आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adv.megha Deshmukh Article About Life Science, Book Review, Divya Marathi

आरोग्यसंपन्न जीवनासाठी विज्ञान आणि अध्यात्म

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्यदायी जीवनशैलीची गुरुकिल्ली सांगताना विज्ञान, अध्यात्मासह आहाराचे शास्त्रीयदृष्ट्या विवेचन डॉ. कुलकर्णी यांनी केले आहे. छायाचित्रे, तक्ता, रेखाचित्रांद्वारा बरेच पैलू त्यांनी उलगडून दाखवले आहेत. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हिरेमठ, डॉ. अजित भागवत यांचाही या पुस्तकाला अभिप्राय मिळालाय. तर पारनेरकर महाराजांचे आशीर्वचन लाभलेय. तर, मधुमेहतज्ज्ञ डॉ. संजीव इंदूरकर यांनी शुभेच्छापर अभिप्राय दिलाय. मुखपृष्ठातही विज्ञान व अध्यात्म यांचा समन्वय साकारलाय. डॉ. कुलकर्णींनी अनुभवातून, चिंतनातून हे पुस्तक लिहिलेय.

प्रसन्नता, सकारात्मक दृष्टिकोन, हास्य हे मनं निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर हे इथे दर्शविले आहे. आयुर्वेदाच्या संकल्पनाही त्यांनी स्वीकारल्या आहेत. त्यांच्यावर संत शिकवणीचा पगडा आहे, हे दिसते. पुस्तकाचे अंतरंग कळण्यासाठी अनुक्रमणिकेवर नजर टाकल्यास सहज कल्पना येईल.

या पुस्तकात एकूण 39 प्रकरणे आहेत ती सुरुवातीपासून अशी आहेत. आरोग्यदायी जीवनशैली, आरोग्यदायी आहार- शास्त्रीय माहिती, शास्त्रीयदृष्ट्या आहारातील महत्त्वाचे घटक, आरोग्यासाठी शाकाहाराचे महत्त्व, व्यायाम : आरोग्यदायी मित्र, करिता सूर्यांशी नमस्कार, आरोग्यासाठी योगसाधना, आरोग्यासाठी ध्यानाचे महत्त्व, मन करा रे प्रसन्न, आरोग्यासाठी ईश्वर उपासना व प्रार्थना, हसा आणि निरोगी राहा, मद्यपानाचे दुष्परिणाम, व्यसनमुक्त जीवन : निरोगी जीवन, लठ्ठपणा सुटलेले पोट व मेटाबॉलिक सिंड्रोम हृदयरोगांसाठी धोक्याची कारणे, हृदयविकार भूत, भविष्य व वर्तमान, भारतीय व दक्षिण आशियायी व्यक्ंितमधील हृदयरोगासाठीचे धोक्याचे घटक, हृदयविकार व जीवनशैली, हृदयरोगनिवारण व संपूर्ण आरोग्यासाठी शास्त्रीय मंथने व संशोधन, हृदयरोग चिकित्सा व आधुनिक तंत्रज्ञान, व्हिटॅमिन डी कमतरता-डायबेटीस व हृदयरोगासाठी धोक्याचा घटक, मधुमेह व जीवनशैली, प्रीडायबेटीस म्हणजे काय, मधुमेह प्रतिबंध व त्यासाठी संशोधने व अभ्यास, हायपरटेन्शन, पॅरालिसीस अर्थात अर्धांगवायूचा झटका (धोक्याचे घटक व जीवनशैलीत बदल), होय आपण किडनी विकार टाळू शकतो, अ‍ॅलर्जी, दमा व श्वसनविकार-काय काळजी घ्यावी, वयाच्या चाळिशीनंतर होणारे आजार-घ्यावयाची काळजी, संत साहित्य व वैदिक परंपरेनुसार आरोग्य संकल्पना, संपूर्ण, डायबेटीस व हृदयविकार - राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमधील विचारमंथन, आरोग्यासाठी पर्यावरण व स्वच्छतेचे महत्त्व, आरोग्यमित्र परिवार, बीड - आरोग्य शिक्षण व तपासणी उपक्रम, अमेरिकन तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून आरोग्यदायी जीवनशैलीसाठी संशोधन, विविध योगासने, फ्रॅँमिंगहॅम हार्ट स्टडीनुसार रिस्क स्कोअर अशी सर्व रुग्णोपयोगी प्रकरणे यात आहेत.

लेखक - डॉ. डी. एस. कुलकर्णी
प्रकाशन - रजत प्रकाशन, औरंगाबाद
पृष्ठसंख्या - 184, मूल्य - 190 रुपये