आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीर्घकालासाठी प्रतिजैवकांचे (अ‍ॅँटिबायोटिक्स) उपचार, त्याचे दुष्परिणाम आणि आयुर्वेद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या देशात प्रदूषण, स्वच्छतेचा अभाव, लोकसंख्येची घनता या कारणांनी दूषित हवा, अन्न-पाणी यामुळे जंतुसंसर्गाने (इन्फेक्शन) होणारे आजार अधिक प्रमाणात आढळतात. यासाठीच्या उपचारात प्रतिजैवकांचे योगदान व महत्त्व मोठे आहे. जेव्हा ती अल्पावधीसाठी जसे की पाच किंवा सात दिवसच घ्यावी लागली तर त्यांचा दुष्परिणाम शरीरास विशेष जाणवत नाही, परंतु जेव्हा जंतुसंसर्ग हा वारंवार होतो किंवा जास्त काळ टिकून राहातो. जखम, शस्त्रकर्म अशा काही कारणांनी ही प्रतिजैवके अधिक काळ घ्यावी लागतात तेव्हा त्यांच्या दुष्परिणामांची माहिती घेणे जरुरी होते.

काही दुष्परिणाम हे अ‍ॅँटिबायोटिक्सनुसार व शरीराच्या अवस्थेनुुसार वेगवेगळे दिसतात. मग ते कदाचित त्या प्रतिजैवकाच्या माहितीपत्रकात नमूद केलेले नसतील, परंतु त्यांचे कार्य बघितल्यास काही गोष्टी आपल्या लक्षात येतील.

1) प्रतिजैवके ही त्या त्या जंतूंचा नाश करत असल्याने आजार बरा होतो, परंतु त्याबरोबर मोठ्या आतड्यातील उपकारक बॅक्टेरियाही नष्ट होतात. हे जंतू पचलेल्या आहाररसाचे विघटन व शरीरात शोषण करण्यास मदत करतात, परंतु हे उपकारक जंतू नष्ट झाल्यास शरीरात पचन झालेल्या अन्नाचे शोषण नीट न झाल्याने जीवनसत्त्वांचा अभाव निर्माण होतो. 2) ही औषधे उष्ण व तीक्ष्ण असल्याने रक्ताबरोबर जेव्हा ती फिरतात तेव्हा उष्ण रक्ताचा परिणाम निश्चितच शरीरास जाणवतो. 3) ही औषधे घेतल्यावर ताबडतोब दिसणारे दुष्परिणाम जसे पचनक्रिया बिघडणे, जुलाब, मळमळ, उलट्या, अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन काही रुग्णामध्ये दिसतात. तर दीर्घकाल घेतल्याने दिसणारे परिणाम हळूहळू किंवा कालांतराने जाणवतात यात - तोंड येणे, हार्मोन्सचे असंतुलन, पांडुता, यकृत, प्लीहेवर परिणाम, अस्थी व अस्थिमज्जेवरही विपरीत परिणाम होतो. डोळे लाल, कोरडे होणे, केस गळणे, विरळ होणे, शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊन वारंवार जंतुसंसर्ग होतो. हृदय फुफ्फुसावरही उष्ण रक्ताचा कमी अधिक प्रमाणात विपरीत परिणाम होतो. म्हणून दीर्घकाल प्रतिजैवके घेताना पुढील काळजी घ्यावी.

1.कल्चर व सेन्सिटीव्हिटी ही प्रयोग शाळेतील तपासणी योग्य त्या अ‍ॅँटिबायोटिकची निवड होण्यासाठी केली गेली पाहिजे किंवा जंतुसंसर्ग बरा झाला का हेही यामुळे कळते व बराच वेळ जंतुसंसर्ग पूर्ण बरा होऊनही मागे काही लक्षणे राहतात जसे सूज, वेदना, लाली, खोकला मूत्रमार्ग दाह. अशा वेळेस प्रतिजैवके बंद करून आयुर्वेदीय औषधांचा वापर करणे योग्य ठरते.
2.शरीरातील बिघडलेल्या पचन व चयापचय क्रिया सुधारणे महत्त्वाचे असते.
3.जीवनसत्त्वांची कमतरता, पांडुता यावर योग्य औषधी घ्याव्यात.
4.उष्ण औषधांच्या परिणामामुळे वाढलेली उष्णता नाहीशी करण्यासाठी शीत गुणांची औषधे उपयोगी पडतात.
5.कोरडे व लाल होणार्‍या डोळ्यांवर पोटातून औषधे घेणे योग्य ठरते. हे उपचार कमीत कमी 2 ते 3 महिने करणे जरुरी आहे.
6.प्रतिजैवकांचे दुष्परिणाम हे व्यक्तीच्या वयानुसार, शरीराच्या अवस्थेनुसार प्रत्येकात वेगवेगळ्या स्वरूपात दिसतात, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
7.पंचकर्मातील बस्ती हे कर्म दुष्परिणाम नाहीसे करण्यास व आतड्यामध्ये उपकारक बॅक्टेरिया निर्माण करण्यास मदत करते तेव्हा योग्य त्या द्रव्यांचा बस्ती घेतल्यास फायदा होतो.
8.शरीर पूर्वीप्रमाणे आरोग्यवान होईपर्यंत जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक ठरते.