आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसार माध्यमे आणि मुलांचा सर्वांगीण विकास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रात्री किंवा दिवसभर व्हिडिओ गेम्स, टीव्ही याचा परिणाम अभ्यासावर आणि वर्तणुकीवर झालेला दिसून येतो. वर्तमानात जगताना आजची पिढी खरोखरच प्रगल्भ किंवा परिपूर्ण आहे का, यावर विचार करण्याची वेळ आली आहे. याबाबतीत ब्रिटनचे उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे. त्यांनी सर्व शाळांमधील व्हिडिओ गेम्स, प्लेबॉक्स काढून टाकले आहेत. याला अर्थातच पालकांचाही पाठिंबा आहे. बालमानसशास्त्रानुसार सतत टीव्ही बघणे किंवा मोबाइलवर गेम्स खेळल्यामुळे मुले त्या व्यक्तिरेखेत  रमू लागतात. त्या व्यक्तिरेखा आजूबाजूला असल्याचे त्यांना वाटते किंवा त्या व्यक्तिरेखा आपणच आहोत हे ते समजू लागतात. त्यामुळे ते स्वमग्न होण्याचा धोका निर्माण होतो. पालकांनी किंवा घरातील सदस्यांनी टीव्ही न बघण्याचा निश्चय केला तर अनेक गोष्टी टळू शकतील. त्यासाठी मुलांना वाचन, खेळणे या सवयी लावल्या पाहिजे. आजकाल अनेक शहरात लहान-मोठ्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी घरपोच वाचनालय लावले जाते. त्यात एक खेळणे व एक पुस्तक असे स्वरूप असते. विशिष्ट वयोगटासाठीही हा उपक्रम राबवला जातो. खेळणी/पुस्तकांचं वाचनालय हा टीव्ही वा मोबाइलला उत्तम पर्याय आहे.  विशेष मुलांनाही याचा फायदा होतो. वेगवेगळी खेळणी किंवा पुस्तके मुलांना खेळण्यास, वाचण्यास मिळतात. मुलांना वाचनाची आवड निर्माण होते. 
 
दक्षा पाटील
बातम्या आणखी आहेत...