आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Active Marathi Literature Board In Golden Jublee

सुवर्णमहोत्सवी सक्रिय मराठी वाङ्मय मंडळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूरच्या वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाची स्थापना 1962 मध्ये झाली. तेव्हापासूनच मराठी वाङ्मय मंडळाचे काम सुरू आहे. प्रा. मिरासदार, प्रा. श्रीराम पुजारी, प्रा. आर.जी. गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली या वाङ्मय मंडळाचे काम सुरू झाले. पुजारी सर मराठी विभागप्रमुख असताना राज्यातील सर्व लेखक, कवींना मंडळात पाचारण करण्यात आले होते. वाङ्मय मंडळाच्या वतीने 'शलाका' हे भित्तिपत्रक चालविले जाते. या भित्तिपत्रकाच्या माध्यमातून दर्जेदार साहित्याचे उतारे स्वहस्ताक्षरात लिहिण्यास सांगितले जाते. याला चांगला प्रतिसाद आहे.


*दरवर्षी मराठी दिन, वाङ्मय मंडळात
110 वर विद्यार्थी सक्रिय :
दर्जेदार साहित्यावर चर्चाही घडविली जाते. यात मराठी वाङ्मय मंडळाचे विद्यार्थी सहभागी होतात. प्रा.रवींद्र किंबहुने, प्रा. ल. रा. नसिराबादकर, प्रा.यु. म. पठाण, प्रा. गो. मा. पवार, प्रा.राजशेखर हिरेमठ, प्रा. व. बा.बोधे यांची साहित्यावर आधारित व्याख्यानेही आयोजित करण्यात आली. मराठी वाङ्मय मंडळात 110 वर विद्यार्थी-विद्यार्थिनी सक्रिय आहेत. दरवर्षी मान्यवर साहित्यिकांच्या जयंती व पुण्यातिथीदिनी कार्यक्रमांचे आयोजन होते. कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठीदिनी दरवर्षी कार्यक्रम होतात. यात साहित्यातील उत्तमोत्तम उता-यांचे वाचन व चर्चा होते. शिक्षक दिनाचे औचित्य साधून औरंगाबादचे साहित्यिक व समीक्षक प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे यांचे ‘शिक्षकाची सामाजिक बांधिलकी’ या विषयावर व्याख्यानही आयोजित करण्यात आले होते.


*महाविद्यालयातर्फे ‘विद्यारयण’
हे नियतकालिक चालवले जाते :
महाविद्यालयाच्या वतीने ‘विद्यारयण’ हे नियतकालिक निघते. ‘विद्यारयण’ हे पाली भाषेतील नाव आहे. मराठीत त्याचा अर्थ ‘विद्यारत्न’ असा होतो. या नियतकालिकात मराठी वाङ्मय मंडळाचा विशेष सहभाग असतो. उपक्रमाचा भाग म्हणून प्रोजेक्टरवर प्रबोधनात्मक नाटक व ‘जोगवा’ यासारखे चित्रपटही दाखवण्यात आले आहेत. मंडळाच्या वतीने वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचे आयोजनही करण्यात येते. प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार हे सध्या मराठी विभागप्रमुख असून प्रा.हनुमंत मते, प्रा.राजेश नवले, प्रा.अर्जुन व्हटकर, प्रा. पी. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी वाङ्मय मंडळाचे कार्य चालू आहे.