आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोले : बडे नसीबवाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंगात १०२ ताप असूनही ‘शोले’त काम मिळेल, या आशेने पार्टीत सामील अमिताभकडे कुणाचं लक्षही नव्हतं. त्या वेळी कुणीतरी वितरक रमेश सिप्पीच्या कानात कुजबुजला होता, यही है आप की स्टारकास्ट, उस लंबुजी का सोचना भी मत…
"शोले'च्या अख्ख्या टीममध्ये नशिबाने दान पदरात पडलेले दोनच नट होते. त्यातला एक अमजद खान आणि दुसरा अमिताभ बच्चन. रमेश सिप्पीने ‘शोले’च्या निर्मितीला हात घातला, तेव्हा "फ्लॉप' असा शिक्का बसलेला अमिताभ अक्षरश: रिकामटेकडा बसलेला होता. कुणीही निर्माता-दिग्दर्शक त्याला काम देण्याचा धोका पत्करत नव्हता. तसा तो रमेश सिप्पीसुद्धा पत्करायला तयार नव्हते. सिप्पींच्या मनात ‘रामपूर का लक्ष्मण’ आणि ‘भाई हो तो ऐसा’मुळे रातोरात स्टार बनलेल्या शत्रुघ्न सिन्हाला जयच्या भूमिकेसाठी साइन करण्याचं घाटत होतं. वडील जी. पी. सिप्पींनी त्यांच्या घराच्या टेरेसवर जवळच्या मित्रांसाठी पार्टी ठेवली होती. या निमित्ताने त्यांना त्यांच्या मनातली स्टारकास्ट एकत्र आणायची होती. तशी ती आलीसुद्धा. धर्मेंद्र, हेमामालिनी आणि शत्रुघ्न सिन्हा हे त्या पार्टीत प्रामुख्याने झळकत होते, त्यांच्यावरच फोटोग्राफर्सचे कॅमेरे रोखलेले होते. पण अंगात १०२ ताप असूनही ‘शोले’त काम मिळेल, या आशेने पार्टीत सामील अमिताभकडे कुणाचं लक्षही नव्हतं. त्या वेळी कुणीतरी वितरक अमिताभकडे बघत रमेश सिप्पींच्या कानात कुजबुजलाही होता, यही है आप की स्टारकास्ट, उस लंबुजी का सोचना भी मत… त्यावर सिप्पींच्या चेहऱ्यावर सूचक हास्यही उमटलं होतं, पण पुढे एकापेक्षा एक तगड्या कलावंतांची यादी लांबत गेली, तसे रमेश सिप्पी सावध झाले, सगळं काही सांभाळून घेता येईल, पण या स्टार लोकांचे अहंकार कोण सांभाळेल? सलीम-जावेदने शांत आणि अंतर्मुख स्वभावाच्या अमिताभचं नाव पुढे केलं. धर्मेंद्रने त्याला दुजोरा दिला आणि तोवर फ्लॉप ठरलेला लंबुजी जयच्या भूमिकेत अलगद शिरला…"शोले’तला जयच्या मरणाचा सीन आयकॉनिक नव्हे, तर पुढे येणाऱ्या अमिताभच्या अनेक सिनेमांच्या यशाचं परिमाणही ठरला…