आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य यात्रा: यंदाचेे अंकुर साहित्य संमेलन अकोल्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘प्रस्थापितांचा सन्मान, नवोदितांना प्रोत्साहन’ हे ब्रीद असलेले साहित्यप्रेमी, नवसाहित्यिकांचे हक्काचे व्यासपीठ असणारे अंकुर साहित्य संमेलन यावर्षी अकोल्यात रंगणार आहे. येत्या २७ व २८ ऑगस्ट रोजी रिंगरोड परिसरातील जानोरकर मंगल कार्यालयात ५५वे अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलन होत आहे.
जमिनीत पेरलेली बी अंकुरल्यानंतर जशी त्याची काळजी घ्यावी लागते, त्याचप्रकारे साहित्य क्षेत्रातील नवोदित साहित्यिक हे एक अंकुरच असतात. त्यांच्या लिखाणाला प्रसिद्धीद्वारे खतपाणी देणे, साहित्य संमेलनाचे व्यासपीठ देऊन प्रोत्साहन देणे, शिवाय पुरस्कार देऊन कौतुक करणे अशा एक ना अनेक बाबी अंकुर साहित्य संघ गेली अनेक वर्षे करत अाहे. म्हणूनच अंकुर साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षपद भूषवलेल्या अनेक साहित्यिकांनी पुढे अखिल भारतीय साहित्य संमेलनातही अध्यक्षपद भूषवले आहे.

अंकुर साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष हिंमत शेगोकार यांचे ऑगस्ट २०१५मध्ये निधन झाले. त्यामुळे त्यांच्या स्मृतीत यंदा हे संमेलन ऑगस्टमध्ये हाेते अाहे. पहिल्या दिवशी दुपारी उद‌्घाटन सत्रानंतर दोन दिवस विविध सत्र असतील. यात कथाकथन, गझल, प्रकट मुलाखत, निमंत्रितांचे कविसंमेलन, उपस्थितांचे कविसंमेलन असे विविध सत्र अन‌् परिसंवादातून विविध विषय हाताळले जातील. यंदा संमेलनाचे अध्यक्षपद प्रा. डॉ. फुला मारोतीराव बागुल भूषवतील, स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. संतोष हुशे असतील. १९८६ साली वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथे स्थापन झालेल्या या साहित्य संघाचे राज्यभर हजारापेक्षा अधिक सभासद आहेत. या ३० वर्षांत अकोला जिल्ह्यात २० साहित्य संमेलन, वाशिम जिल्ह्यात ७, अमरावती जिल्ह्यात ६, सोलापूर जिल्ह्यात ३, यवतमाळ जिल्ह्यात ३, हिंगोलीत २ संमेलने झाली. तर मुंबई, परभणी, वर्धा, नांदेड, सातारा, पुणे आणि गोवा येथे एकदा झाले आहे. या ५४ साहित्य संमेलनांतून जवळपास १५ हजारांपेक्षा अधिक नवोदित साहित्यिकांचे शब्दांकुर अाज वृक्ष झाले अाहेत. प्रत्येक संमेलनात कथा, कविता, गझल, ललित, बालसाहित्य, समीक्षक, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कृत केले जाते. जिल्ह्यात सध्या १५० सभासद असून, अध्यक्षपदी तुळशीराम बोबडे, कार्याध्यक्ष अरविंद भोंडे, प्रभारी सचिव हिंमत ढाळे, उपाध्यक्षा स्वाती पोटे, सहसचिव सय्यद अहमद, उपाध्यक्ष विनय मिरासे, कविता राठोड, डॉ. शांतीलाल चव्हाण तर विदर्भ विभागप्रमुख प्रदीप चौधरी, उत्तर महाराष्ट्र विभागप्रमुख एस. एम. उज्जैनकर, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख हसन देसाई, मराठवाडा प्रमुख डॉ. जब्बार पटेल, कोकण प्रमुख मीनाताई खंडाळे, गोवा विभागप्रमुख चित्रा क्षीरसागर, कर्नाटक विभागप्रमुख रमा मराठे आहेत. तर संघटक म्हणून शिवराज जामोदे व मंगला नागरे हे काम पहात आहेत.
यांनी भूषवले अध्यक्षपद : आतापर्यंत झालेल्या साहित्य संमेलनात अनेक दिग्गज साहित्यिकांनी अध्यक्षपद भूषवले आहे. यात डॉ. यशवंत मनोहर, सिंधूताई सपकाळ, प्रा. फ. म. शहाजिंदे, प्रा. भगवान भोईर, प्रतिमा इंगोले, नामदेव कांबळे, श्रीकृष्ण बेडेकर, डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. विठ्ठल वाघ, मलिका अमर शेख, प्रा. फ. मुं. शिंदे, शंकर सारडा, डॉ. प्रा. विलास डोईफोडे, स्व. जगदीश खेबूडकर, डॉ. सय्यद जब्बार पटेल, मेघना वसंत वाहोकार, डॉ. रमेश वरखेडे, डॉ. शोभा रोकडे, डॉ. शंकर राऊत, रवींद्र बगाडे, रामदास डांगे, प्रा. सदानंद मोरे, शुभांगी भडभडे, प्रा, इंद्रजित भालेराव, डॉ. श्रीपाल सबनीस, माधवी कुंटे यांनी अध्यक्षपद भूषवले अाहेे.
बातम्या आणखी आहेत...