आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एआरटी सेंटर एचआयव्हीबाधितांचा मित्र

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - एचआयव्ही पॉझिटिव्ह म्हणून जगताना बहुतेकदा अज्ञान आणि गैरसमजापोटी एआरटी सेंटरकडून देण्यात येणा-या औषधांबाबत रुग्णांमध्ये जागरुकता नसते. याबाबतचे हे गैरसमज दूर होऊन एचआयव्हीला रोखण्यासाठी समाजात आणखी प्रबोधन होण्याची गरज आहे. या आजारात औषधांचा सातत्यपूर्ण मारा शरीराला शक्ती प्रदान करू शकतो.
एचआयव्हीबाधित म्हणून जगणा-या रुग्णांसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक एआरटी (अँटी रिट्रोव्हायरल थेरपी) सेंटर शासनाने स्थापन केले आहेत. नाशिक जिल्ह्यासाठीही दोन केंदे्र आहेत. यापैकी नाशिक शहरात एक आणि जिल्ह्यातील मालेगावमध्ये एक केंद्र आहे. भारतात अशी 200 केंदे्र आहेत. एचआयव्हीचा सामना करणा-या रुग्णांना केंद्रांमधून औषधांचा मोफत पाठपुरावा केला जातो. सद्य:स्थितीत 7390 रु ग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. यापैकी सुमारे 4 हजार रुग्ण एआरटीतून उपचार घेत आहेत. उर्वरित रुग्णांची नियमित तपासणीही सुरू आहे.
उपचार सुरू असताना
लक्षात ठेवा
> डॉक्टरांनी सांगितलेली औषधे नियमित घ्या
> औषधोपचार सुरू असताना कोणताही त्रास जाणवल्यास डॉक्टर किंवा समुपेशकांशी संपर्क साधावा
> दिशाभूल जाहिरातींवर विश्वास ठेवू नका
> नियमितपणे व्यायाम करा
> अंघोळ करताना रोज त्वचा नीट स्वच्छ करा
> सैल व वाळलेले कपडे घाला
> शौचालयातून आल्यानंतर व जेवणापूर्वी आपले हात साबणाने अवश्य धुवा
> कपडे, चादरी साबण व पाण्याने वारंवार धुवाव्यात, दात व जीभ रोज साफ करा
> नियमित व संतुलित आहार प्रतिकारशक्ती वाढवतो. दारू व तंबाखूचे सेवन टाळा
> अँटी रिट्रोव्हायरल औषधांची पती-पत्नी किंवा इतरांसोबत देवाणघेवाण करू नका
> स्वत:च परस्पर कोणतेही औषध घेणे टाळा. औषध सेवन करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचाच सल्ला घ्या, आपली औषधे आणण्यासाठी दरवेळी नातेवाइकांचा आधार घेऊ नका. कारण स्वत: गेलात तर तुमची तपासणी होईल
> डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात औषधे घेऊ नका
> औषधाचा डोस चुकवू नका. डोस चुकल्यास डॉक्टरांना प्रामाणिकपणे सांगा
> डॉक्टरांच्या सूचना तंतोतंत पाळा
> विडी-सिगारेट ओढणे, तंबाखू खाणे, मादक द्रव्यांचे सेवन किंवा इंजेक्शन घेणे टाळा. रोगप्रतिकारशक्तीवर त्यांचा दुष्परिणाम होऊ शकतो.
> घरगुती उपायांची माहिती करून घ्या, म्हणजे किरकोळ कारणांसाठी दवाखान्याकडे धाव घ्यावी लागणार नाही.
> इतर संधिसाधू आजारांची प्राथमिक लक्षणे जाणवताच डॉक्टरांचा सल्ला घ्या
> जुलाब आणि श्वसन दाह यांसारखे आजार होऊ नयेत यासाठी स्वच्छता आणि परिसर स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
> औषधोपचार सुरू असताना काही दुष्परिणाम किंवा वाढते आजारपण जाणवल्यास डॉक्टर किंवा समुपदेशकांशी संपर्क साधावा
> कुटुंबीय, मित्रांचे सहकार्य घ्या. त्यांच्याकडून धीर, आधार मिळावा म्हणजे औषधे घ्यायला मदत होईल.
> औषधोपचार सुरू असताना काहीही शंका वाटल्यास डॉक्टर किंवा समुपदेशकांकडून निरसन करून घ्या
> औषधी गोळ्यांचा हिशेब ठेवा. आठवडाभरात घ्याव्या लागणा-या गोळ्या घेतल्यात का ? याची खात्री करून घ्या
> आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी हलकासा व्यायाम आणि पुरेशी विश्रांती करणे गरजेचे आहे.
> रोगप्रतिकरशक्ती वाढवण्यासाठी सकस आहार घेण्याची गरज आहे. रोजच्या जेवणात मोड आलेली कडधान्ये, ताज्या पालेभाज्या, फळभाज्या आणि फळे घेणे आवश्यक आहे
> एचआयव्ही संसर्गित व्यक्तींच्या गटसंमेलनात सहभागी व्हा. विचारांचे आदानप्रदान करा. विविध समस्यांवर आपण कशी मात केली याबाबत चर्चा करा
> नियमित घ्याव्या लागणा-या औषधांची वेळ चुकवू नका
> कोणत्याही कारणाने बाहेरगावी जावे लागल्यास पुरेशी औषधे जवळ ठेवा