आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगेची न ऐकलेली रोचक गोष्ट, पवित्रतेपासून अपवित्रतेपर्यंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिमालयाच्या पश्चिमेकडून एका आवाज ऐकायला येतो. पर्वतांना धडकण्याचा, दगड वाहण्याचा, बर्फाच्या फुटण्याचा आणि नंतर पाण्याचा जंगलातून वाहण्याचा. या अवजड आवाजाचे केंद्र आहे गंगा. ही नदी सुमारे ४० कोटी लोकांची लाईफलाईन आहे. या नदीला आईचा दर्जा देण्यात आला आहे. नंदा देवी, त्रिशूल, कामेत आणि इतर पर्वतांमधील बर्फ विरघळल्याने गंगा नदी तयार झाली आहे.

गंगा नदीचे जेथे उगमस्थान आहे, तेथे नदीचे पाणी निळेशार दिसते. त्यानंतर पाण्याचा रंग हिरवा आणि नंतर गडद हिरवा होतो. त्यानंतर नदीच्या पाण्याचा रंग तपकिरी आणि गडद तपकिरी होतो. त्यामुळे हीच गंगा नदी आहे, याचा आभास नष्ट झालेला असतो. ixigo.com आणि divyamarathi.com संयुक्तपणे घेऊन आले आहेत, गंगा नदीशी संबंधित काही रोचक माहिती.

गंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेली यात्रेची प्रमुख ठिकाणे
गंगोत्री- उगमस्थान
हरिद्वार- गंगोत्रीपासून सुमारे २५० किलोमीटरचा प्रवास केल्यावर गंगा हरिद्वारला पोहोचते.
कानपूर, कनौज- हरिद्वारपासून सुमारे ८०० किलोमीटरचा प्रवास केल्यावर गंगा येथे पोहोचते.
इलाहाबादपासून पूर्वेकडील भारत- येथे गंगेत तामसा, घागरा, आणि कोसी या नद्या येऊन मिळतात.
ही नदी पश्चिम बंगालमधून जात कोलकत्यात हुगळी नदीला मिळते.
त्यापुढे वाहत बांगलादेशमध्ये जाते.

पर्यटनामुळे झालेले नुकसान
हिमालयापासून पुढे गंगा हरिद्वारला येते. येथे सुमारे २५ हजार पर्यटक दररोज गंगेचे दर्शन घेतात. धार्मिक कार्यक्रम करण्यासह मेट्रोमधील व्यस्त आयुष्याला कंटाळून येथे लोक येत असतात. येथील गंगा नदी लोकांसाठी प्रमुख आकर्षण आहे. दररोज सायंकाळी सुमारे ५ हजार नागरिक गंगा पूजेसाठी उपस्थित असतात. पूजा झाल्यानंतर लाखोंच्या संख्येने फुल आणि पूजेची सामुग्री गंगेत अर्पण केली जाते. त्यामुळे प्रदुषणात वाढ होते.

पाण्यात अर्पण केल्यानंतर फुले पाण्यातील ऑक्सिजन शोषून विरघळून जातात. यामुळे पाण्याचे मोठे नुकसान होते. याशिवाय प्लॅस्टिक बॅग, इंडस्ट्रीचा कचरा, डिटरजंट इत्यादी पाण्यात टाकले जातात. हे अनैसर्गिक घटक पाण्यासाठी घातक असतात.

वाराणशी शहर पूर्णपणे गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. या शहरातील बहुसंख्य जनता या नदीवर निर्भर आहे. याशिवाय २० कोटी लीटर गटारातील पाणी गंगेत सोडले जाते. तसेच हे एक महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळ असल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडते.

गंगेवर निर्भर असलेली जनावरे
गंगेत झालेल्या प्रदुषणामुळे अनेक जीवजंतू जवळपास नष्ट झाले आहेत. तरी अजूनही काही जीवजंतू गंगेच्या पाण्यात आढळून येतात. तसेच इतर जनावरे गंगेच्या पाण्यावर निर्भर आहेत. राजाजी नॅशनल पार्क, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आणि धुधवा नॅशनल पार्क गंगेच्या किनाऱ्यावर आहेत. हत्ती, वाघ, अस्वल, गेंडा, मगर, कोल्हा आदी अभयारण्यातील प्राणी गंगेच्या पाण्यावर अवलंबून आहेत.

तुम्ही गंगेला कशी मदत करू शकता
१) नदीच्या किनाऱ्यावर कचरा फेकू नका. अशा स्वरूपाच्या कचऱ्यामुळे जलप्रदुषणात वाढ होते.
२) प्लॅस्टिक बॅग्ज आणि पाण्याच्या बाटल्या गंगेत फेकू नका. या कधीही पाण्यात विरघळत नाही.
३) फूल किंवा या सारखी कोणतीही वस्तू पाण्यात फेकू नका. यामुळे पाण्यातील ऑक्सिजन कमी होऊन जीवजंतुंवर विपरित परिणाम होतो.
४) राष्ट्रीय अभयारण्यात फिरायला जाताना तेथील डिस्पोजल सिस्टिमसंदर्भात माहिती मिळवा. जर काही वस्तू पाण्यात टाकल्या जात असतील तर त्याची माहिती संबंधित व्यक्तींना द्या.
५) काही रिसॉर्ट आणि टुर्स कंपन्या क्रूझ आणि फिशिंगच्या सोई उपलब्ध करून देतात. त्यांच्याकडे याची परवानगी आहे, की नाही हे आधी तपासा.
६)कोणतेही रसायन, साबण किंवा डिटरजंट नदीच्या पाण्यात वापरू नका.
७) कोणत्याही प्रकारचा कचरा पाण्यात जात असेल तर याची माहिती संबंधितांना द्या.

पुढील स्लाईड्समध्ये बघा गंगेची छायाचित्रे