एंजॉय करु शकता. डोंगराळ आणि हिरव्यागार झाडांत बर्फबारीचा आनंद घेणे एक वेगळीच फिल देते.

पटनीटॉप- जम्मूपासून 112 किलोमीटर आणि दिल्लीपासून 680 किलोमीटर दूर असलेल्या पटनीटॉप हे पर्यटनस्थळ पर्यटकांत सगळ्यात लोकप्रिय ठिकाण आहे. बर्फाने झाकलेल्या डोंगराळ टेकड्या आणि निसर्गाने नटवलेल्या हिरव्यागार झाडांमुळे तुम्ही मनमुराद आनंद लुटू शकता.

ऑली- उत्तराखंडमधील जोशीमठपासून केवळ 16 किमीवर असलेल्या हे डेस्टिनेशन स्कीईंगसाठी खूपच लोकप्रिय आहे. येथे स्नोफॉलचा आनंद लुटायचा असेल तर डिसेंबरपासून मार्चपर्यंतच्या काळात कधीही जावू शकता. उत्तराखंडमधील हिमालयीन रांगा तुम्ही येथून पाहू शकता. तो एक अदभूत अनुभव असतो.


पहलगाम- नैसर्गिक सुंदरतेचे पहलगाम हे एक प्रतिक आहे. दिल्लीपासून 800 किलोमीटरवर वसलेल्या या ठिकाणापासून हिमालयाच्या रांगा आणि बर्फाने झाकलेल्या डोंगराळ टेकड्या पाहण्यास सर्वोत्तम ठिकाण ठरते. निसर्गाचे पांढरेशुभ्र सौदर्य पाहायचे असेल तर पहलगामला नक्कीच जावून या.

कुफरी- सिमल्यातील हे हिल स्टेशन थंडीच्या महिन्यात जबरदस्त असे सुंदर दिसते. डोंगराळ भागात सर्वत्र बर्फच बर्फ पाहण्याचा आनंद घेऊ शकता. स्नोफॉलसाठी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कुफरीत फिरायला जा.

गुलमर्ग- स्नो पाहण्यासाठी गुलमर्ग भारतातील पॅराडाइज़ ठरते. स्कीईंगसाठी प्रसिद्ध असलेल्या गुलमर्ग दिल्लीपासून 880 किलोमीटर लांब आहे. तसेच श्रीनगरपासून गुलमर्गला तुम्ही सहज जावू शकता. हिवाळ्यात स्पोर्ट्ससाठी गुलमर्ग भारतातील सर्वांत लोकप्रिय ठिकाण आहे. आशियातील स्कीईंग डेस्टिनेशन्मध्ये गुलमर्ग 7 व्या नंबरवर आहे.


धनोल्टी- दिल्लीपासून फक्त 220 किमीवर धनोल्टी स्नो अनुभवण्यासाठी सगळ्यात चांगले ठिकाण बनू शकते. हळू-हळू पडणारे बर्फ सगळीकडे पसरत जाते. त्यावेळी असे वाटते की, पांढरे कारपेट तुमच्यापुढे येत आहे.

सिमला- लोकांनी सगळ्यात जास्त पसंत केलेले हिल स्टेशन शिमला थंडीच्या काळातही तुम्हाला निराश करणार नाही. दिल्लीपासून 370 किमीवर असलेल्या सिमल्यात जगभरातील पर्यटक थंडी अनुभवण्यासाठी येतात. बर्फबारीबरोबरच तुम्ही आईस स्केटिंगची मजा लुटू शकता.

कसोनी- दिल्लीपासून 380 किमीवर असलेले कसौनीची बर्फाळ हवा तुम्हाला मनमुराद आनंद देते. नैसर्गिक सौंदर्य थंडीच्या काळात खुलायला लागते. बर्फांनी झाकोळलेला हिमालयाच्या टेकड्या तुम्ही येथूनही पाहू शकता.

जर तुम्ही स्नोफॉलची मजा लुटण्याचा विचार करीत असाल किंवा ट्रिप प्लान करीत असाल www.divyamarathi/travel वर आणि blog.ixigo.comवर अधिक माहिती मिळवू शकता.