आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या उन्‍हाळयात खास महिलांसाठी ट्रिपचे आयोजन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- पूर्वी महिला किंवा मुलींना सहलीला जाणे म्‍हणजे एखाद्या लग्‍न समारंभ, धार्मिक कार्यक्रम किंवा नातेवाईकांकडे फिरायला जाण्‍यापर्यंत मर्यादित होते. पण आता या ट्रेंडमध्‍ये बदल झाल्‍याचे दिसत आहे. dainikbhaskar.com आणि ixigo.comने तुमच्‍यासाठी आणले आहे या ट्रेंडबाबत काही खास माहिती.

आता प्रत्‍येक वयाच्‍या महिला आणि मुली ग्रुप बनवून वेगवेगळया पर्यटन स्‍थळांना भेटी देताना दिसतात. इतकेच काय आता तर अँडवहेंचर ट्रॅव्‍हल्‍स, सांस्‍कृतिक भ्रमण, लक्‍जरी ट्रॅव्‍हलिंगकडे महिलांचा भर जास्‍त असल्‍याचे दिसून येते. त्‍यांना कोणत्‍या पुरूष गाईडची गरज भासत नाही. ते स्‍वत:च सर्व अभ्‍यास, संशोधन करून सहलीला निघत आहेत. त्‍यांना आता चांगलेच माहित आहे कधी, कोठे आणि कोणाशी कशापद्धतीने वागले पाहिजे.

नॅशनल जियोग्राफिकच्‍या ख्‍यातनाम लेखिका संपादक मेरीबेथ बॉंड यांच्‍या मते 59 टक्‍के ट्रॅव्‍हल एजंटांना वाटते की गेल्‍या दशकात एकटयाने फिरणा-या महिलांच्‍या संख्‍येत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. एकटयाने फिरणा-यांच्‍या संख्‍येत महिलांचे प्रमाणे 73 टक्‍के आहे. शिवाय फक्‍त महिलांसाठी बनलेल्‍या ट्रॅव्‍हल कंपन्‍यांच्‍या व्‍यवसायात सहा वर्षांत 230 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

भारतात महिलांसाठी फिरण्‍याच्‍या जागा मोठयाप्रमाणात आहेत. चेरापुंजी, हंपी, कुर्ग, अंदमान, ओरछा, सिक्किम, लडाख आणि याप्रमाणे अनेक ठिकाणांची महिला निवड करतात, असे संशोधनातून दिसून आले आहे.

हा ट्रेंड पाहून वुमन ट्रॅव्‍हल्‍स ग्रुप्‍स आकर्षक पॅकेजस घेऊन आले आहेत. या पॅकेजस मध्‍ये लडाख, केरळ, काश्‍मीर, पुर्वोत्तर भारत, कैलास मानसरोवर याठिकाणी सहलीचे आयोजन केले आहे. WOW क्‍लबने जुलैसाठी ल्‍हासा आणि एव्‍हरेस्‍ट सहलीचे आयोजन केल्‍याची घोषणा केली आहे. याशिवाय आणखी टूर पॅकेजस तुम्‍ही खालील वेबसाईटवर पाहू शकता.


जर तुम्‍हीही फिरण्‍याचे शौकिन असाल तर करा आपली बॅगपॅक आणि निघा संपूर्ण महिलांच्‍या फन ट्रिपला. ट्रॅव्‍हल्‍स संबंधित अधिक माहिती मिळवण्‍यासाठी क्लिक करा www.bhaskar.com/travel/