आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रपट महा‘गोंधळ’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘अखिल भारतीय चित्रपट शाखा आणि कोल्हापूर नाका’ या अवस्थेला कंटाळून मुंबईतील चित्रपट निर्मात्यांनी महामंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महा‘गोंधळ’ घालून महामंडळाला वेठीस धरले. एरवी दुय्यम दर्जाचे शेकडो चित्रपट काढून निर्माता म्हणून पाठ थोपटवून घेणा-या सभासदांची दूरदृष्टी असून असून कुठवर असणार, याचा प्रत्यय महामंडळाच्या प्रत्येक सभेला येऊ लागला.

‘बा’चा‘बा’ची, हाणामारी, धमकी अशा रंगलेल्या सभेने नळावरच्या भांडणाचे स्वरूप केव्हाच धारण केले आहे. आता सभेत फक्त आरोप-प्रत्यारोपांच्या फे-या झडतात. नुकतेच निर्मात्यांनी महामंडळाच्या मुंबई कार्यालयाला टाळे ठोकले (स्वत:च्या खिशातून, हे विशेष) आणि स्वतंत्र विदर्भासारखी स्वतंत्र मुंबई (कार्यालयाची) मागणी धरून ठेवली. टेबलाच्या अलीकडचे आणि पलीकडचे असा सरळसरळ भेद झाला आणि मग सुरूझाले तुंबळ युद्ध! कोल्हापूरकर ५२ मुंबईकर अशी फायनल मॅच चांगलीच रंगणार, असे वाटते आहे. कारण या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांचा धनी होऊ इच्छिणारा ‘अध्यक्ष’ अजूनही निवडला जायचा आहे. एकुणातच या सर्कशीचा रिंगमास्टर कोण होईल हे ठरले, की या गोंधळाचा उत्तरार्ध पाहायला मिळेल. तोवर चांगभलं.