आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tourism In Puducherry, Paradise Beach, Travel Destinations In India

TRAVEL: बघा पॉंडेचेरीच्‍या धरतीवर फ्रान्‍सचे अप्रतिम सौंदर्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रशासीत प्रदेश म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या पुडुचेरी राज्‍याची राजधानी पॉंडेचेरी हे शहर. या शहराला काही लोक पुडुचेरी या नावानेही ओळखतात. हे शहर छोटे असले तरी इथले सौंदर्य डोळे दिपवणारे आहे. भारत स्‍वतंत्र होण्‍यापूर्वी हे शहर फ्रेंच लोकांच्या ताब्‍यात होते.
पुडुचेरी राज्‍याचा ताबा मिळविण्‍यापूर्वी या शहरावर डच आणि पोर्तुगीजांचा अंमल होता. जास्‍त काळ फ्रेंचांच्‍या ताब्‍यात हे शहर असल्‍यामूळे या शहरात फ्रान्‍स संस्‍कृतीचा प्रभाव आजही पहायला मिळतो. इथली संस्कृती आजही टिकून असल्‍यामूळे पर्यंटकांना कसलाही त्रास होत नाही. पॉंडेचेरी जगभरातील पर्यंटन स्‍थळांपैकी एक आदर्श स्‍थळ म्‍हणून ओळखले जाते.
भारतामध्‍ये व्‍यापारासाठी 340 वर्षापूर्वी( इ.स.1670) फ्रेंच आले होते. या दोन शतकामध्‍ये 'पुडुचेरी' हे राज्‍य इंग्रज, डच आणि फ्रेंच यांच्‍या ताब्‍यात होते. भारताच्‍या या प्रदेशावर आपला ताबा मिळविण्‍यासाठी इंग्रज, डच, फ्रेंच आपापसात लढत होते. शेवटी हे शहर फ्रेंचांच्‍या ताब्‍यात आले. भारताला स्‍वातंत्र्य मिळाल्‍यानंतर 1954 मध्‍ये फ्रेंचांनी पुडुचेरी सोडले.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या, पुडुचेरीचा इतिहास