आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aakar Patel About On Sonia Gandhi And Natvarsingh

बंडाचे निष्प्रभ निशाण!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नटवरसिंग यांनी वयाच्या ८३व्या वर्षी बंडाचे निशाण फडकावले आहे. बंड सूचित करण्यासाठी त्यांनी जे पुस्तक लिहिले आहे, ते रिकाम्या जागा भरल्यासारखे आहे. त्यात कुंवरजींच्या पूर्वजांचा ऊर अभिमानाने भरून यावा असे काहीही नाही... सोनियांनी या पुस्तकाच्या बाबतीत मौन बाळगले असते तर बरे झाले असते, त्यांचा पक्ष सत्तेत असता तर त्यांनी तसेच केले असते.
माजी मंत्री नटवरसिंग हे भरतपूरच्या राजघराण्यातले. या घराण्याचा सूरजमल जाट हा एकमेव सम्राट होता. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला उतरती कळा लागली. या वेळी सूरजमलने दिल्लीमधला छोटा भूभाग काबीज केला. बरहाच्या सय्यद हसन अली खानने (प्रसिद्ध/कुप्रसिद्ध सय्यद बंधूंपैकी एक) सूरजमलच्या कुटुंबाला गादीवर बसवण्याचे वचन दिले होते. सय्यदला असे करण्याचा अधिकारच नव्हता. तो काही पावले उचलणार इतक्यात तो मरण पावला. पण जाट लोकांना राजा म्हणवून घेण्याची त्याची अिनवार इच्छा होती. सूरजमलचे वडील बदनसिंग यांनी हरलेल्या आणि दिवाळे निघालेल्या, पण तरीही मानी असलेल्या सरबुलंद खान या गुजरातच्या तेव्हाच्या राज्यप्रमुखाला ५००० रुपयांची रक्कम पाठवली आणि आपल्याला राजा म्हणावे, अशी विनंती केली. खानाने त्याला ‘ठाकूर’ असे संबोधत पैसे परत केले. १७३० मध्ये या सगळ्या घटना घडल्या. सूरजमलने दरोडे घालून सगळी माया जमवली होती. स्वतःमागे मोठा खजिना आणि जाट लोकांचे मोठे सैन्य ठेवून तो श्रीमंतीत मरण पावला. पण त्याच्या शेतकरी जाट सैनिकांचे १८ महिन्यांचे वेतन थकलेले होते.

वारसाहक्काचा हा इतिहास नक्कीच रंगतदार आहे. पण सध्या काँग्रेस पक्षातील सर्वाधिक व्यासंगी नेत्यांपैकी एक (अर्थात सध्याच्या काळात या वाक्प्रचाराला काही अर्थ उरलेला नाही) असे नटवरसिंग यांनी वयाच्या ८३व्या वर्षी बंडाचे निशाण फडकवले आहे. नेहरू-गांधी घराण्याची त्यांनी अनेक दशके सेवा केली. तरीही काही वर्षांपूर्वी तेल घोटाळ्यात नटवरसिंग यांचा हात असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्राच्या अहवालात असल्याने, त्यांचे मंत्रिपद काढून घेण्यात आले. कालांतराने त्यांच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला.

नटवरसिंग यांनी नुकतेच एक पुस्तक लििहले आहे, ज्यात अटलबिहारी वाजपेयींचा २००४ मध्ये पराभव झाल्यानंतर सोनिया गांधी पंतप्रधानपद स्वीकारायला घाबरल्याचा धक्कादायक आरोप उघडपणे करण्यात आला आहे.

मी उघडपणे असा उल्लेख करतोय, कारण नेमका काय घोटाळा आहे, ते मला कळत नाही. त्यांचे विशिष्ट दावे पुढीलप्रमाणे आहेत;

“आपली आई पंतप्रधान व्हावी याला राहुल यांचा ठाम विरोध होता. आपले वडील व आजी यांच्याप्रमाणे आईलाही प्राणाला मुकावे लागेल, याची त्यांना भीती होती. आईला पंतप्रधान बनण्यापासून रोखण्यासाठी काहीही करेन, असे त्यांचे वक्तव्य होते. या वक्तव्यामुळे प्रकरणाला कलाटणी मिळाली. राहुल यांची तीव्र इच्छाशक्ती लक्षात घेता, ही धमकी काही साधी नाही. राहुल यांनी सोनियांना निर्णय घेण्यासाठी २४ तासांचा अवधी दिला होता. त्या वेळी मनमोहनसिंग, सुमन दुबे, प्रियांकासोबत मी तिथे उपस्थित होतो. सोनिया खूप अस्वस्थ होत्या आणि त्यांचे डोळे पाण्याने डबडबले होते. आई या नात्याने त्यांना राहुल यांचे म्हणणे टाळणे शक्य नव्हते. शेवटी राहुल यांच्या मनाप्रमाणेच झाले. सोनिया पंतप्रधान न बनण्याचे हे एकमेव कारण होते.’

मला सगळ्यात जास्त आश्चर्य वाटले ते या परिच्छेदातल्या भाषेचे. जो माणूस प्रतिष्ठित सेंट स्टीफन कॉलेज आणि केम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिकला आहे, तो अशी भाषा वापरतो, नटवर खूपदा ‘व्हेहेमन्टली अपोज्ड’, ‘मॅटर्स रिच्ड अ क्लायमॅक्स’, ‘प्रिपेअर्ड टु टेक एनी पॉसिबल स्टेप’ असे ज्याला आपण स्टॉक फ्रेजेस म्हणतो, तसे ते घिसेपिटे शब्द वापरतात. रोज त्याच त्याच शब्दांशी खेळावे लागल्याने कंटाळलेल्या बिच्चाऱ्या पत्रकारांनी असे शब्द वापरले तर ठीक आहे; पण नटवरसिंगसारख्यांकडून हे अपेक्षित नाही.

यातील आशयाबद्दल बोलायचे झाले तर, एखाद्या मुलाला आपली आई सुरक्षित राहावी, असं वाटलं तर त्यात काय चूक आहे? आणि राहुल (त्याने त्याचे रात्रीचे जेवण घ्यायचे नाकारले) यांनी सोनियांना धमकवण्यासाठी अशा काय मोठ्या अटी घातल्या; ज्यामुळे सोनियांनी पंतप्रधानपद धमकीमुळे नाकारले, याबद्दल नटवर कोणते पुरावे देतात? हे आपल्याला माहीत नाही.
पण या तथाकथित आरोपामुळे संत सोनिया यांच्या डोक्यामागचे तेजोवलय त्यांच्या मनातून तरी नाहीसे झाले. त्या दुःखी होऊन म्हणाल्या, ‘मी स्वतःचे एक पुस्तक लिहीन आणि तेव्हा लोकांना खरं काय आहे ते समजेल. सत्य सगळ्यांसमोर आणण्याचा लेखन हाच एकमेव मार्ग आहे. त्यामुळे मी हे ठरवले आहे.’

ते ठीक आहे. पण ‘द गुड, द बॅड अँड द अग्ली’मध्ये महान एली वॉलाचने म्हटलेच आहे, जेव्हा तुम्हाला गोळी घालायची असेल तेव्हा घाला; बोलत बसू नका.’

‘पीएम’ पद नाकारल्यामुळे सोनिया सुरक्षित राहिल्या, असे नटवर यांना वाटते का? आणि ज्या कुणाला लक्ष्य करायचे असेल त्याच्या दृष्टीने त्या कमी महत्त्वाच्या ठरल्या का? त्या काँग्रेसमधील सगळ्यांत प्रभावशाली व्यक्ती आहेत. डॉ. मनमोहनसिंग पीएम असतानाच्या १० वर्षांच्या काळात तर त्या भारतातली सगळ्यात प्रभावशाली व्यक्ती होत्या. पद नसल्याने विशेष फरक पडत नव्हता, हे सगळ्यांना माहीत आहे. वस्तुत: सोनियांनी या पुस्तकावर प्रतिक्रिया द्यायला नको होती. सोनियांनी प्रतिसाद द्यावा, असे त्या पुस्तकात विशेष काहीही नाही. प्रसिद्ध झालेल्या एकूण मजकुरापैकी हा एकच उतारा खळबळजनक आहे, हे लक्षात येते.

‘सोनिया आणि मी केलेल्या चर्चा या विशेष, गंभीर आणि मुद्देसूद होत्या. पण आमचे अनौपचारिक संवाद खूप खेळीमेळीचे असत. मी एकदा परदेशातील दौरा आटोपून परतलो, तेव्हा ‘आय मिस्ड यू’ असे त्यांचे पहिले शब्द होते. लोकांमध्ये वावरताना सोनियांचा असणारा संकोच थोडा कमी होत होता, पण त्यांना अजूनही मोठा पल्ला गाठायचा होता. पुरुषसत्ताक समाजात त्या कधी निवांत नसत. अगदी वर्किंग कमिटीच्या बैठकीतही त्या तणावाखाली असायच्या. खूप कमी बोलायच्या.’ यातून काय समोर येते? काहीही नाही.

नटवर लििहतात : ‘२००० ते २००३च्या दरम्यान सोनियांनी अमेरिकेचा दौरा केला, तिथे त्या व्हाइस प्रेसिडेंट डिक चेनी आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट कोंडोलिसा राइस अशा नामांकित व्यक्तींना भेटल्या. त्या ऑक्सफर्ड आणि हाँगकाँगलासुद्धा गेल्या होत्या. त्या वेळी मी त्यांच्यासोबत होतो. परदेशात असताना त्या निवांत, खेळकर आणि समजूतदार अशी वेगळी व्यक्ती असत.’
अशा काही गोष्टी या पुस्तकात प्रकट होतात. एक लेखक म्हणून मला तरी हा मजकूर पुस्तकासाठी आवश्यक वाटत नाही. पुस्तकासाठी आवश्यक दमदार मजकूर यात नसल्यामुळे अर्थातच हे पुस्तक रिकाम्या जागा भरल्यासारखे वाटते. राजीव यांच्या मृत्यूनंतरच्या वर्षी सोनियांचे मौन आणि राजकारणापासून अंतर राखणे यामुळे त्या सत्तालोलुप नाहीत, अशी त्यांची एक छबी तयार झाली होती. अशा वेळी सोनियांनी या पुस्तकाच्या बाबतीत मौन बाळगले असते तर बरे झाले असते, त्यांचा पक्ष सत्तेत असता तर कदाचित त्यांनी तसेच केले असते.

पण सोनियांचे इरादे नेक नाहीत, हे सिद्ध करण्यासाठी आक्षेप घेऊन नटवरसिंगांनी काय मिळवले? कुंवर नटवरसिंग यांच्या पुस्तकाचे प्रकाशक रूपा (रूपाने चेतन भगतची पुस्तकेही प्रकाशित केली आहेत!) यांनी हा बंडाचा प्रसंग शिताफीने वापरला आहे. ज्यामुळे कदािचत कुंवरजींच्या पूर्वजांचा ऊर अभमिानाने नक्कीच भरून आला असेल!
(aakar.patel@gmail.com)