आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृद्धत्व आणि अँटी ऑक्सिडंट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले शरीर आपणास एक वाटत असते, पण त्याच्या अंतर्गत भागात अगणित पेशींचे जिवंत अस्तित्व असते. प्रत्येक पेशी आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. आपण घेतलेले अन्नपाणी, प्राणवायू शरीरभर फिरून पेशीत जाऊन पोहोचतात व पेशींमधील एनर्जी कायम राखतात. पेशींमधील नको असलेल्या रसायनांना ऑक्सिडंट्स अथवा फ्रीरॅडिकल्स म्हणतात. त्यांचा निचरा करण्याचे काम अँटी ऑक्सिडंट्स करतात. त्याचा समतोल बिघडल्यास अँटी ऑक्सिडंट्स प्रमाण कमी पडते व पेशींची कार्यक्षमता कमी पडते. नंतर वार्धक्याचे दुष्परिणाम चालू होतात.
याशिवाय कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी हृदयविकार व रक्तवाहिन्यांवरील घेतलेल्या औषधांनीदेखील पेशींची कार्यक्षमता कमी होते. सिगारेट, दारू ही व्यसने व हवेतील प्रदूषण हीसुद्धा महत्त्वाची कारणे आहेत.

आपल्या आहारात शरीरास पोषक असणारे, शरीराची झीज भरून काढणारे, वाढ करणारे, घटक असतात. त्यापैकी फॅट्स, प्रोटिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट, पाणी आपल्या शरीराचा एक भाग होऊन राहतात. विविध बायोकेमिकल्स हा समतोल राखण्यास मदत करतात. व्हिटॅमिन्स, एन्झाइम्स, को-एन्झाइम्स हार्मोन्स इत्यादींचा यात समावेश असतो. प्रत्येक पेशीमध्ये अनेक घटक कार्यक्षम असतात. त्यापैकी टोकॉड्रियामध्ये ऊर्जेचा भरपूर साठा असतो. वृद्धापकाळात दुखण्यामुळे व अशक्तपणामुळे अँटी ऑक्सिडंट्स खूपच कमी झालेले असतात. पार्किनसन्समुळे पेशंटची अवस्था फारच परावलंबी होेते. याशिवाय न्यूरॉलॉजिकल्स, रक्तदाब, मूत्रपिंडाची दुखणी, डायबिटीस या सर्वांसाठी अँटी ऑक्सिडंटस उतारवयात घेणं अत्यंत जरुरीचे आहे.

त्यामुळे उतारवयातील आजारांवर घेतलेल्या औषधांचा दुष्परिणाम अँटी ऑक्सिटंट्सच्या एका गोळीमुळे नक्कीच टाळू शकतात.पौष्टिक तसेच चौरस आहारात हिरव्या भाज्या, सफरचंद, केळी, पेरू, पपई, संत्री, मोसंबी इत्यादी फळे, द्विदल धान्य, दही, अक्रोड, बदाम, अंजीर, पिस्ता, शंगदाणे इत्यादींचा समावेश होतो. हाडे बळकट करण्यासाठी कॅल्शियम व त्याचे शरीरात नीट पोषण व्हावे म्हणून व्हिटॅमिनही घ्यायला पाहिजेत. अँटी ऑक्सिडंट्समध्ये सर्व व्हिटॅमिन्सशिवाय लायकोपेन, सेले नियम असतात. सध्या बाजारात tricobal, renezre, absulutसारखे अँटी ऑक्सिडंट्स मिळतात.


शेवटी तेल, तूप, मीठ आणि साखर यांचा मर्यादित वापर असलेले अन्न खावे, सात्त्विक आहारांमुळे पचनशक्ती व ग्रहणशक्ती टिकून राहते. हृदयविकार, डायबिटीस व स्थूलता तसेच कॅन्सर इत्यादी व्याधींमध्ये आहारात बदल करावा. सकाळी फिरणे, योगा करणे नक्कीच तुम्हाला आजारांपासून दूर ठेवील व तुम्ही आनंदी जीवन जगाल.