आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजीब दास्ताँ है ये…

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेथे सप्तसूर नतमस्तक होतात, ते नाव म्हणजे, लता मंगेशकर. प्रारंभीच्या काळातील संघर्ष असो की लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झाल्याचा काळ असो ही महान गायिका कायमच आपली मुळं धरून राहिली. या काळात अनेक माणसे त्यांच्या जीवनात आली, चढ-उतार आले. अनेक अनुभव आले. त्यातून अनेक किस्से घडले. त्यातील हे काही वेचक किस्से….

 

 

तेरा पिछा ना छोडूंगा…. 
लता दीदींच्या संघर्षकाळातील हा किस्सा आहे. त्यावेळी लता दीदी रेकॉर्डिंगसाठी लोकल ट्रेने जात. दररोज एक तरूण त्यांचा ट्रेनमध्ये त्यांच्या मागे असायचा. तो लतादीदी ज्या स्टेशनवर उतरतील तेथेच उतरायचा. त्यांच्या मागे-मागे स्टुडिओपर्यंत यायचा. अगदी स्युडिओतही घुसायचा. असे १० ते १५ दिवस झाले. तो तरूण काही लतादीदींचा पिच्छा सोडेना. एके दिवशी तर तो लता दीदींच्या सेटवरच आला. तेथे संगीतकार खेमचंद प्रकाश गाण्याची रिहर्सल करत होते. लता दीदींनी खेमचंद यांना घडला प्रकार सांगितला व तक्रार केली, हा तरूण माझा पाठलाग करतोय. खेमचंद यांनी त्या तरूणाकडे पाहिले आणि ते जोर जोरात हसू लागले. तेथे उपस्थित सर्वजण मग त्या हसण्यात सहभागी झाले. तो तरूणही हसायला लागला. लता कावरी-बावरी झाली. खेमचंद प्रकाश म्हणाले, अरे हा तर अशोककुमार यांचा छोटा भाऊ, किशोरकुमार. अशी झाली लता-किशोर यांची ओळख.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, 
> यह लडकी आसमाँ को छू जाएगी… 
> कैसे रहूँ चूप की…
> घर आजा घिर आयी…
> कमबख्त कभी बेसुरी नही होती…
>...आणि आणखी एक भाऊ मिळाला…

बातम्या आणखी आहेत...