आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाषा शिकताना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गूगल प्लेस्टोअरवर 123 ABC Handwriting Game असे टाइप करा. हे अॅप फ्री डाऊनलोड करता येते. सदर शैक्षणिक अॅप अंगणवाडी व पहिलीच्या विद्यार्थ्याकरिता उपयुक्त आहे. यामध्ये lower case, upper case, Numbers 123, shapes याबद्दल सखोल कृतिशील घटक आहेत. उदा. Lower case यावर क्लिक करा. यानंतर आपणास A पेन्सिल, कलर बॉक्स आणि नंबर बॉक्स दिसेल. स्क्रीनच्या वरच्या बाजूला एकएक लेटर येतील. लेटर गिरवण्यासाठी पर्याय आहेत. तसेच त्याच्या खाली पेनानेसुद्धा लिहिता येते. स्क्रीनच्या सर्वात खाली डाव्या कोपऱ्यात चुकलेले खोडण्यासाठी रबर आहे. यामुळे सराव चांगला करता येतो. पुढेमागे जाण्याचे पर्याय आहेत. त्या बाजूला असलेल्या बटणावर क्लिक केल्यास त्याचा आवाजदेखील आपल्याला ऐकायला मिळतो. स्वतः मुलांना शिकता येण्यासारखे हे अॅप आहे. अशीच प्रक्रिया  ABC, 1 2 3, SHAPES यांच्यासाठी आहे. 


Google playstore वरून Marathi kids App मोफत डाऊनलोड करा. यामध्ये अंगणवाडी ते दुसरीपर्यंत वर्गासाठी हे अॅप उपयोगी आहे. यामध्ये अनेक विभाग दिलेले आहेत. 


वर्णमाला – यात स्वर आणि व्यंजन दिलेले आहेत. ज्या स्वरावर क्लिक करू त्या स्वराशी संबधित चित्र येते. याच बरोबर स्वर उच्चार ऐकण्यास मिळतो. मुलांना आवडणारे अॅप आहे. 
इंग्रजी वर्णमाला – यात मराठीप्रमाणे वर्णमाला दिलेली आहे. त्यानुसार चित्र असून त्या संबंधित चित्र येते. याचबरोबर उच्चार ऐकण्यास मिळतो. या मोबाइल अॅपद्वारा मुले आवडीने अभ्यास करतात.


-  मंजूषा स्वामी, उस्मानाबाद
manjushaswami1975@gmail.com

बातम्या आणखी आहेत...