आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गावगाडा’ची तरुण अावृत्ती, नव्या रूपात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डिसेंबर १९१५ मध्ये त्रिंबक नारायण अात्रे यांच्या ‘गावगाडा’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले हाेते. त्याला १०० वर्षे झाल्याच्या निमित्ताने अाज या ग्रंथाची नवीकाेरी अावृत्ती वाचकांच्या हातात येत अाहे.
अात्रे यांनी या ग्रंथाचे वर्णन ‘नाेट‌्स अाॅन रुरल साेशलाॅजी अॅण्ड व्हिलेज प्राॅब्लेब विथ स्पेशल रेफ्रन्स टू अॅग्रिकल्चर’ असे केलेले अाहे. या अापल्या ग्रंथात त्यांनी गावाचे स्वायत्त स्वयंसिद्ध प्रशासन, गावाच्या अार्थिक व्यवहारातील शेतकऱ्याचे केंद्रवर्ती स्थान, बलुतेदारी, वतनपद्धती अाणि तत्कालीन गावगाड्याची काेसळू लागलेली अवस्था इत्यादींची साधार, सप्रमाण चिकित्सा केलेली अाहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न अाजही जसेच्या तसेच अाहेत. मग शंभर वर्षांपूर्वीचा शेतकरी असाे अाजचा. म्हणूनच मग ‘गावगाडा’सारखे एखादे साहित्य अाजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे ठरते. हीच बाब हेरून राजहंस प्रकाशनाने त्रिंबक नारायण अात्रे यांच्या ‘गावगाडा’ या शंभर वर्षे पूर्ण झालेल्या पुस्तकाला नव्या स्वरूपात साहित्यरसिकांसाठी साहित्य जत्रेत अाणले अाहे.
डिसेंबर १९१५ मध्ये त्रिंबक नारायण अात्रे यांच्या ‘गावगाडा’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले हाेते.
डिसेंबर २०१५मध्ये या पुस्तकाला १०० वर्षे पूर्ण झाली अाहेत. अात्रे यांनी या ग्रंथाचे वर्णन नाेट‌्स ‘अाॅन रुरल साेशलाॅजी अॅण्ड व्हिलेज प्राॅब्लेब विथ स्पेशल रेफ्रन्स टू अॅग्रिकल्चर’ असे केलेले अाहे. या अापल्या ग्रंथात त्यांनी गावाचे स्वायत्त स्वयंसिद्ध प्रशासन, गावाच्या अार्थिक व्यवहारातील शेतकऱ्याचे केंद्रवर्ती स्थान, बलुतेदारी, वतनपद्धती अाणि तत्कालीन गावगाड्याची काेसळू लागलेली अवस्था इत्यादींची साधार, सप्रमाण चिकित्सा केलेली अाहे. या विशेष अावृत्तीमध्ये लेखक अात्रे यांच्या ‘गावगाडा’ या ग्रंथाच्या पहिल्या अावृत्तीची मूळ संहिता, त्याच्यावरील महत्त्वाची अशी समकालीन समीक्षा, धनंजयराव गाडगीळ, स. ह. देशपांडे सुमा चिटणीस या अभ्यासकांनी स्वातंत्र्याेत्तर काळात केलेली सामाजिक-अार्थिक चिकित्सा अाणि ग्रंथ शताब्दीच्या निमित्ताने मुद्दाम लिहवून घेतलेले मिलिंद बाेकील नीरज हातेकर, राजन पडवळ यांचे लेख, तसाच सदानंद माेरे यांचाही लेख समाविष्ट अाहे. पुस्तकाचे संपादक द. दि. पुंड यांची सुदीर्घ विवेचक प्रस्तावना अाणि परिशिष्ट यातूनही अात्रे यांच्या ग्रंथाचे अंतरंग उलगडून घेण्यास साहाय्य हाेणार अाहे. ‘गावगाडा’ची ही शताब्दी अावृत्ती ग्रामीण अर्थशास्त्र, समाजशास्त्र, कृषिविज्ञान या क्षेत्रांतील अभ्यासकांना तर उपयुक्त अाहेच, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जबाबदार कार्यकर्त्यांनाही विशेष मार्गदर्शक ठरणारी अाहे.

पुनर्मुद्रणामागील उद्देश
ज्या पुस्तकांनी त्या-त्या काळात अापला ठसा उमटवला अाहे अाणि त्या पुस्तकांचे संदर्भ अाजही लागू पडतात, ती पुस्तके वाचण्यात अाजही वाचकांना रस अाहे अशी पुस्तके पुन्हा त्यांच्या हातात दिली तर वाचन संस्कृती वाढण्यास हातभार लागेल, असे त्यामागील एक मत अाहे. अशा अनेक पुस्तकांचे अाम्ही रसिकांसाठी पुनर्मुद्रण केले अाहे. त्यातीलच ‘गावगाडा’ हे त्या काळात अत्यंत गाजलेले असे पुस्तक अाहे. अाम्ही त्याचे पुन:प्रकाशन करताना केवळ पुस्तकच नाही दिले तर त्यावर संशाेधनात्मक विवेचन दिले अाहे. पुस्तकात पुस्तक असे म्हटले तरी हरकत नाही. जुनी प्रत जशीच्या तशी या पुस्तकात वाचायला मिळते. डाॅ. सदानंद बाेरसे
संपादक, राजहंस प्रकाशन
बातम्या आणखी आहेत...