आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदाच्या हंगामात या साहसी क्रीडा प्रकारांचा लुटा मनमुराद आनंद!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आयुष्याचा आनंद लुटण्यासाठी काहीतरी फन अथवा एडवेंचर करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे मजाही येते व त्या आठवणीही मनावर कायम कोरल्या जातात. iXiGO.com ट्रिप प्लानिंग वेबसाइटने अशाच काही ठिकाणांची यादी दिली आहे. जेथे गेल्यावर तुम्ही एडवेंचर स्पोर्ट्सचा मनमुराद आनंद घेतल्याशिवाय राहणार नाही.

गुलमर्ग- तुम्ही या ठिकाणी स्कीईंग, स्लेजिंग, स्कीबॉबिंग आणि हेलीस्कीईंगचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.

जोधपुर- सॅंड ड्यून कॅंपिंग, डेज़र्ट सफारी, कॅमल कॅप्स, एलीफंट सफारी, फ्लाइंग फॉक्स, डर्ट बायकिंग आणि माउंटेनियरिंगची मजा लुटायची असेल तर तुम्हाला जोधपुरचा वाळवंट हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे.

ऑली- लॅंड ऑफ गॉड्सच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या ऑली हे ठिकाण स्कीईंगसाठी जगातील सर्वोत्तमपैकी एक आहे. स्नोफॉलच्या वेळी ट्रॅकिंग आणि स्कीईंगची आनंद लुटू शकता.

धोलधर- पांढ-याशुभ्र डोंगरात चमचमणा-या धोलधर शहरात आइस क्लायम्बिंग, माउंटेनियरिंग, ट्रॅकिंग आणि लेक ट्रॅक्स यासारखे स्पोर्ट्स एडवेंचरची आपण संधी गमावणार नाही.

जेसलमेर- वाळूच्या डोंगरासाठी प्रसिद्ध असलेले जेसलमेर शहराला गोल्डन सिटी म्हटले जाते. येथे आपण थारच्या वाळवंटात सॅण्ड ड्यून सफारी, जीप सफारी, हॉट एअर बलूनिंग, कॅमल सफारी आणि पॅराग्लायडिंग यासारखे एडवेंचरची मजा लुटू शकता.

गोवा- समुद्र किनारे आणि वेगाने वाहणा-या वा-यासोबत विंड सर्फिंग, स्कूबा डायविंग, वॉटर स्कीईंग, बीच पॅरासेलिंग आणि वॉटर स्कूटर यासारख्या एडवेंचरचा थरार पाहायचा व अनुभवयाचा असेल तर आपण गोव्याची निव़ड करु शकता. समुद्रकिनारी एडवेंचरची आवड असणा-यांसाठी गोवा परफेक्ट जागा आहे.

पेरियार वाइल्डलाइफ सेंचुरी- सर्व बाजूंनी कार्डमम हिल्सची हिरवळीने बहरलेल्या ही सेंचुरी आपण केरळजवळ असल्याचे जाणवते. येथे हायकिंग, बायकिंग, ट्रॅकिंग आणि कॅंपिंगची मज़ा घेऊ शकता.

ताजपूर- पश्चिम बंगालमधील तेजपूरचे वैशिष्टय म्हणजे सुंदर दृश्य आणि कमी गर्दीचे समुद्र बीच आहेत. जेथे पॅराग्लायडिंग, राफ्टिंग आणि रॉक क्लायम्बिंगसारखे साहसी खेळ खेळू शकता.

शिलाँग- स्कूबा डायविंग, कायाकिंग, ट्रॅकिंग, माउंटेन बायकिंग, कॅम्पिंग आणि रिव्हर कॅनोयन्ग हे प्रकार शिलाँगमध्ये खास आहेत. नॉर्थ-ईस्टजवळ पर्यटन स्थळांना नैसर्गिक सुंदरता विपूल प्रमाणात असून, ती तुम्हाला मनमोहक वाटते.

अंदमान- समुद्राच्या निळ्या पाण्यात डुबक्या मारण्याची मनात इच्छा असेल तर तुम्ही या 'ऑफबीट डेस्टिनेशन'ला जरुर भेट द्या. स्नोरकेलिंग, स्कूबा डायविंग, ट्रॅकिंग, हायकिंग, पॅरासेलिंग, वाटरस्कीईंग आणि विंडसर्फिंग येथील साहसी खेळ लोकप्रिय आहेत. याचबरोबर समुद्रात डुबक्या मारणे आणि अंदमानचे सौंदर्य न्याहाळायलाही तुम्हाला मजा येईल.


जर तुम्हाला यंदाच्या हंगामात साहसी क्रीडा प्रकारांची मजा लुटण्याचे तुमच्या डोक्यात असेल किंवा ट्रिप प्लान करीत असाल www.divyamarathi/travel वर आणि blog.ixigo.comवर अधिक माहिती मिळवू शकता.