आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नि:संकोच निरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाही पटत नवरदेवासाठी पायघड्या, वरमंडळींचे पाय धुणं. कन्येचं कोर्ट मॅरेजच करावं. कुणीकडचेच उपचार नकोत. वधूवरांची मानसिकता लग्नविधीतून घडणार तर सर्वांच्या सोयीने करा छोटासा सोहळा. घरच्यांनी खंबीर राहिलं तर काय नाही होत? मुलीकडचे पडलो, बघायला येऊ नको कसं म्हणायचं? मायच्या प्रश्नावर भाऊ ठाम म्हणाले, स्थळच पसंत नाही तर दाखवायचा कार्यक्रम नाहीच. उगाच दाखवण्या-बघण्याचे माझ्या वेळी नाहीच झाले. मुलगी पाहिजे म्हणून तीन मुलांनंतरही उत्सुकतेने मला जन्म देणा-या बाबांना कोण कौतुक. नेहमीच मला आवडणारा
पदार्थ आधी मला देत, नंतर मोठ्या भावांना. घरावर माझंच नाव, आता माझ्या भाच्यांच्या गाड्यांवरही आत्याचं नांव रंगवलंय...
लग्नमंडपातल्या गप्पांनी माझं लक्ष वेधलं. घरच्यांच्या मानसिकतेमुळे गृहिणी किती आत्मविश्वासाने बोलत होती. मुलीला नापसंतीचा अधिकार असायलाच हवा हे ठामपणे मांडत होती.
मनात आले ते बोलणार, उत्तर खिलाडूपणाने स्वीकारणार असं ठरवल्यावर ब-याचशा समस्या उद्भवणारच नाहीत. मुलींची भीड मोडावी. इति ताई. भाचीच्या मित्रमंडळाने म्हटले, विद्यापीठात शिकवणारी मावशी आलीय तर प्रोजेक्ट्स बघायला बोलवायचंस ना... तिच्या कॉलेजमध्ये जाणं मला केव्हाही आवडलंच असतं, अगदी गुरुजींनापण घेऊन गेले असते मुलांसाठी. वाटलं स्वत:हून कसं विचारायचं.
रविवारी भेटतायत तर त्यांचे प्लान्स असणारच, आपल्या व्याख्यानबाजीची अडचण. भाचीला बरोबर उलटं वाटलेलं, इतक्या वर्षांनी आलीय एक दिवसासाठी, कार्यक्रम ठरलाय तर कॉलेजला येतेस काय विचारायचं... स्पष्टवक्त्या. माझी भीड जर अशी तर भिडस्त म्हणवणा-यांचे काय. ताईच्या भिशीसख्या स्पष्ट बोलण्याचा तिचा आदर्श घ्यावा म्हणतात, काहींना खटकतं पण मनात सडलेल्या विचारांनी स्वत:चंही किती नुकसान होतं, कित्येक सायकोसोमॅटिक आजारांस निमंत्रण... ताईचं म्हणणं खरं होतं. केवळ आरोग्याचेच नाही, इतिहासातही परिवर्तन घडले असते स्पष्ट बोलण्याने असे आज पंढरपूर-दर्शन वाचताना जाणवले. म्हणे, पुंडरिकाकरवी विठू-विष्णू-स्थापना होऊन नावारूपाला येण्यापूर्वी एक क्षेत्रीय देवी तिथे मान्य असावी. कालांतराने वाद नको म्हणून बुजुर्गांनी केली तिला विठोबाची पत्नी. तिचे मंदिर अबाधित ठेवण्यास रचली रुक्मिणी-रुसव्याची कथा. वाद नको म्हणून स्वतंत्र अस्तित्व असलेल्या देवीला कोण्या नव्या बाबाची बायकोच करायचे? सहकारी का नाही होऊ शकत? गोव्यातल्या देवदेवता बरे करून राहतात तर. मंगेशराव शांतादुर्गेबरोबर, कधी महालसेबरोबर तर कधी महालक्ष्मीबरोबर. कधी देवीप्रधान तर कधी देवीपालवी, प्रसंगोपात्त जसे नेतृत्व तशी उपाधी. संस्कृती मुक्ता म्हणून तिकडे असे की अशा संस्कृतीने त्या समाजात मोकळेपण असेल? जीवनसाथींचे मैत्र हा मला तिथल्या वातावरणातला नेहमीच भावलेला घटक.
लग्नाशिवायची मैत्री खटकू नये, माहेरच्या मित्रमैत्रिणींवर गदा येऊ नये असे कीर्तीचे मत पटले. वाढदिवसाच्या निमित्ताने तरी बघायला येते तुझं ऑफिस, म्हटल्यावर आमोदने लवकर ये, एक-दोघींना थांबवलेय, त्यांना वेळ नको घरी परतायला म्हटलेले आठवले. केवळ मुलगा-मुलगी निखळ मित्र म्हणून सहसा भेटूच नाही शकणार असे रत्नागिरीचे दिवस. कर्वे शिक्षण संस्थेत मोकळे वातावरण.
मी नि आमोद आमच्या कॉलेजमध्ये कधीही भेटू शकलो. वसंतकुमारी, सुब्बलक्ष्मी यासारख्यांच्या जीवनात पुरुषसत्तेने केलेली उलथापालथ... वसंतकुमारीना स्वत: कमावून वाया गेलेल्या नव-याच्या हौशी पुरवाव्या लागल्या, सासरचे प्रोत्साहन असते तर सुब्बलक्ष्मी खानदानी-शास्त्रीय-संगीतात अजूनही कित्येक योजने पुढे पोहोचल्या असत्या. लग्नाने त्रासलेल्यांची कित्येक उदाहरणे म्हणून लग्न करूच नये असे नाही. संसारसुख, ज्यामध्ये शरीरसंबंध, मातृत्व, जबाबदा-या, अशा अनुभवांसाठी विवाह हा समाजमान्य पर्याय. उपलब्ध अनुभवांना सामोरे जावे, शिक्षण होते, सकारात्मक भूमिकेतून मार्ग सापडतो हे एका सखीचे बोल ऐका.
पुरुषयंत्राच्या नि:संकोच स्वतंत्र वृत्तीने स्त्रीयंत्राची प्रगती साधल्याचे काही प्रसंग उपोद्घातात योजतेय. पॉर्नसाइट्सचा उपयोग या लेखाच्या प्रतिसादात त्या साइट्समध्ये दिसणारी माणसे सामान्य नसून ती कोणत्यातरी अमलाखाली आहेत हे जाणून घे असे गुरुजींनी सांगितले. पॉर्नोग्राफिक साहित्य दाखवून वाचकाने कोणते भान ठेवावे हेही स्पष्ट केले. आक्काला लग्नानिमित्त बाबांनी विठ्ठल वाघांचे पुस्तक आणल्याचे सांगितलेच. दामोदरच्या विचित्र प्रश्नांनी, मीमांसेने विचारांना चालना दिली. शिव्यांचा अर्थ, लैंगिक-भावना-उद्दीपन-समायोजन, अनर्थाध्याय ही काही उदाहरणे. अद्वययोगाने परदेशी कलाकार, इतर देशांचे इतिहास-संस्कृती, काही प्रमाणात इंग्लिशही. रितेशसाठी उपनिषद-वाचन. घाटगेसर, रट्टीहळ्ळीसर, कुलकर्णीसर, प्रसादसर यांची कौटुंबिक संबंध जपण्याची, मुलींना-पत्नीला प्रोत्साहन देण्याची कला, कठीण काळात व्यावसायिकतेसह मन:स्वास्थ्यही जपण्याचे वस्तुपाठ; रॉयसर म्हणालेले, स्त्रीला पुरुषसत्तेचा त्रास होतो हे आदिम दु:ख, जास्तीत जास्त मोकळेपणाने वागून ते कमी करण्याचा प्रयत्न करूया, ते संपेलच असे नाही. त्यांच्या केवळ समंजस विचारानेही बरे वाटलेले. मुलींची पारंपरिक भूमिका फार नाही बदलता येणार असे म्हणतानाच माझ्या प्रयोगांचे वेगळे जगलेल्यांच्या कथा सांगून चिलेसरांनी केलेले कौतुक. पदर पसरणे हा वाक्प्रचार पुरुषांना वापरता येईल का, या गुरुजींच्या प्रश्नातून भाषेकडे पाहण्याची मिळालेली नवी दृष्टी, उदय-चारू-संजीवसारख्यांसोबतचे डोळस शिक्षणाचे प्रयोग, अंधश्रद्धा निर्मूलन, संमोहन, पर्यावरणासह अनेक सामाजिक प्रश्नांचे भान आणि योगदान. ट्रेकिंग, फोटोग्राफी, लेखन, सादरीकरण हे आणि असे कितीतरी माझ्या व्यक्तिमत्वातले पैलू फुंकरीने फूल उमलवावे तसे जगदाळेसर, पवारसरांनी विकसित केलेले. कांबळेसरांविना मला माझेही अक्षर कौतुकास्पद होईल, मलाही चित्रकला, रंगकाम, रांगोळी असे उपद्व्याप जमतील हे कसे कळावे? मैदानात, व्यायामशाळेतही उत्साही असावे, शिस्त, देशभक्ती, समाजसेवा यांचाही अभ्यास करावा हा संस्कार हिरेमठ सरांचा. नेतृत्व छंदाला हेरून त्याद्वारा सहाध्यायींच्या सह माझी अनेकांगांनी प्रगती साधण्याचे कौशल्य कित्येक शिक्षकांनी साधले. बेटा म्हणून प्रेमाने जिंकण्याचा, अंतर्यामी मृदुतेचे रोप लावण्याचा भेंडवडे सरांचा खटाटोप. तस्सेच ऋण संगीताच्या नवांगुळे सरांचे, शिकणारच म्हणतेस तर शक्य तितके बळ पुरवूच आम्ही म्हणून सतत उपलब्ध. नाटक, अभ्यास, भटकंती सर्वत्र, स्थळकाळाचा, स्त्रीत्वाचा विचार स्पर्शिला नाही आमच्या चाळ-सोबतींना. तिथे मला चारचौघींपेक्षा वेगळा विश्वास मिळाला. इंजिनिअरिंग-ड्रॉइंग समजले की शिवणकामाचे पॅटर्न्स येतात; सुतारकाम, इलेक्ट्रिफिकेशन असे जीवनोपयोगी बरेच आपल्याला आलेच पाहिजे; गणित, संस्कृत केवळ मार्कांसाठी नाही, अभ्यास म्हणून, नापास झालात तर आवृत्तीरस म्हणत पुन्हा अभ्यासा; लाकूड ते, प्रेताला काय घाबरायचे? मृत्यूचे दु:ख नको, गीतापठणाने मनोधैर्य मिळवा; लौकिकार्थाने विक्षिप्त पण प्रसंगी उपयोगाचे बोल बाबांकडून ऐकले. मंदारची व्रात्यता तशी परितोषची बुद्धिमत्ता. मुलग्यांच्या मुलींपेक्षा वेगळ्या भावविश्वाचे दर्शन घडले. विस्कटलेल्या संसारातही मुलीला मुलांबरोबर वाढू देणा-या आईला दाद द्यायला हवी.
रुखवतात सप्तपदी, चुड्यासह आईचा निरोप, बाबांचा आशीर्वाद अशी गमतीदार भर बघून कधी संपणार रडे असे वाटले. नयनच्या लग्नातला वधूवरांनी लिहिलेली प्रदर्शनीय पत्रे हा रुखवत आठवला, सहजीवनाची केव्हाच सुरुवात झालेली...