आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या उन्‍हाळयात घामाला म्‍हणा ना आणि वॉटर स्‍पोर्ट्सला हा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- उन्‍हापासून वाचण्‍यासाठी प्रत्‍येकजण कोणता ना कोणता उपाय शोधण्‍याचा प्रयत्‍न करीत असतो. जर तुम्‍हीही वाढणा-या उन्‍हामुळे त्रस्‍त असाल तर यापासून मुक्‍तताच नव्‍हे तर त्‍याचबरोबर मजाही देईल असा एक उपायही आहे.

पाणी, समुद्र, नदी... होय, या उष्‍णतेपासून वाचण्‍यासाठी बाहेर पडा वॉटर फनसाठी आणि स्‍वार व्‍हा समुद्रातील लाटांवर. divyamarathi.com आणि ixigo.com तुमच्‍यासाठी देत आहे काही अशाच प्रकारचे वॉटर स्‍पोर्ट्स.

स्‍कीईंग- पाण्‍यावर चालण्‍याची फँटसी पूर्ण करण्‍याचे नाव आहे स्‍कीईंग. थंड निळया लाटांबरोबर वर खाली होण्‍याची मजा घेण्‍यासाठी गोवा येथील कँडोलिम बीच परफेक्‍ट आहे.

सर्फिंग, विंडसर्फिंग- अँडव्‍हेंचरसाठी कायम तयार असणा-यांसाठी सर्फिंग आणि विंडसर्फिंग एक जबरदस्‍त अनुभव असू शकतो. याची मजा घेण्‍यासाठी डोना पोला किंवा कन्‍याकुमारी एकदम परफेक्‍ट आहे.

राफ्टिंग- राफ्टिंगसाठी ऋषीकेष प्रसिद्ध आहे. तुम्‍ही उत्तराखंडची नदी टंस, अरूणाचलची टुटिंग किंवा पश्चिम बंगालची तिस्‍ता येथेही याचा आनंद घेऊ शकता. नदीच्‍या प्रवाहाला चॅलेंज करणे चॅलेंजिग आहे.

स्‍कुबा डायव्हिंग, स्‍नॉरकॅलिंग- डिस्‍कवरी आणि नॅशनल जियाग्राफिक चॅनलवर तुम्‍ही हे अनेकवेळा पाहिले असेल. यावेळी त्‍याचा अनुभव तुम्‍ही घेऊन पाहा. गोवाच्‍या पोर्ट ब्‍लेअरचे निळे पाणी आणि लक्षद्वीप स्‍कुबासाठी परफेक्‍ट आहे. स्‍नोकॅलिंगसाठी कर्नाटकातील मुरूदेश्‍वराही पर्यटकांसाठी फेव्‍हरेट आहे.

काय‍ाकिंग/स्‍पीड बोटींग/कॅनाईंग- ज्‍यांना रेसिंग, स्‍पीड पसंत आहे, त्‍यांच्‍यासाठी हे खेळ बनले आहेत. स्‍पीड बोटिंगसाठी उदयपूरचा फतेहसागर तलाव बोटिंग प्रेमींसाठी एकदम फेव्‍हरेट आहे. दक्षिणेतील अलेप्‍पीचे चमकणारे पाणी कॅनाईंग आणि कायाकिंगसाठी प्रसिद्ध आहे.

आता सुर्य आपले काम करीत आहे, तुम्‍ही घ्‍या पाण्‍याच्‍या शिडकाव्‍याचा आनंद. ट्रॅव्‍हल्‍सशी संबंधित अधिक माहितीसाठी क्लिक करा www.bhaskar.com/travel/