Home | Magazine | Akshara | All India Marathi Sahitya Sammelan

वाङमयीन प्रकार, कर्तृत्वासह साहित्यानुभवामुळेच इच्छुक

पीयूष नाशिककर, नाशिक | Update - Aug 04, 2017, 03:01 AM IST

९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पडघम वाजू लागले अाहेत. संमेलन दिल्लीत हाेणार अशीही शक्यता निर्माण झाली अाहे.

 • All India Marathi Sahitya Sammelan
  (फाइल)
  ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पडघम वाजू लागले अाहेत. संमेलन दिल्लीत हाेणार अशीही शक्यता निर्माण झाली अाहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चार साहित्यिकांनी अापली उमेदवारीही जवळपास जाहीर केलेली अाहे. त्यात सध्यातरी विदर्भ विरुद्ध पुणे असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत अाहेत. कारण नागपूरचे डाॅ. रवींद्र शाेभणे, वर्ध्याचे किशाेर सानप तर पुण्याचे रवींद्र गुर्जर अाणि राजन खान यांची उमेदवारी असणार अाहे. या साहित्यिकांनी अापल्या उमेदवारीविषयी भूमिका मांडताना काहींनी सांगितले की, वाङमयीन प्रकार अाणि कर्तृत्वाला संधी मिळावी तर काेणी म्हणाले की, अामचे साहित्यातील काम बघावे तर काेणाला भाषेच्या प्रसार अाणि प्रचारासाठी उमेदवारी महत्त्वाची वाटते. पुढील महिन्यात संमेलनस्थळ निश्चित झाल्यावर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात हाेणार अाहे.
  पुढील स्लाइडवर, साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांची भूमिका...

 • All India Marathi Sahitya Sammelan
  रवींद्र गुर्जर
  अनुवादक म्हणून माझी ३५ पुस्तके बेस्ट सेलर अाहेत. अाजपर्यंत अनुवादक अध्यक्ष झालेला नाही. म्हणजे ताे उपेक्षित राहिला अाहे असे नाही. अनुवादित पुस्तके माेठ्या प्रमाणावर वाचली जातात. पण, एवढे माेठे पद त्याला मिळाले नाही म्हणून मी ही निवडणूक लढविणार अाहे. कथा, कादंबरी, संस्कृत, तंत्रज्ञान अशा सगळ्याच वाङमयीन क्षेत्रात भ्रमंती अाहे. पुस्तक छपाईचा अनुभव अाहे. गेली ४० वर्षे मी साहित्य क्षेत्रातच कार्यरत अाहे. चार मासिकांच्या संपादनाचे काम करताे. उच्चशिक्षित अाहे. पटकथा लेखन केले अाहे. युवक क्रांती दलापासून अनेक संघटनांशी संबंधित अाहे. समर्थ व्यासपीठ, समरसता साहित्य परिषद, ग्रंथघर चळवळीतून तर कमी खर्चात पुस्तक, पुस्तक विक्री याचे मार्गदर्शन हाेते. तर ग्रंथालय भारती वाचनालयाच्या माध्यमातून वाचनालयाचे प्रश्न साेडविण्याचे काम हाेते. अनुवाद विषयावरही मार्गदर्शन कार्यक्रम सुरू अाहे. युराेप अाणि लंडनमधील मराठी मंडळांना एकत्र करून वेगळ्या प्रकारचे कामही सुरू अाहे. निवडणुकीच्या दृष्टीने यंत्रणाही अाहे. त्यादृष्टीने अामची तयारीही सुरू झालेली अाहे. म्हणून मी अध्यक्षपदासाठी इच्छुक अाहे. 
 • All India Marathi Sahitya Sammelan
  राजन खान
  वयाच्या १५-१६ वर्षांपासून मी साहित्य सृष्टीत काम करत अाहे. अक्षरमानव संघटनेच्या माध्यमातून तर हे काम जाेरात सुरू अाहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले तर त्या पदावरून हे काम अधिक विस्तारित हाेईल अाणि विविध पातळ्यांवर विकासात्मक व भले हाेण्याच्या दृष्टीने, सामाजिक सामंजस्य वाढण्याच्या दृष्टीने बाेलण्याची ही चांगली जागा असल्याचे मी समजताे. या निवडणुकीकडे साहित्यातील राजकारण म्हणून अवमूल्यन म्हणून बघितले जाते. पण, जनमानसात या  पदाला एक स्थान अाहे. लाेकांसमाेर जाताना त्या पदाचा पाठिंबा असताे हे लक्षात घेतले पाहिजे. सध्यातरी पुण्याच्या साहित्य परिषदेने मला उमेदवारीसाठी सुचविले अाहे की, संमेलनात साहित्यिकांची पिछेहाट हाेत अाहे. तर तुम्ही उमेदवारी करा. पण अनेक व्यवधाने अाहे. अामचे यंदाचे बहुभाषा संमेलन श्रीनगरला अाहे, त्याची तयारी सुरू अाहे. तसेच मी पुण्यात डिसेंबर महिन्यात १० दिवसांची देशपातळीवरील पुस्तकजत्रा घेणार अाहे. त्यामुळे वेगळे गणितही महत्त्वाचे अाहे. तसेच वाईट राजकारण या संपूर्ण प्रक्रियेत व्हायला नकाेच, अशीही एक अपेक्षा अाहे. 
 • All India Marathi Sahitya Sammelan
  डाॅ. किशाेर सानप
  मराठी भाषेला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही हे भारतीयांसाठी आणि मराठी भाषिकांसाठी लाजिरवाणे अाहे. त्यासाठी प्रयत्न करणार अाहे. दिल्ली परिसरात सात लाख मराठी भाषिक राहतात आणि भरपूर मराठी शाळाही आहेत. तरी दिल्ली विद्यापीठातून यंदा मराठी भाषेची अभ्यास शाखा इतर कन्नड तामिळ भारतीय भाषांसह बंद करण्यात आली हा मराठी भाषा आणि मराठी व भारतीय भाषा  शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय आहे. त्याविरुद्ध लढा उभारणार अाहे.  मराठी भाषेवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तरी यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीतच होणे अत्यंत आवश्यक आहे. तसे झाल्यास  विचारपीठावरूनच आम्ही मराठी भाषा साहित्य समाज आणि अस्मितेचे प्रश्न मांडू आणि वेळ आलीच तर संमेलनानंतर आम्ही आंदोलनही उभारू. असे सगळे करत असताना मात्र साहित्यात राजकारण येता कामा नये अशा स्पष्ट मताचा मी अाहे. शुद्ध दृष्टीचे लाेक या संपूर्ण प्रक्रियेत असले पाहिजे असे वाटते. एकूणच मराठी भाषेचे अस्तित्व, तिचा प्रचार अाणि प्रसार यासाठी मी माझी उमेदवारी जाहीर केली अाहे. 
 • All India Marathi Sahitya Sammelan
  डाॅ. रवींद्र शाेभने
  गेल्या १० ११ वर्षांपूर्वी कादंबरीकार अरुण साधू साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले हाेते. त्यानंतर एकही कादंबरीकार अध्यक्ष झालेला नाही. कथाकार, कवी, समीक्षक झाले पण कादंबरीकार नाही हा प्रमुख मुद्दा अाहे. तसेच अनेक वर्षांपासून मी लेखन करत अाहे. त्यामुळे अाता अापण हे पद घेण्यास सक्षम असल्याची भावना अाहे. गेली दाेन-तीन वर्षे मी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासांठी अर्ज करताे अाणि मागे घेताे. पण, साहित्यविश्वातील माझे हितचिंतक अाणि साहित्यिक मित्रांनीही मला ही निवडणूक लढविण्यासाठी उद्युक्त केल्याने मी निवडणूक लढविणार अाहे. वाङमयीन कर्तृत्व, कादंबरी, कथाकार अाणि समीक्षक म्हणून मला विविध माेठे पुरस्कार मिळालेले अाहेत. अातापर्यंत ४० पुस्तकांची साहित्यनिर्मिती मी केलेली अाहे. या सगळ्या साहित्य व्यवहाराच्या बळावरच ही निवडणूक मी लढविणार अाहे. ही निवडणूक सरळ पार पडावी, त्यात काेणत्याही प्रकारचे राजकारण हाेऊ नये असे वाटते अाणि मतदारांनीही उमेदवाराचे वाङमयीन कर्तृत्व अाणि अनुभव बघूनच हे मानाचे पद त्या व्यक्तीकडे साेपविले पाहिजे, अशी अपेक्षा अाहे.

Trending