आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत आणि संगीत जुने कनेक्‍शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संगीताचे मुळं आपल्‍या प्राचीन सभ्‍येतत सापडतात. भारताला शास्‍त्रीय संगीताचे जनक म्‍हटले जाते. अनेक नामी संगीतकार भारतातून पुढे आलेत. भारतातील वाद्यही अनोखे असे राहिले आहेत. वेळेबरोबर सतार, तानपुरा, सारंगी सारखी वाद्ये आपली ओळख हरवून बसले आहेत.

ixigo.com आणि dainikbhaskar.com घेऊन येत आहे अशाच प्राचीन वाद्यांची ऐतिहासिक माहिती. आपल्‍याला संधी आहे अशा वाद्यांना ऐकण्‍याची आणि त्‍यांना जाणून घेण्‍याची की भारतीय संस्‍कृतीमध्‍ये किती रंग आहेत.

सादर आहे तीन असे वाद्य जे वाराणसी, कच्‍छ आणि हिमालयीन क्षेत्रात सापडले आहेत. आणि त्‍यांचा उल्‍लेख भारताच्‍या प्राचीन वाद्यामध्‍ये केला जातो. ते पुढीलप्रमाणे आहेत-

रूद्र वीणा- अकबरच्‍या महालाची ओळख

अकबरसारख्‍या राजाच्‍या महालात या वाद्याचा आवाज सतत घुमत असत. बांबू किंवा लाकडाच्‍या साहाय्याने बनवलेल्‍या या वाद्यामध्‍ये तारांच्‍या माध्‍यमातून सूर निघत असत. भारतीय शास्‍त्रीय संगीतात ध्रुपदमध्‍ये याचा उपयोग होत होता. जर इतिहासात डोकावून पाहिले तर ध्रुपद आणि रूद्र वीणा वैदिक काळापासून लोकप्रिय होते. रूद्र वीणेला आजही तारेच्‍या यंत्राची जननी म्‍हटले जाते.

काळानुसार संगीत आणि त्‍याच्‍या गरजा जशा बदलत गेल्‍या, त्‍याप्रमाणे रूद्र वीणाची आवश्‍यकता बदलत्‍या संगीताबरोबर संपुष्‍टात येऊ लागली. सद्यस्थितीत फक्‍त 5 असे लोक आहेत ज्‍यांनी रूद्र वीणा संस्‍कृती जपून ठेवली आहे. रूद्र वीणाचे कार्यक्रम आता भारतात खूप कमी झाले आहेत. मात्र, आजही वाराणसीच्‍या धुप्रद जत्रेसारख्‍या ठिकाणी याचे सादरीकरण पाहता येते.