आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • About Inspirational Career Vilas Gavarasakara Article

करिअर प्रेरणादायी करायला हवे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्र.१. ‘कॅट’ परीक्षा दिल्यावर कुठून एम.बी.ए. करता येते ? - स्नेहल जोशी, पुणे.
उत्तर : कॅट म्हणजे ‘कॉमन अडमिशन टेस्ट’. भारतामधील व्यवस्थापन क्षेत्रामधील आंतरराष्ट्रीय कीर्तीची “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट” अर्थात आयआयएम अहमदाबाद, बंगळुरू, कोलकाता, आयआयएम (ए.बी.सी.) या जुन्या आणि नावाजलेल्या इन्स्टिट्यूट व्यतिरिक्त इंदूर (मध्य प्रदेश), कोझीकोड (केरळ), लखनऊ (उत्तर प्रदेश), रामपूर (छत्तीसगड), रांची (झारखंड), रोहतक (दरभंगा), शिलाँग (मेघालय), तिरुपिरापल्ली (तामिलनाडू), उदयपूर (राजस्थान), या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो. भारत सरकारच्या या संस्था व्यतिरिक्त देखील अन्य काही संस्था फक्त ‘कॅट’ स्कोअर प्रवेशासाठी घेतात. उदा. लालबहादूर शास्त्री एल.बी.एस. दिल्ली, इंटरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (आय.एम.आय.) इत्यादी. अधिकाधिक पर्सेंटाइल मिळवून आय.आय.एम. ए.बी.सी. च्या कुठल्याही संस्थेतील प्रवेश करिअरला वेगळ्या उंचीवर नेऊ शकतो.
प्र.२. मला बारा वर्षांचा मार्केटिंगचा अनुभव आहे. आता दिवसेंदिवस वाढणाऱ्या तणाव, टार्गेटमुळे माझे नोकरीत मन लागत नाहीये. पण व्यवसाय करावयाची इच्छा आहे. तर ते योग्य ठरेल काय ? - मंगेश दामले
उत्तर : नोकरी काय व्यवसाय काय त्याचे फायदे-तोटे तर असणारच. नोकरी सोडल्यास दर महिन्याला येणारी ठराविक रक्कम बंद होणार हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणजे तुमच्या महिन्याच्या आमदनीत अनिश्चितता येणार हे लक्षात घ्यावे. तुम्हाला मार्केटिंगचा अनुभव आहे, म्हणजे तुमचा लोकसंग्रह, संवाद कौशल्य, बिझनेस रिलेशन्स चांगले असतील. तेव्हा तुमचे शिक्षण, आवड, इच्छा आणि पात्रता व गुण यांचा विचार करून निर्णय घ्यावा. केवळ उत्साहाच्या भरात कुठलीही गोष्ट करायला सुरुवात करणे आणि तितक्याच झटापटीने ती सोडून देणे करिअरच्या या टप्प्यावर त्रासदायक होऊ शकतं. त्यामुळे संपूर्ण विचार करूनच निर्णय घ्यावा.

प्र.३. एखादा जॉब मिळाला म्हणजे करिअर झाले असे समजावे काय ? एखादे उदाहरण द्याल का ?
- अजय कोठारे
उत्तर : जॉब आणि करिअरमध्ये बारीक सीमारेषा आहे. >सर्वसाधारणपणे निव्वळ पैसे मिळविण्यासाठी जॉब केला जातो, पण करिअरमध्ये तुमच्या अंतर्गत सुप्त इच्छा, आकांक्षाचा सुद्धा विचार होतो.
जॉबमध्ये कामाच्या संधी मर्यादित असू शकतात, पण करिअरमध्ये तुम्ही स्वतः त्या वाढवू शकतात.

तुम्हाला बॉसने सांगितलेले काम इमानेइतबारे करणे हे जॉबचे वैशिष्ट असते, पण करिअर म्हटले की आणखी मोठा व्यापक विचार करता येतो.

आत्मिक समाधान, आनंद, मनापासून एखादी गोष्ट एन्जॉय करणं या गोष्टींमधून जाॅब आणि करिअरचा फरक स्पष्ट दिसून येतो.

करिअरच्या मोठ्या कॅन्व्हासमध्ये जॉब हा अविभाज्य भाग असतो, पण जॉबच्या कॅन्व्हासवर करिअरचा फारच थोडा भाग व्यापलेला असतो.

मंगेशकर कुटुंबीयांनी एखाद्या म्युझिक अकादमीमध्ये संगीत शिक्षकाची नोकरी केली असती तर तो त्यांचा जॉब असता. परंतु आज आपण बघतो ते त्यांचे ‘करिअर’! तसेच आपल्यापुढे उदाहरण आहे ते मास्टरब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे व आयआयटीमध्ये शिक्षण घेतलेल्या प्रसिद्ध लेखक चेतन भगतचे. या दोघांचे करिअर प्रेरणादायी आहे.