आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळाडूंसाठी अप्लाइड कायनेसिऑलॉजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्नायूवर परिणाम करणारे जे घटक (प्रकार) आहेत, त्यात प्रामुख्याने विचार करावा असे तीन घटक आहेत. मानसिक, शारीरिक आणि रासायनिक शरीराची अंतर्बाह्य गतिमानता ही अंतत: स्नायूवर निर्भर असते. त्यामुळे त्याचे अनेक दृश्य आणि अदृश्य असे परिणाम शरीरावर होत असतात. ते पत्यक्ष असतात तसे दुरान्वयानेही संभवतात. त्यामुळे अ‍ॅथलेटिक हालचालीसाठी स्नायूंचा विचार फार महत्त्वाचा ठरतो. दुखापत झाल्यावर तात्पुरत्या उपायाने स्नायूंवर उपचार करून थांबण्यापेक्षा त्याचे कारण दूर करण्याचा प्रयत्न करावा. वेदनाही शरीराची संरक्षक प्रतिक्रिया असते. दुखापत जोवर ख-या अर्थाने दूर होत नाही, तोवर वेदनेची जाणीव नष्ट होणार नाही. वेदना राहू देणे हे शारीरिक स्वास्थ्याला हानिकारक ठरते.


’     मानेचे स्नायू : ताणतणाव, अतिशय, मार लागणे यामुळे हे स्नायू ताठर होतात. पचन संस्थेतील अनेक समस्या, अपचन, गॅसेस, अतिसाखरेचा वापर या गोष्टी स्नायूंना बाधक ठरतात. मान धरणे तिच्या हालचालींवर नियंत्रण येणे, यामुळे ज्या खेळांत मानेचा वापर प्रकर्षाने होतो त्या सर्व खेळांवर या स्नायूंच्या कमकुवतपणाचा परिणाम होतो. रॅकेट आणि बॉल वापरावा लागतो. त्या खेळात बॉल फेकताना मानेचा तोल सावरावा लागतो. त्या वेळी उंच उडी मारताना बॉल पकडताना मान मागे करावी, फेकावी लागते. त्या वेळी मानेच्या स्नायूंची कार्यक्षम अवस्था उपयोगी पडते.(व्हॉलीबॉल,आर्चरी रोपिंग,रगवी इत्यादी खेळ), गोळाफेकसारख्या खेळात एकाच बाजूचा सतत वापर होतो. अशा वेळी मानेचे व्यायाम, वेट ट्रेनिंग जरूर करावे.


* खांद्याच्या परिसरातील पुढचे व मागचे स्नायू : ताणतणाव, अतिसराव, असमतोल आहार, सतत प्रवास करताना बसण्याची चुकीची पद्धत, टेबल खुर्चीवर बसून डोके सतत खाली करून काम करणे हे प्रकार खाद्याच्या स्नायूंवर परिणाम करतात. हे परिणाम हात काटकोनात डोक्याकडे अथवा पाठीकडे नेणे, या क्रियांवर मर्यादा आणतात. त्याप्रमाणे फ्रोजन शोल्डर किंवा हात खुळ्यांतून सरकणे, या प्रकारांना कारणीभूत होतात. एकमेकांवर अवलंबून असणा-या क्रियांमुळे या परिसरातील स्नायू आणि मानेचे स्नायू जर कार्यक्षम नसतील तर पुढील प्रकारावर त्याचा परिणाम होऊ शकेल. फिल्ड आणि ट्रॅक अव्हेंटस, शरीर वरच्यावर तोलून धरण्याचे, व्यायामाचे प्रकार, टेनिस सर्व्हिस, शॉटपर, बॉक्सिंग जॅव्हेलिन इत्यादी. चढण चढणे, जिम्नॅस्टिक आणि गोल्फ इत्यादी प्रकारातही खांद्याचे आणि मानेचे स्नायू कार्यक्षम असावे लागतात. सतत कॉफी पिणे, कॅफेनयुक्त पेयप्रकार घेणे, तळलेले चिप्स इत्यादी पदार्थ खाणे, यामुळेही या स्नायूंवर परिणाम होतो. या स्नायूंच्या कार्यक्षमतेवर क्षणार्धात आणि सर्वतोपरी विनासायास अशा शारीरिक हालचाली अवलंबून असतात.


* बाहू, मनगट आणि हात या ठिकाणचे स्नायू : अतिसराव (ओव्हर प्रॅक्टिस) किंवा एकच बाजू सतत वापरणे, हे प्रकार या स्नायूंना मारक ठरतात. तसेच रिफाइड, साखर आणि पीठ (मैदा) यांचे प्रकार एकूणच आरोग्य देण्यास कमी पडतात. (बेकरीचे पदार्थ, पेस्ट्री, केक्स, खारी इत्यादी.) बॉक्सिंग, रोपिंग, बेसबॉल, रॅकेट स्पोर्ट्स, जिम्नॅस्टिक्स, स्विमिंग, गोळाफेक हे प्रकार खेळणा-या व्यक्तींचे बाहूंचे स्नायू अत्यंत कार्यक्षम असावे लागतात. या स्नायूंना फटीग आल्यास हात कोपरात दुमडणे, ते वर नेऊन मागे पाठीवर घेणे, इत्यादी क्रियांवर परिणाम होतो. टेनिस एल्बोसारखे त्रास या स्नायूंची आरोग्याची पातळी चांगली नाही, हे सूचित करतात. पुशअप्स, बेंचप्रेस, शोल्डर प्रेस हे प्रकार आणि आहारात सुधारणा हे प्रकार या स्नायूंची कार्यक्षमता वाढवतात, राखतात.


* मनगटाचे स्नायू : हात सर्व बाजूंनी फिरणे, हॅँडल उघडणे, वस्तू उचलणे, बॅकहॅँड रॅकेट स्पोर्ट्स वगैरेसाठी लागणा-या क्रिया सुलभपणे होण्यासाठी या स्नायूंना दुखापत झाल्यास कार्पल टनेल सिंड्रोमसारख्या तक्रारी उद्भवतात. ब गटाच्या जीवनसत्त्वांची या दुखापतींमध्ये मदत होते. अंगठा आणि इतर बोटे यांना जोडणारे स्नायू अनके सूक्ष्म कामे पार पाडण्यासाठी या स्नायूंचा उपयोग होतो. खेळांपैकी गोल्फ, बॅकहॅँड, स्पीड वे क्रिकेट, रॅकेट स्पोर्ट्स, बेसबॉल यामध्ये हाताचे हे स्नायू कार्यक्षम असावे लागतात.


* पोटाच्या पुढील बाजूचे स्नायू : पाठीच्या कण्याला स्वस्थता देण्यासाठी, पचनसंस्थेला आधार देण्यासाठी शरीराचा वरचा भाग पुढे विनासायास झुकण्यासाठी हे स्नायू कार्यक्षम असावे लागतात. पोट सुटणे हा प्रकार पाठीच्या कण्याला मारक ठरतो. लिव्हरची कार्यक्षमता कमी होणे, ताण-तणाव, मद्यपान व असमतोल आहार यांचा परिणाम ढिलावण्यावर होतो. सीटअप्स, आलटून पालटून पायाचे अंगठे पकडणे, पाय वर करण्याचा व्यायाम (सर्वांगासन) यांच्या साह्याने पोटाच्या स्नायूंची कार्यक्षम अवस्था राखावी. ज्या खेळांत शरीरावर एकाच बाजूने भार पडतो, त्या खेळात (हॉकी, गोल्फ जॅव्हेलिन, हर्डलिंग इत्यादी.) हे स्नायू कार्यक्षम असावे लागतात.


* पोटाच्या वरच्या बाजूला छातीच्या परिसरात असणारे स्नायू (पेक्टोरालीस मेजर) : या स्नायूंमुळे हात वर घेऊन पार दुस-या कानापर्यंत सहजपणे नेता येतो. या क्रिया ज्युडो, क्रिकेट, फोरहॅड सर्व्हिस स्विमिंग, क्लायबिंग बोलिंग, हॉकी, गोल्फ इत्यादी प्रकारात आवश्यक असतात. पचनसंस्थेतील बिघाड आणि लिव्हरची कार्यक्षमता कमी होणे, अशा गोष्टी या स्नायूंना इजा पोहोचवण्यास कारणीभूत होऊ शकतात. त्यामुळे छातीत आणि खांद्याच्या परिसरात वेदना जाणवतात. भरपूर तेलात तळलेले पदार्थ, फरसाण, मदिरापान, कॅफेनयुक्त , कोलासारखे पेयप्रकार, बेकरीचे पदार्थ यांचा अतिरेक टाळावा.लिव्हरची कार्यक्षमता राखण्यासाठी उत्तम दर्जाची प्रोटिन्स अ जीवनसत्त्वाची मदत घ्यावी.


* डायफ्राम : श्वसनाला मदत करणारा हा स्नायूंचा पडदा पोट आणि छाती यामधला अंतरपाट आहे. पचनसंस्थेतील बिघाड, अ‍ॅसिडिटी, गॅसेस आणि ताणतणाव यामुळे डायफ्रामवर विपरीत परिणाम होऊ शकेल. डायफ्राम कार्यक्षम ठेवण्यासाठी सर्वसाधारणपणे स्नायूंचे आरोग्य राखणारा आहार आणि श्वसनाचे व्यायाम प्रकार डायफ्रामचे आरोग्य राखण्यास आवश्यक असतात.


* पाठीवरील भागाचे स्नायू : शरीरातील सर्वच कामांमध्ये एकजूट आणि सहकार्य असायला हवे आणि ते असते. पाठीच्या कण्याचे आरोग्य राखण्यासाठी आणि पाठीच्या दुखापतीचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगी पडते. पाठीचे आरोग्य पोटावर असणा-या स्नायूंच्या आरोग्यावर अवलंबून असते. पाठीचे आणि पोटाचे स्नायू कार्यक्षम ठेवल्यास खांदे, मान, फुफ्फसे, कोपरे, सायटिका या ठिकाणच्या वेदना टाळणे शक्य होईल. शरीराला बाक येणे, हातापायांना मुंग्या येण्याचे प्रकार टळू शकतात. यासाठी चांगला आहार असणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे वेट ट्रेनिंग, पुशअप्स, नौकासन, पाठीमागून वजन उचलून पुढे आणणे, भुजंगासन इत्यादी प्रकार स्नायूंना सुस्थितीत ठेवण्यास मदत करतील.


* ओटी पोटाचे (पेल्विक) स्नायू : या ठिकाणी असणा-या वेगवेगळ्या स्नायूंच्या कामगिरीचा विचार करताना असे सांगता येईल की, पाय उचलून पुढे टाकणे, धावणे, हॉपस्किप जंप करण्याचा प्रकार, एका पायावर तोल सांभाळणे यासाठी हे स्नायू कार्यक्षम असावे लागतात.


* मांडीच्या आतील आणि बाहेरील बाजूचे स्नायू : मांडीच्या आतील आणि बाहेरील बाजूचे एकूणच स्नायू कार्यक्षम असल्यास चढणीवर धावणे, घोड्यावर बसताना बैठक पक्की करण्यासाठी, पायाने ठोकर मारणे, मार्शल आर्ट फुटबॉल इत्यादी प्रकार विनासायास करता येतात.


* पोट-या-घोटे-तळपाय या ठिकाणचे स्नायू : या भागातील स्नायूंची कार्यक्षमता खालील प्रकारांमध्ये आवश्यक असते. उभ्या अवस्थेत स्प्रिंगप्रमाणे उडी मारून खेळाची सुरुवात करणे, चवड्यांवर उभे राहणे, लॉंग जंप, ट्रिपल जंप इत्यादी. वरील माहितीचा उपायोग केवळ अ‍ॅथलिटसनाच होईल, असे नाही तर इतर सर्वांनाच होईल. अ‍ॅथलेटिक हालचालींमध्ये शरीरातील प्रत्येक स्नायू कार्यक्षम असावा लागतो. स्नायूंचे फायबर्स (पेशी) बळकट होण्यासाठी व्यायामाची गरज असते. स्नायूंना पोषण देण्यासाठी समतोल आहारातील सर्व घटक हवे असतात.पोषक घटक वापरूनच स्नायूंच्या पेशी आपली कामे पार पाडत असतात. त्यामुळे त्यांना सतत हे घटक लागतच असतात. हे घटक त्यांना मिळवून देण्यासाठी पचनसंस्था कार्यक्षम असावी लागते. पचनसंस्था स्वत: अन्न घटकांपासूनच बनलेली असते. त्यामुळे तिलाही अन्नातून येणारे घटक लागतच असतात. शेवटी असाच निष्कर्ष काढावा लागतो की शरीराचे रसायनच ज्या अन्नापासून तयार होते तेच अन्न अ‍ॅथलेटिक आहाराचाही पाया मजबूत करते.
 या स्नायूंना कमकुवतपणा आल्यास


खालील प्रकार संभवतात :
लवकर थकणे, वारंवार पाय मुरगळणे, अडखळून पडायला होणे. सुधारित आहाराबरोबर पोट-यांचे व्यायाम, ऊठबशा, पायांच्या चवड्यांवर बाहेरील बाजूस दाब देऊन चालणे, हॉप स्कीप अँड जंप इत्यादी व्यायामप्रकार या स्नायूंना कार्यक्षम ठेवतात.