आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाडेपणावरचे दोन पर्याय आयुर्वेद आणि अ‍ॅक्युपंक्चर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थूलपणाच्या समस्येपुढे अमेरिकेने हात टेकले :
अमेरिकेने आपल्या ‘वॉर अगेन्स्ट ओबेसिटी’त केलेल्या पाहणीत असे आढळून आले की, मागील 50 ते 60 वर्षांत डाएटिंगचा (आहार नियंत्रण) उपाय करणार्‍यांपैकी फक्त 3 टक्केच लोकांना आहारावर नियंत्रण करून आपले वजन कमी करता आले. इतरांनी डाएटिंग बंद करताच त्यांच्या वजनात सुरुवातीपेक्षा दीडपट वाढ झाली. स्थूलपणाच्या या समस्येपुढे अमेरिकेने हात टेकले आहेत. आता ते या समस्येवरील उपायांसाठी भारतीय आयुर्वेद आणि चिनी अ‍ॅक्युपंक्चरकडे आशेने पाहत आहेत.

सुडौल अशा स्त्री-पुरुषांचे शिल्पचित्रण :
आपण भारतीयांनी आता वजनाबाबत पाश्चात्त्यांनी ठरवलेले मापदंड का स्वीकारावेत? आपल्याकडील देवळांवरील शिल्पांतून सुंदर, सुडौल अशा स्त्री-पुरुषांचे शिल्पचित्रण दिसून येते. सुंदर, सुडौल आणि सामान्य भारतीय स्त्री थोडीशी स्थूल असते. भारतीय पुरुषांची शरीरयष्टीही धिप्पाड मानली जाते. स्त्री-पुरुष दोघांचेही पोट थोडेसे सुटलेले असणेच सामान्य मानले जाते. आपण भारतीय पोटाने श्वास घेतो आणि ही पद्धतच शक्तिवर्धक आणि योग्य आहे.

अधिकांश निरोगी स्त्री-पुरुषांचे वजन 70 ते 80 किलोदरम्यान, मात्र कंपन्या मानतात 50 किलो :
वजनाचे म्हणाल तर भारतीय स्त्री-पुरुषांचे वजन 70 ते 80 किलोदरम्यान असावे. कारण अधिकांश निरोगी स्त्री-पुरुषांचे वजन तेच असते. औषध कंपन्या मात्र प्रत्येकाचे योग्य वजन 50 किलो इतकेच मानतात. त्याच वजनानुसार गोळ्या, औषधे आणि इंजेक्शन्स तयार केलेली असतात.

डोस कमी पडतो व साइड इफेक्ट होतात :
पन्नास किलो वजनाच्या व्यक्तीसाठी तयार केलेली ही गोळी 60, 70 किंवा 80 किलोची व्यक्ती जेव्हा घेते तेव्हा हा डोस कमी पडतो. यामुळे आजार पूर्णपणे बरा होत नाही. औषधांचा डोस वाढवला तर रोग बरा होतो, परंतु अतिरिक्त रासायनिक औषधामुळे त्रासदायक साइड इफेक्ट होतात. मग या साइड इफेक्टपासून मुक्तता व्हावी यासाठी पुन्हा औषधे आणि त्या औषधांमुळे नवा साइड इफेक्ट.

चरबी हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करते :
आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी आणि टिश्यू एक विशिष्ट काम करते. शरीरातल्या चरबीचेही कार्य ठरलेले आहे. आपल्या सर्व महत्त्वाच्या अवयवांभोवती चरबीचे आवरण असते. तसेच त्वचेच्या खाली शरीरभर चरबी असते. धक्का, दबाव, फटका अशा मॅकेनिकल शॉकपासून चरबीच वेगवेगळ्या अंगांना वाचवते. चरबी ही ‘लो कंडक्टर ऑफ हीट’ असल्याने ती अतिगरम तसेच अति थंड वातावरणात आपल्या शरीराचे आणि आतील अवयवांचे रक्षण करते. याव्यतिरिक्त चरबी अ, ड, क आणि ई या जीवनसत्त्वाचा साठा करून तो गरजेप्रमाणे शरीराला पुरवते.

डाएटिंगच्या नावाने तेल-तूप सोडणार्‍यांना व्याधींना बळी पडावे लागते :
चरबी शरीराला अन्नघटक आणि ऊर्जा पुरवते. त्यामुळे एखाद्याने तेल-तूप जरादेखील खाल्ले नाही तरी त्याच्या शरीरात चरबी बनतेच. फळे खाणार्‍यांच्या शरीरातदेखील त्यातील फ्रुक्टोजपासून चरबी तयार होते. डाएटिंगच्या नावाने तेल-तूप पूर्णपणे सोडणार्‍यांना अनेक शारीरिक व्याधींना बळी पडावे लागते.

वजन कमी करायचे निश्चित झाल्यानंतर व्यक्ती खूप जास्त, खूप जलद आणि खूप ताकदीने व्यायाम करते. बहुतेक वेळा हे चुकीचे ठरते. व्यायामाने कॅलरीज खर्च होतात तेव्हा त्यातील 50 ते 60 टक्के कॅलरीज कार्बोहायड्रेट्स अथवा पिष्टमय पदार्थ आणि उपलब्ध साखरेपासून खर्च होतात. आणि 40 टक्के कॅलरीज चरबीतील संग्रहित साठ्यातून खर्च केली जाते. खूप ताकदीने व्यायाम करताना तत्काळ ऊर्जेची गरज असते. अशी तयार ऊर्जा शरीरातील साखर तसेच पिष्टमय पदार्थापासून मिळते. चरबीतील कॅलरीज ऊर्जेत रूपांतरित होऊन वापरासाठी उपलब्ध व्हायला थोडा अवधी लागतो.

वजन कमी करण्यास कमी शक्तीचा व्यायाम करावा :
जर कमी शक्तीचे आणि सततचे व्यायाम केले तर हेच प्रमाण उलट होऊन चरबीचे 60 टक्के आणि पिष्टमय पदार्थाचे 40 टक्के खर्च होतात. म्हणून वजन कमी करण्यासाठी सतत परंतु कमी शक्तीचा व्यायाम करावा. चालणे, पोहणे, घरकाम करणे वगैरे व्यायामही उपयुक्त ठरतो.

कंटाळून डाएटिंग सोडले तर शरीर आधीच्या दीडपट जाड होते :
डाएटिंगमुळे सुरुवातीला कमी झालेले वजन थोड्याच दिवसांत स्थिरावते. अशा वेळी कंटाळून डाएटिंग सोडले तर शरीर आधीच्या दीडपट जाड होते. चरबीला कमी करायचा प्रयत्न करताना आहार कमी केला तर शरीर चरबीचे आवरण तसेच राखण्यासाठी कमी अन्नातही अंतर्गत प्रक्रियांनी अन्न घटकांची गरज भागवते. मात्र, अन्नपुरवठा पूर्ववत होताच भविष्यात शरीराला धोका होऊ नये म्हणून थोड्याच काळात पूर्वीपेक्षा जास्त चरबीचा साठा करते. ही प्रक्रिया करणार्‍या गुणसूत्रांना ‘थ्रीफ्टी जीन्स’ या नावाने ओळखले जाते.

चरबी वाढवण्यासाठी पुरेसे अन्न मिळत नसेल तर शरीर पाण्याचे संकलन वाढवून जाडेपणा तयार करते :
हृदय, फुप्फुसे, मूत्रपिंड, पचन संस्था, प्रजनन संस्था, यकृत, स्वादुपिंड वगैरे शरीरांतर्गत महत्त्वाचे अवयव तसेच स्नायू, हाडे, सांधे यांच्या स्वास्थ्यपूर्ण अवस्थेत कमतरता आली तर ते अवयव संवेदनशील आणि असुरक्षित होतात. अशा वेळी शरीर घाबरते आणि संरक्षक अशी चरबीची आवरणे वाढवते. अशा वेळी चरबी वाढवण्यासाठी पुरेशे अन्न मिळत नसेल तर शरीर पाण्याचे संकलन वाढवून अधिक जाडेपणा तयार करते. शरीरातील सर्व संस्था आणि अवयव निरोगी होऊन सुरळीत कार्य करू लागले तर शरीराला संरक्षणाची गरज कमी होऊन चरबीची साठवण कमी होऊ लागते.

निष्कर्ष - व्यायामाचा हेतू चरबी कमी करण्याऐवजी शरीर निरोगी ठेवण्याचा असेल तरच यश :
या सर्व माहितीवरून असा निष्कर्ष निघतो की व्यायाम करायचा हेतू चरबी कमी करण्याऐवजी शरीर निरोगी करण्याचा असला तर आपला हेतू लवकर साध्य होतो. चरबी घटवण्यासाठी डाएटिंग करणे चुकीचे ठरते कारण शरीर थोड्याच दिवसांत कमी आहारातही सर्व व्यवहार सुरळीत करायला शिकते आणि पुढे गरज पडू शकते म्हणून चरबी जमवतही राहते.

मग उपचार काय :
मग उपाय काय ? वजन आणि आकार कमी करण्यासाठी अ‍ॅक्युपंक्चर उपयुक्त आहे. ऑलिम्पिकमध्ये चिनी खेळाडूंना गोल्ड मेडलचा डोंगर रचताना पाहून अ‍ॅक्युपंक्चरची महती पटते. सर्व खेळाडूंची शारीरिक क्षमता अनेक पटीने वाढवण्यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यपूर्ण संतुलन राखण्यासाठी अ‍ॅक्युपंक्चरचाच वापर केला जातो. अ‍ॅक्युपंक्चरच्या मूलतत्त्वांनुसार शारीरिक लक्षणांवरून नेमके कारण कळते. त्यानुसार प्राणशक्तीच्या नेमक्या कोणत्या मेरिडियनमध्ये अटकाव आला आहे हे कळून प्राणशक्तीच्या वहनातले अडथळे लक्षात येतात. मग शक्तीचे संतुलन साधून आजार नाहीसा करता येतो. वेरेकर्स पॉइंटस नावाचा मांडीच्या बाहेरच्या वाजूला पॉइंट आहे. प्रत्येक मांडीच्या एक एक पॉइंटवर अ‍ॅक्युपंक्चर निडल लावली आणि तीन मिनिटांवर काढून टाकली तरी फरक जाणवतो. आपण चालू लागलात की, आपल्याला थोडे हलके वाटू लागते. शरीराच्या स्नायूमध्ये ‘टोन’ म्हणजे शक्ती येते. चेहर्‍याचा बेडौलपणा कमी होऊन तो रेखीव दिसतो. अ‍ॅक्युपंक्चर, आयुर्वेद संयुक्त उपचाराने सडपातळ होणे शक्य आहे.
औषधांबरोबर होणार्‍या साइड इफेक्ट्सने लोक त्रस्त :

आधुनिक वैद्यकीय शास्त्रात म्हणजे अ‍ॅलोपॅथीमध्ये काही औषधांनी भूक कमी होते किंवा लागतच नाही. काही औषधांनी अन्नातील तेलाचे शरीरात शोषण होण्याचे थांबते. त्यामुळे तेल जसेच्या तसे शरीरातून बाहेर पडते. काही औषधांनी अन्न छोट्या मोठ्या आतड्यांतून इतके त्वरेने पुढे सरकते की, त्यातील अन्नघटकांचे शोषण होत नाही. अशा अनेक औषधांचा खूप बोलबाला झाला, पण त्या औषधांबरोबर होणार्‍या साइड इफेक्ट्सने लोकांना असे हैराण केले की, अमेरिकन सरकारी यंत्रणेने त्यावर तातडीने बंदी आणली.

आता आपल्यासमोर दोनच पर्याय आहेत. अ‍ॅक्युपंक्चर हा उत्तम उपाय आणि भारतीय आयुर्वेद हा सर्वोत्तम उपाय. दोघांचे सुयोग्य मिश्रण केल्यास खात्रीदायक उपाय नक्कीच सापडतो.