अँड्राइड डिव्हाइस बनवा / अँड्राइड डिव्हाइस बनवा सुरक्षित

दिव्य मराठी प्रतिनिधी

Aug 10,2012 10:23:09 PM IST

गेल्या काही दिवसांत हॅकर्स अँड्राइड डिव्हाइसला आपले लक्ष्य बनवत असल्याच्या बातम्या पसरत आहेत. अशावेळी या उपकरणांचे संरक्षण कसे करावे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. उपकरणांचा धोका आणखीनच वाढतो, जेव्हा तुम्ही एखाद्या वेबसाइटवरून अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करता. बहुतांश वेळा व्हायरस वापरून पर्सनल माहितीवर धोका देण्याचा संभव निर्माण झालेला असतो. त्यानंतर तुम्हाला आर्थिक नुकसान पोहोचवण्यात येते. अशा धोक्यापासून आपला बचाव करता येतो.
पासवर्ड ठेवा योग्य : तुमच्या अँड्राइड बेस गॅजेटची सुरक्षितता प्रारंभीच त्याच्या सेटिंग्जपासून करा. तुमच्या पासवर्डला संरक्षण द्या. यासाठी डिव्हाइसला ऑटो लॉकचे सेटिंग करा. यासाठी कोणत्याही अ‍ॅप्लिकेशनची गरज नाही. कारण हे काम सेटिंग, लोकेशन आणि सिक्युरिटीच्या माध्यमातून करू शकता. पासवर्ड विचारपूर्वक बनवा. यात अक्षरासोबत आकड्याचाही वापर करा.
सुरक्षित स्रोताचा वापर करा : इंटरनेटवर अँड्राइड सिस्टिमसाठी अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करण्याचे सर्व पर्याय उपलब्ध आहेत, पण त्याचे स्रोत सुरक्षित नाहीत. तेव्हा अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करताना सावधगिरी बाळगा. असे न करणे अँड्राइड सिस्टिमसाठी धोकादायक ठरू शकते. तुम्ही जे अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड कराल त्याबाबत पूर्ण माहिती असू द्या. जर तुम्हाला काहीही गडबड वाटली तर ते अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करूच नका. कारण त्याच्यातील कटेट डिव्हाइसला धोका पोहोचवू शकतात.
कॉमेंट सेक्शनवर लक्ष द्या : प्रत्येक अ‍ॅप्लिकेशनच्या खाली युजर्स काही ना काही कॉमेंट्स लिहितात. अशा स्थितीत अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करण्यापूर्वी सर्व काळजीपूर्वक वाचा. यामुळे तुम्हाला माहिती होईल की, ते अ‍ॅप्लिकेशन बरोबर आहे किंवा नाही. अ‍ॅप्लिकेशनच्या खाली लिहिलेले कॉमेंट्स बनावट असू शकतात. जर तुम्ही काळजीपूर्वक वाचल्यास तुम्हाला ते अ‍ॅप्लिकेशन योग्य किंवा अयोग्य हे ताबडतोब कळेल. जर सर्व कॉमेंट्समध्ये अ‍ॅप्लिकेशनला योग्य असल्याचे म्हटले असेल तर समजून घ्या की, ते अ‍ॅप्लिकेशन बनावट आहे.
सतत अपडेट करत चला : अँड्राइड निर्माता सातत्याने माहिती अपडेट करतात. ही माहिती तुमच्या अँड्राइड डिव्हाइसला सुरक्षित बनवण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. अँड्राइड सिस्टिमच्या साइटवर जाऊन त्याचे सिक्युरिटी फीचर्स अपडेट करत चला. आठवड्यातून एकदा तरी याच्या वेबसाइटवर आलेला लेख जरूर वाचा.
अँटिव्हायरसचा वापर करा : व्हायरसच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी अ‍ॅप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअरचा वापर जरूर करा. इंटरनेटवर अनेक अँटिव्हायरस उपलब्ध आहेत. त्यात मोबाइल सिस्टिम्स, सिक्युरिटी शिल्ड, वेब सिक्युरिटी आणि इव्हिजी अँड्राइड अँटिव्हायरस उपलब्ध आहे. हे अँटिव्हायरस सध्याच्या मेमरी फाइल्स, मेमरी कार्डस, ई-मेल आणि वेब कंटेटला सुरक्षितता प्रदान करते.

X
COMMENT