आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिध्‍दूचा झोलझाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या मराठी चित्रपटाची जोरजोरात प्रसिद्धी करायची, त्यातले नावीन्य (नसलेले!!) बेंबीच्या देठापासून ओरडत सांगायचे आणि प्रत्यक्षात दिवाळीतल्या एखाद्या फुसक्या बारप्रमाणे त्याची अवस्था व्हायची, असा अनुभव एका चित्रपटाच्या कलाकारांना व निर्मात्यांना आला. झालं असं, एरवी दणाणून हसवणा-या, धक्का देऊन टाइम प्लीज म्हणणा-या सिद्धार्थ जाधवने लव्ह गुरू व्हायचे ठरवले आणि प्रेमाचा झोल घालायचे ठरवले. नॉन मराठी निर्मातीने मराठीचे कौतुक करीत सिद्धूचा कॉमेडी तडका उचलत ‘प्रेमाचा झोलझाल’ चित्रपट रिलीज केला. तब्बल 1600हून अधिक थिएटर्स बुक करण्यात यशस्वी, असाही डंका पिटला गेला. मराठीला चांगले दिवस आहेत, यावर भोळाभाबडा विश्वास या निर्माती बार्इंचा. त्यामुळे हा झोल सहज हिट होईल, हा सिद्धूलाही भरवसा. बटरफ्लायवरील संशोधनातून टाइम प्लीज घेऊन बाहेर पडल्यानंतर प्रेमाचे धडे देण्याचा त्याचा हा प्रयोग मात्र फसला. हाऊसफुल्ल काय फुल्लसुद्धा थिएटर भरेना! त्यामुळे एरवी जोरात प्रसिद्धी करणारे चित्रपटाचे पीआरही आता छोट्या शहरांमध्ये विविध स्कीम्स ठेवून प्रेक्षक ओढून आणताहेत. दोन आठवड्यांनंतरही चित्रपटाचा गल्ला भरत नाही, त्यात रामलीला येतोय; त्यामुळे सिद्धूच्या प्रेमाची लीला अशी प्रेक्षकांच्या हाताला धरून ओढूनही चालणार का? बिच्चारा सिद्धू आणि त्याचा झोलझाल...