आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॅडी देशमुख, लोककवींच्या प्रेरणेतून घडताहेत प्रतिभावंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला.-येथील स्थानिक श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे निर्माता, दिग्दर्शक कै. डॅडी देशमुख यांच्या पुढाकाराने 1999 मध्ये मराठी विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या अंगी असणार्‍ या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना योग्य असं व्यासपीठ मिळावं म्हणून विद्यार्थी मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना करण्यात आली. पुढे लोककवी विठ्ठल वाघ यांच्या पुढाकाराने त्यास मोठ्या प्रमाणात चालना दिली. सध्याही प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांच्या मार्गदर्शनात मराठी वाङ्मय मंडळाची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षामध्ये नव्याने मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना केली जाऊ लागली. विद्यार्थीच विद्यार्थ्यांना समोर आणण्याच्या उद्देशाने स्वत: पुढाकार घेऊन आपली रुची दाखवत असल्याने प्राध्यापकांनीही आपल्या योगदानाची त्यामध्ये भर टाकली, असे ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभत असल्याने विद्यार्थ्यांचा जोश वाढीस लागला. त्या माध्यमातून अनेक महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त साहित्यिक प्रबोधनात्मक कार्यक्रम होऊ लागले. विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा होऊ लागल्या. यामध्ये अनेक विद्यार्थी विद्यापीठस्तरीय, राज्य व राष्‍ट्रीय स्तरावर चमकले. त्यामुळे महाविद्यालयाचे नाव नेहमीच चर्चेत राहले.
विविध उपक्रमांतून मिळते लेखणीला बळ : नवोदित साहित्यिकांनी कार्यशाळा, विद्यार्थी कविसंमेलन, आविष्कार, शासकीय ग्रंथालयांना भेटी, प्रकाशन संस्था, वैचारिक संस्थांना भेटी, ज्येष्ठ साहित्यिकांना मंडळामार्फत महाविद्यालयात बोलावणे, ग्रंथदिंडीचे आयोजन, नवपुस्तक प्रदर्शन भरवणे, नाट्य कार्यशाळेचे आयोजन यासारख्या बर्‍ याच कार्यक्रमांची रेलचेल मराठी वाङ्मय मंडळ विद्यार्थ्यांमार्फत सुरू असते. या विविध कार्यामुळे महाविद्यालयास नॅक पुनर्मूल्यांकन ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे कॉलेज विथ पोटेंशियल फॉर एक्सलन्स दर्जा मिळण्यास मराठी वाङ्मय मंडळाचा खारीचा वाटा आहे.
शिवदर्शन’मधून घडते
विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे दर्शन

मराठी वाङ्मय मंडळामार्फत विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेमध्ये राज्यपालांच्या सूचनेनुसार विद्यार्थी घडवून ‘मराठी भाषा’ या प्रमुख विषयासाठी विद्यार्थी निवडले जातात. यासाठी प्रा. सुलभा खर्चे, प्रा. विनय पैकिने, प्रा. संजय पोहरे हे नेहमी मार्गदर्शन करताना दिसतात. दरवर्षी मराठी वाङ्मय मंडळामार्फत ‘शिवदर्शन’ वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात येते. यामध्ये अनेक विद्यार्थी आपले विचार मांडतात. त्यामुळे नवोदित लेखकांना, कवींना चालना मिळते.

कार्यकारिणी :
अध्यक्ष - स्वप्निल इंगोले, उपाध्यक्ष - प्रशांत ठाकरे, सचिव - नीलेश इंगळे, सहसचिव - ज्ञानेश्वर वाशीमकर, सदस्य- कल्याणी मामनकार, भाग्यश्री पटेल, रेश्मा परनाटे
ओळख महाविद्यालयीन मराठी वाङ्मय मंडळाची-
शिवाजी महाविद्यालय मराठी वाङ्मय मंडळ, अकोला