Home | Magazine | Madhurima | Ambika Takalkar short story

अन चांदने उन्‍हात हसले

Ambika Takalkar short story अन चांदने उन्‍हात हसले एक दिवस दाईचा फोन येतो, बाळ चंद्र मागतंंय, काय करू? ती अचंबित हो | Update - Oct 10, 2017, 12:03 AM IST

हीकथा आहे आजच्या अन् नजीकच्या वर्तमानकाळातली. एक हायटेक नगर असते. सिमेंटची उंच उंच जंगले, गुळगुळीत रस्ते, त्यावर भरधाव ज

 • Ambika Takalkar short story
  एक दिवस दाईचा फोन येतो, बाळ चंद्र मागतंंय, काय करू? ती अचंबित होते. नवऱ्याला फोन करते. तो पण संभ्रमित. स्वत:ला सावरत Developmental Psychologistला फोन करतो. ती आधी गडबडते. पण काहीही न दाखवता दोन मिनिटे विचार करते. आणि आनंदाने चित्कारते, ग्रेट. ग्रेट. ग्रेट. Congrats. अभिनंदन. It’s time to celebrate. Let’s have a party. Your child will become an astronomer....

  हीकथा आहे आजच्या अन् नजीकच्या वर्तमानकाळातली.
  एक हायटेक नगर असते. सिमेंटची उंच उंच जंगले, गुळगुळीत रस्ते, त्यावर भरधाव जाणाऱ्या गाड्या, रस्त्यांवर तुरळक दिसणारे आणि आपापल्या घरा-ऑफिसांतून बंदिस्त राहणारे लोक. अशाच एका उच्चशिक्षित आणि सधन कुटुंबातील मुलगा आयआयटीमध्ये प्रवेश करतो. अभ्यासात खूप हुशार, नेहमी पहिला नंबर ठरलेला. त्याच कॉलेजमधील हुशार, सुंदर, उच्चशिक्षित कुटुंबातील मुलीशी प्रेम जमते. दोन्ही घरांतून कसलाही विरोध नसतो. पण कॉलेज पूर्ण करून, दोघेही व्यवस्थित स्थिर झाल्याशिवाय लग्न न करण्याचा निर्णय घेतात. दोघेही चांगल्या मार्कांनी पास होतात. दोघांनाही चांगला जॉब, सुपर पॅकेज, घसघशीत पगार. जीवनाची एक लढाई जिंकली दोघांनी.
  यथावकाश २ वर्षांनंतर लग्न करतात.
  समाजात एक सुखी जोडपे आपल्या संसाराची सुरुवात करते. दुसऱ्या लढाईची सुरुवात झालेली असते. त्यामुळे दोघेही बिझी. सतत बारा-बारा तास काम करण्याशिवाय गत्यंतर नाही. दोन वर्षांच्या नियोजनानंतर छोट्या पावलांची चाहूल लागते. दिवसही मग भराभर उलटू लागतात. एका मोठ्या पंचतारांकित रुग्णालयात बाळाचा जन्म होतो. सगळेच पूर्वनियोजित. मग बाळाच्या भविष्यासाठी मोठे सेव्हिंग्ज, भरपूर विमा योजना, गुंतवणूक, वगैरे. समजदारीची आणखी एक चुणूक. मग या सगळ्या गरजा भागवण्यासाठी तो अधिकच बिझी होतो. तिला पण स्वतःच्या करिअरची ओढ असतेच आणि संसाराला हातभारही लावायचा असतो ना नवीन जबाबदाऱ्या पार पाडायला. मग बाळाचे काय करणार?
  जिथे इच्छा तिथे मार्ग असतोच ना.

  दोघेही एका नामवंत Developmental psychologistकडे जातात. त्यांचे सगळे बोलणे ऐकून ती त्यांना म्हणते, ‘नो प्राॅब्लेम. माझ्याकडे नेहमी अशीच जोडपी येत असतात. त्यांची गरज बघूनच मी ही कन्सल्टन्सी चालू केली आहे. आमच्याकडून तुम्हाला बाळाला सांभाळणाऱ्या प्रशिक्षित आणि स्मार्ट दाई देऊ. त्या तुमच्या बाळाचे सर्व काही करतील. त्याचे वेळापत्रक आम्ही बनवलेले असते. त्याप्रमाणे त्याचा आहार काय असावा, कधी झोपणार, कधी उठणार, कधी जेवणार, सगळे काही अॅज पर शेड्यूल असेल. त्याला वेळच्या वेळी औषधे, लसीकरण मिळेल, त्याचा मानसिक आलेख वेळोवेळी घेतला जाईल. त्याची वाढ परफेक्ट आणि छान व्हावी यासाठी अगदी रिसर्च डाटा आमच्याकडे आहे. तेव्हा अजिबात काळजी करू नका. आता ते तुमचे बाळ नाही तर ती आमची केस आहे. तुम्ही फक्त फी भरा आणि निर्धास्त व्हा.’

  मग काय एक काळजी मिटली. आणखीन एक मोठी जबाबदारी पार पडल्याचा आनंद दोघांच्या चेहऱ्यावर झळकतो. आणि आणखीन एक हप्ता भरण्याची धावपळ. पुन्हा दोघेही करिअरच्या विश्वात बिझी. एकमेकांना भेटण्यासाठीही वेळ नाही तिथे बाळासाठी कुठून वेळ मिळणार? बाळ एक केस बनूनच मोठे होत असते. घरात कोणत्याच गोष्टीला कमी नसते. बाळाच्या दाईला सांगितलेले असते की, बाळाला काहीही पाहिजे तर द्या, पण त्याला रडवू नका. एकेदिवशी तिचा आईला फोन येतो की, बाळ पिझ्झासाठी हट्ट करतंय. ती सांगते, फोन करून मागवून घे. फोन करून पिझ्झा मागवला जातो. अजून दातही न आलेले बाळ फक्त टीव्हीवर बघून पिझ्झा मागत आहे. ते कसे खाणार, याचा पण विचार शिवत नाही मनाला.

  असेच काही दिवस जातात. एक दिवस परत दाईचा फोन येतो की, बाळ चंद्र मागतंंय, काय करू? ती अचंबित होते. त्याला फोन करते. तोपण संभ्रमित होतो. लगेच स्वत:ला सावरून तो Developmental Psychologistला फोन करतो. ती आधी गडबडते. पण काहीही न दाखवता दोन मिनिटे विचार करते. आणि आनंदाने चित्कारते, ‘ग्रेट. ग्रेट. ग्रेट. Congrats. अभिनंदन. It’s time to celebrate. Let’s have a party. Your child will become an astronomer. इतक्या लहान वयात त्याला चंद्र हवा आहे. Wow. Amazing. Great. एक नवीन शोध. बघा आमच्या कंपनीचा परफॉर्मन्स. येस्स. आता हा आमचा ब्रँड अँबेसेडर असेल.’

  बाळ बिचारे चंद्र चंद्र करून रडून थकून झोपी जाते. इकडे आपापल्या ऑफिसात दोघेही खूप आनंदित. सहकाऱ्यांबरोबर पार्टी करतात. असेच काही दिवस जातात. एक दिवस अचानक तिच्या संध्याकाळच्या मीटिंग्ज कॅन्सल होतात. तिला लवकर सुटी मिळते. मग ती रात्री लवकर घरी येते. बाळ झोपलेले असते. ती दाईला विचारते, ‘बाळ केव्हा झोपले?’ दाई म्हणते, आम्ही त्याची झोपायची वेळ ठरवली आहे. त्याप्रमाणे तो अर्ध्या तासापूर्वी झोपला.’ ती कुतूहलाने विचारते, ‘कसे झोपवलेस?’ उत्तर येते, टीव्हीवर आमच्या कंपनीने तयार केलेली सीडी पाहत पाहतच तो झोपतो. तिला अभिमान वाटतो आपण आपल्या बाळाला योग्य संगोपन देत असल्याचा.

  ती सोफ्यावर आरामशीर बसते. टीव्ही ऑन करते, थोडा वेळ चॅनल्स बदलून कंटाळा येतो. मग आपले बाळ कोणती सीडी पाहत असेल या कुतूहलापोटी ती डीव्हीडी ऑन करते. बघता बघता खुश होते. पुढे पाहत राहते आणि अचानक पाहता पाहता स्तब्ध होते. तिला काय करावे सुचत नाही. डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. किती तरी वेळ ती तशीच बसून राहते. बाळाला उराशी कवटाळते. पटापटा मुके घेते त्याचे. बाळही थोडेसे चाळवते झोपेत. सुखावते. ती खूप खूप रडते. रात्री बऱ्याच उशिरा तो घरी येतो. पाहतो तर ती जागीच. रडून रडून तिचे डोळे सुजलेले असतात. तो मनात चरकतो. काय झाले म्हणून तिला विचारतो. ती त्याला घडलेले सगळे काही सांगते आणि एक निर्णयही सांगते. तो हबकतो. तिची समजूत काढायचा प्रयत्न करतो. पण ती ऐकत नाही. मग तो तिच्या निर्णयावर विचार करतो. त्यालाही पटते आणि तो तिला पूर्ण पाठिंबा देतो. दुसऱ्या दिवशी ती नेहमीप्रमाणे कंपनीमध्ये जाते आणि नोकरीचा राजीनामा देते. सगळ्या स्टाफला धक्का बसतो. तिचा बॉस तिला बोलावतो. समजावतो.

  ‘इतक्या चांगल्या पोस्टवर तू आहेस, चांगला पगार आहे. मग राजीनामा का देत आहेस?’
  ती उत्तरते, ‘मी दीड वर्षापूर्वी आई बनले. पण आईपण अनुभवू शकले नाही. आता मला माझ्या बाळाची संपूर्ण आई व्हायचे आहे. I want to experience complete motherhood.’ बॉसही निरुत्तर होतो. तिला शुभेच्छा देतो. ती खूप समाधानाने आणि एक निर्धार करून संध्याकाळी लवकर घरी येते. बाळाची झोपेची वेळ झालेली असते. दाई नेहमीप्रमाणे सीडी लावत असते. ती तिला थांबवते. बाळाला कडेवर घेऊन गच्चीवर जाते. आकाशातला चंद्र दाखवत, पाठीवर ममतेने हळुवार थोपटत अंगाई गाते. ‘लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही...’
  - अंबिका टाकळकर, औरंगाबाद, ambikanidhu@gmail.com

Trending