आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावड्या अन‌् अाईचं नातं, ‘जू’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेखक, कवी एेश्वर्य पाटेकरांचं सध्या गाजत असलेलं हे अात्मकथन. या अात्मकथनाला नुकताच द. ता. भाेसले जिव्हाळा पुरस्कार प्रदान करण्यात अाला. त्यानिमित्त एेश्वर्य पाटेकरांचं हे मनाेगत त्यांच्याच शब्दांत...

शाळा शिकलेली नसूनही विद्यापीठासारखी. तिच्याच विद्यापीठात अाम्ही भावंडं शिकलाे. म्हणून हे अात्मकथन कुणाला दु:खाची गाथा वाटेल; मात्र ही दु:खाच्या विरुद्ध लढणाऱ्या माणसाची गाेष्ट ‘जू’ अाहे..

संवेदनशील सुईदाेराच माझ्या अाईने माझ्या हातात ठेवला. सुईदाेरा जाेपर्यंत टिकेल, ताेपर्यंत लिहितच राहीन... म्हणून तळपायाची माती कधी साेडणार नाही.
ज्यांच्या हस्ते मला हा द. ता. भाेसले जिव्हाळा पुरस्कार दिला गेला, त्या पानिपतकार अर्थात विश्वास पाटलांची म्हणजेच त्यांच्या पुस्तकाची एक अाठवण अाहे. दहावीच्या वर्गात असेल मी तेव्हा; भाजीपाल्याचा बाजार अाणण्यासाठी अाईने शंभरएक रुपये माझ्या हातावर ठेवले. मी बाजारात गेलाे खरा, मात्र पुस्तक प्रदर्शनात ‘झाडाझडती’ कादंबरीकडे माझी नजर गेली. कादंबरी खरेदी करायची, पण तिची किंमत माझ्या बाजाराच्या पैशांइतकी. बाजार करायचा की ‘झाडाझडती’ घ्यायची? शेवटी ‘झाडाझडती’च घेतली. अाई कामावरून अाली. मी ‘झाडाझडती’ वाचत बसलाे हाेताे. अाई म्हणाली...

भावड्या बाजार कुडय? तिला माझी बहीण म्हणाली, अाई त्यानं बाजाराच्या एेवजी पुस्तक अाणलंय. अाईची तळपायाची अाग मस्तकाला भिडली. म्हणाली.. म्हसन्या, या पुस्तकाचं कालवन करून खायला घालू का? असं म्हणत पाठ हिरवी पिवळी करत तिनं फाेडून काढली. गंमत बघा काल पुरस्कार घ्यायला निघालाे तेव्हा अाईला म्हणालाे, अाई तू ज्यांच्या पुस्तकामुळे मला मारलं, त्यांच्याच हस्ते पुरस्कार घ्यायला जाताे अाहे. अाई म्हणाली, लेका तू मार खाल्ला म्हणूनच अाजचा साेन्याचा दिवस पाहताेय. थाेडक्यात सांगायचं, तर वास्तवाच्या विस्तवात तग धरून राहण्यासाठी अाईने मला तावूनसुलाखून घेतलंय. म्हणूनच ‘जू’ हे एेश्वर्य पाटेकर या कवीचं हे अात्मकथन नसून, ते भावड्याचं अाहे. त्याचा वय वर्षं १६ पर्यंतचा प्रवास मी मांडला. भावड्याच्या चार बहिणी, खंबीरखुट अाई, अाणखी संतू, झिग्या, नित्या, दिवड्या, पक्या यांच्या मैत्रीच्या दाैलतीमुळे भावड्या श्रीमंत झाला अाहे. परिस्थितीचे अनुभव त्याच्या पदरात पडले. भाकरीच्या संघर्षात पृथ्वीला गरका मारून अालेलं त्याचं कुटुंब भाकरीच्या चंद्राची दास्तान मांडत. भाकरीच्या चंद्राच्या पाठीमागे धावताना जी दमछाक झाली ती तर भावड्यानं सांगितलीच, शिवाय जन्मदात्यासकट नात्यागाेत्यातल्या नतद्रष्टांनी काेलमडून पाडण्याचे लाख प्रसंगही सांगितले अाहेत. भावड्या अन‌् त्याच्या चार बहिणींच्या पाठीमागे परिस्थितीच्या अासुडाचे मार अाईने झेलले, पण झळ तिच्या लेकरांना लागू दिली नाही. भावड्याची ताकदच त्याची अाई अाहे.

अाईच्या संस्कार शाळेत शिकून भावड्या सज्ञान झाला अाहे. म्हणूनच भावड्या अाईविषयी म्हणताे... एखाद्या माणसाच्या अायुष्यात असंख्य कसाेट्या लिहिलेल्या असतात. त्या पार कराव्याच लागतात. अाईने दिल्या परीक्षामागून परीक्षा, एकही पेपर अर्धवट साेडून उठली नाही. फायनलला फर्स्ट क्लास घेऊन पास झाली. शाळा शिकलेली नसूनही विद्यापीठासारखी. तिच्याच विद्यापीठात अाम्ही भावंडं शिकलाे. म्हणून हे अात्मकथन कुणाला दु:खाची गाथा वाटेल; मात्र ही दु:खाच्या विरुद्ध लढणाऱ्या माणसाची गाेष्ट अाहे. म्हणूनच हेदेखील कबूल करताे की, संवेदनशील सुईदाेराच माझ्या अाईने माझ्या हातात ठेवला. सुईदाेरा जाेपर्यंत टिकेल, ताेपर्यंत लिहितच राहीन... म्हणून तळपायाची माती कधी साेडणार नाही, हा निर्धार करत हा पुरस्कार माझ्या अाईला अर्पण.