आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निष्ठावान संगीतयात्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रवींद्र जैन हा यमकांचा सोस न धरता प्रचलित, पण आशयघन शब्दांतून माणसांचं साधं सोपं नि निरागस जगणं गीत-संगीतात उतरवणारा निष्ठावान संगीतयात्री. त्यांच्या संगीतकृतींनी जितका सुरांचा गोडवा जपला, तितकाच जगण्यात आवश्यक असलेला ठहरावही टिपला...

सत्तर-ऐंशीच्या दशकात रेडिओ तुफान फॉर्मात होता. त्या वेळी विविधभारती आणि रेडिओ सिलोन ही दोन स्टेशन्स (आताच्या भाषेत चॅनेल) लोकप्रिय होती. विविधभारतीवर दुपारच्या वेळी जुनी गाजलेली गाणी लागायची. त्या वेळी रवींद्र जैन हे नाव नेहमी कानावर पडायचे. गीतकार आणि संगीतकार अशा दुहेरी भूमिकेत हा कलाकार रसिकांच्या मनात रेंगाळायचा, तो त्याच्या भावपूर्ण, आशयसंपन्न, साध्या, सोप्या व मनात घर करणाऱ्या गीतरचनांमुळे. गोरी तेरा गाँव बडा प्यारा मै तो गया मारा आके यहाँ रे... असे ग्रामीण जगण्याचे यथार्थ वर्णन असो, की अखियों के झरोखे से मैने देखा जो साँवरे... असा नितळ भाव असणारे गाणे, अशा िकती तरी मधाळ गीतांमुळे रवींद्र जैन यांनी रसिकांच्या मनात स्थान मिळवले. मध्यमवर्गीय जािणवा-नेिणवांना आपल्या लेखन कौशल्याच्या बळावर गीतांत उतरवणे, हे जैन यांच्या गाण्याचे आगळे वैशिष्ट्य. त्यातही यमकांचा आग्रह न धरता, सोप्या परंतु आशयघन शब्दांतून फुललेली अनेकानेक अवीट गोडीची गाणी रवींद्र जैन पर्वाची साक्षीदार म्हणून रसिकांच्या मनात आजही रुंजी घालत आहेत.
संस्कृतचे गाढे अभ्यासक व आयुर्वेदाचार्य पंडित इंद्रमणी जैन व किरण जैन या दांपत्याला एकूण सात मुले व एक मुलगी. त्यातील एक मुलगा जन्मत:च अंध. त्याचे नाव रवींद्र. त्याला लहानपणापासून संगीताची प्रचंड आवड. घरात भजन सुरू झाले की, लहानगा रवींद्र सहजपणे ठेका धरायचा. जैनांचे सारे घराणे उच्चविद्याविभूषित. मोठ्या भावंडांपैकी पंडित महिंद्र कुमार जैन हे आयुर्वेदाचार्य, डी. के. जैन हे तिसरे बंधू टाइम्स समूहाचे संचालक, आणखी एक भाऊ औष्णिक विद्युत केंद्रात अभियंता, एक भाऊ कॅनडात व्यावसायिक आहे. रवींद्रने मात्र अंधत्वावर मात करत लहानपणापासून गीत-संगीताची आवड मनापासून जोपासली. त्याच्या पालकांनी त्याची आवड पाहून त्याला रीतसर संगीताचे शिक्षण देण्याचे ठरवले. पंडित जी. एल. जैन, पंडित जनार्दन शर्मा व पंडित नथुराम यांच्याकडून रवींद्रने संगीताचे धडे घेतले. त्या वेळी स्वत: भजने रचून ती गाण्यात रवींद्र नेहमी आघाडीवर असायचा. कालांतराने पार्थभूषण भट्टाचार्य यांनी रवींद्र यांना अलिगढ येथून मुंबईला आणले. त्यांच्या क्रांती व बलिदान या चित्रपटांना रवींद्र जैन यांनी संगीत दिले. त्यानंतर मात्र आपल्या प्रतिभेच्या जोरावर जैन यांनी चित्रपटसृष्टीत जम बसवला.
शशी कपूर, मुमताज यांचा “चोर मचाए शोर’ (सिप्पी फिल्म्स)हा रवींद्र जैन यांचा पहिला सुपरहिट चित्रपट. यातील ले जाएंगे ले जाऐंगे, दिलवाले दुल्हनियाँ ले जाऐंगे, घुँगरू की तरह बजता ही रहा हूँ मै... आदी गाणी खूप गाजली.

डॉ. के. जे. येसुदास, हेमलता, जसपाल सिंग या गायकांबरोबर जसे जैन यांचे िवशेष ट्युनिंग जुळले, तसेच राजश्री प्रॉडक्शनबरोबरही त्यांचे सख्य जमले. मग राजश्री व रवींद्र जैन हे जणू सुरेल समीकरणच होऊन गेले. सचिन-सारिका या जोडीचा राजश्रीचा ‘गीत गाता चल’ या चित्रपटाला रवींद्र जैन यांच्या गीत-संगीताने चार चाँद लावले. यातील गीत गाता चल ओ साथी, शाम तेरी बन्सी पुकारे राधा नाम आदी गाण्यांनी रसिकांच्या मनात कायमचे घर केले. त्यानंतर आलेल्या ‘चितचोर’मधील मधाळ गीतांनी खरोखरच रसिकांचे चित्त चोरले. राजश्रीच्याच ‘अखियों के झरोकों से’ या प्रेमपटाला जैन यांच्या भावपूर्ण गाण्यांनी असे सजवले की, त्यांचे संगीत अधिक चांगले की गीतरचना सरस, यावर रसिकांत पैजा लागल्या.
‘शो मन’ राज कपूरने जैन यांच्यातील प्रतिभा अचूक हेरली. त्या वेळी ते ‘राम तेरी गंगा मैली’ बनवत होते. राम तेरी...ची जबाबदारी मोठ्या विश्वासाने त्यांनी रवींद्र जैन यांच्यावर सोपवली. तुझे बुलाए ये मेरी बाहे, राम तेरी गंगा मैली हो गयी, हुस्न पहाडों का यांसारखी एकाहून एक सुरेख गीते देत जैन यांनी आरकेचा विश्वास सार्थ ठरवला. त्यामुळेच पुढे ‘आरके’चा ‘हीना’ जैन यांना मिळाला. मै हूँ खूशरंग हीना, देर ना हो जाये, मरहबा सय्यदी, चिठ्ठीए यांसारख्या गाण्यांनी त्यांनी या हीनाचा रंग आणखी खुलवला. जन्मत: अंध असताना त्याचे भांडवल न करता जिद्दीने आपल्या लेखनकौशल्याने नटलेली गाणी अनेक डोळसांना मार्गदर्शक ठरली.
कामाशी प्रामाणिकपणा राखणे हे रवींद्र जैन यांचे ठळक गुणवैशिष्ट्य. ‘सौदागर’चे (अमिताभ, नूतन) संगीतसंयोजन सुरू असताना जैन यांच्या वडिलांचे निधन झाले होते. मात्र त्या शिफ्टचे काम पूर्ण करूनच जैन अंत्यसंस्काराला गेले. गीत-संगीत म्हणजे रवींद्र यांचा जीव की प्राण. आपले संगीतदिग्दर्शनाचे काम जीव ओतून करणे, तसे करताना सुरांतला गोडवा तसूभरही कमी होऊ न देता रसिकांसमोर हसतहसत पोहोचवणे, हे रवींद्र जैन यांचे जीवनविषयक तत्त्व. त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर- गीत गाता चल ओ साथी, गुनगुनाता चल...
kajaykulkarni@gmail.com