आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोबत राहता येईल हे माहीतच नव्हतं...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलीला जन्मताना प्रत्यक्ष बघता नाही आलं याचं आज थोडं वाईट वाटतं आहे. मात्र, प्रामाणिकपणे सांगायचं तर हा विचार हा विषय समोर येईपर्यंत मला माहीतसुद्धा नव्हता. आपल्या अपत्याचा जन्म होताना तिथे हजर राहता येतं हेच मला माहीत नव्हतं. आज अशी संधी मिळाली तर नक्की आत जाईन. त्याची दोन कारणं. एक, बायकोला बरं वाटेल आणि त्यामुळे कदाचित तिच्या वेदना कमी होतील. दोन, आपला अंश जगात येताना बघायला कुणाला नाही आवडणार? तेव्हा मात्र मला हे काहीच माहिती नव्हतं. याचे कारण हेसुद्धा असावे की, मी फारच लहान वयात बाप झालो.

माझ्या मुलीच्या जन्माच्या वेळेला वेगळ्याच गोष्टी घडल्या. या विषयाशी त्याचा फारसा संबंध नाही. मात्र त्यातून मुलीकडे बघण्याचा आपल्या समाजाचा, विशेषतः उच्चभ्रू ब्राह्मण सरंजामी वर्गाचा दृष्टिकोन दिसतो. माझ्या बायकोच्या डॉक्टरांनी तिलासुद्धा मुलीचा जन्म झाल्यानंतर बराच वेळ तिला सांगितलंच नाही की मुलगी झाली आहे.

आता या डॉक्टरसुद्धा बाईच आणि बायकोच्या घरच्या संबंधातल्या. तरीही त्यांना माझ्या एकंदर जमीनदारी वातावरणाकडे पाहून असं वाटलं असावं की यांना मुलगाच हवा असेल. आणि माझ्या घरच्यांच्या बाबतीत तो अंदाज खरासुद्धा असेल. मात्र ते सर्व तेवढ्यापुरतंच. त्यानंतर माझ्या घरी माझ्या मुलीला कुठल्याही अर्थाने वेगळी वागणूक मिळाली नाही.