आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल अकादमी ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट (एनएएआरएम), हैदराबाद येथे उपलब्ध असणाºया कृषी व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या 2013-2015 या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी- उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी कृषी, कृषी अभियांत्रिकी, कृषी व्यवस्थापन, कृषी विपणन व सहकार, दुग्धोत्पादन, मत्स्योत्पालन, अन्य प्रक्रिया, वन विकास व व्यवस्थापन, फलोत्पादन, पशुवैद्यक यासारख्या विषयातील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय विद्यापीठ अनुदान आयोग किंवा भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे घेण्यात येणारी कॉमन एंट्रन्स टेस्ट 2012 ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.

विशेष सूचना : जे विद्यार्थी, उमेदवार वर नमूद केल्याप्रमाणे असणाºया पदवी पात्रता परीक्षेला बसणार असतील तेसुद्धा या अभ्यासक्रमासाठी. प्रवेश अर्ज करू शकतात, मात्र त्यांनी इतर पात्रतेची पूर्तता करणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना त्यांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व ‘कॅट, सीमॅट’ प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे समुह चर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येईल. अभ्यासक्रमासाठी निवडक 30 विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येईल.

माहिती व तपशील : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल अकादमी आॅफ अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च मॅनेजमेंट, हैदराबादच्या www/naam.ernet.in/pgdma या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठवण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ती कागदपत्रे आणि तपशिलासह असणारे अर्ज जॉइंट डायरेक्टर अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अँड रजिस्टार, नॅशनल अकादमी आॅफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट (एनएएआरएम), राजेंद्रनगर, हैदराबाद 500030 या पत्त्यावर पाठवण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2013.

कृषी वा संबंधित क्षेत्रातील पदवी पात्रताधारकांना याच विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासह आपले करिअर करायचे असल्यास त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम फायदेशीर ठरू शकतो.
............................................

मॅनेजमेंट ऑफ बिझनेस फायनान्स व फेलो प्रोग्रॅम

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्स, नोएडा येथे उपलब्ध असणा-या मॅनेजमेंट ऑफ बिझनेस फायनान्स व फेलो प्रोग्रॅम इन बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या विशेष अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागवण्यात येत आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांनी पदवी परीक्षा कमीत कमी 50% गुणांसह (महिला व राखीव गटातील उमेदवारांनी 45% गुणांसह) उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा. याशिवाय त्यांनी सीएटी, एक्सएटी, एआयएए, एमएटी, सी-एमएटी, जीएमएटी यासारखी प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.

निवड प्रक्रिया ­: अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना त्यांच्या पदवी परीक्षेतील टक्केवारी व प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकांच्या आधारे मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.

अभ्यासक्रमांचा कालावधी : वर नमूद केल्यापैकी मॅनेजमेंट ऑफ बिझनेस फायनान्स या अभ्यासक्रमाचा कालावधी 2 वर्षे असून, फेलो प्रोग्रॅम इन बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या अभ्यासक्रमाचा कालावधी 3 वर्षे.

अर्ज व माहितीपत्रक : घरपोच हवे असल्यास 1,250 रु.चा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्सचा नावे असणारा व दिल्ली येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.

अधिक माहिती व तपशील : या अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्स http://registration.iif.edu या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठवण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्स, ए-10, सेक्टर-83, नोएडा, उत्तर प्रदेश 201305 या पत्त्यावर पाठवण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2013.

ज्या पदवीधरांना वित्तीय सेवा वा आर्थिक क्षेत्रात पदव्युत्तर पात्रतेसह पुढे करिअर करायचे असेल, अशांनी या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणे फायदेशीर ठरू शकते.