आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाल भोपळ्याचे भरीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कधी तरी सिंहकटीवरून

दुमडून दुमडून अचानक
खूप फुलणारा पिवळा
भोपळ्याचा गाउन,
गळ्याशी दाटीदाटीने झालर
करणारे ओले खोबरे,
दाणे, मोहरी-जिऱ्याचे बुट्टे
आणि केसात खुपसलेला
कोथिंबिरीचा राजमुकुट...
आणि कार्टलंड बाईंची
रथातून धावणारी गोष्ट.
आणि कधीतरी
एखाद्या शेलाट्या भांड्यात,
चापूनचोपून नेसलेली
पिवळी धमक नऊवारी पैठणी,
जिरे-मोहरीचे काठपदर,
लावणीचे बोल थिरकताना
उडलेले थोडे कुंकू,
थोडी मिरची कढीपत्त्याची कलाकुसर
आणि त्यावर शुभ्र खोबऱ्याचा
अंगावर पेललेला रेशमी शेला
आणि दहीशेठना बघताच
आळवलेले
“या रावजी, बसा रावजी...”
शब्द कुठलेही असोत,
रायत्याची चव अप्रतिमच असते.


- सुरंगा दाते, मुंबई
suranga.date@gmail.com

बातम्या आणखी आहेत...