आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परिसंवाद : पुस्तके, प्रकाशने बक्कळ; पण साहित्य कोठे?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्याची वानवा, पण भविष्य उज्ज्वल
स्फुट, कथा, कादंबरी, नाटक आणि कविता या साहित्य प्रकारांना प्रकाशन संस्थांमध्ये, पुस्तक विक्रेत्यांकडे, तसेच शाळा- महाविद्यालयांच्या आणि सार्वजनिक वाचनालयांमध्ये भ्रामक स्वरूपाचा प्रतिसाद पाहावयास मिळतो. एका बाजूला मराठी साहित्य निर्मितीची संख्यात्मक पाहणी केली तर प्रकाशित होणा-या ग्रंथांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. साहित्याची चिंता करण्याचे कारण नाही. तेच तेच वाचून कंटाळलेल्या रसिकांना वेगळे, दर्जेदार साहित्य हवेच असते. त्यामुळे ही जबाबदारी मुख्यत: लेखकांची आहे. ते वाचकांची अभिरुची घडवतात. सध्या वाचक, नवी पिढी माहितीपर साहित्याकडे वळलेली असली तरी सुजाण वाचकांच्या प्रेमळ दबावावर ही संस्कृती वर्षानुवर्षे टिकून आहे. वाचक, साहित्यप्रेमी, प्रकाशकांनी नाराज व्हायचे कारण नाही. कारण नवी पिढी खूपच चोखंदळ आहे. त्यामुळे दर्जेदार, अभिजात साहित्याला उज्ज्वल भविष्य आहे. हे साहित्य निश्चितच वाढणार आहे.