आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुस्तकप्रेमींचे अक्षरांगण...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुस्तकांची दुनियाच किती न्यारी आहे, एकमेकांना जोडणारी आहे, संवाद निर्माण करणारी आहे. याची जाणीव सर्वांना होईल न होईल, पण प्रयत्न कुणीतरी करायला तर हवेत. याच प्रयत्नातून अाैरंगाबादमधील काही मान्यवर मंडळींनी एकत्र येऊन सुरुवात झाली ती ‘अक्षरांगण’ची. पुस्तक वाचावीत आणि त्या पुस्तकांवर चर्चा व्हावी. हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

शहरातील डॉक्टर्स, इंजिनिअर्स, साहित्यिक आणि साहित्य प्रेमींना एकत्र आणण्याबरोबरच नवनवीन वाचकप्रेमी वर्ग जोडण्याचे काम अक्षरांगणच्या माध्यमातून होत असल्याची माहिती नीना निकाळजे यांनी दिली. कॉम्रेड डॉ. भालचंद्र कांगो आणि रंगकर्मी, नाट्यलेखक अजित दळवी यांच्या संकल्पनेतून अक्षरांगणची सुरुवात नोव्हेंबर २०१४ मध्ये करण्यात आली. प्रत्येक महिन्याला एक पुस्तक सर्वांच्या संमतीने निवडायचे आणि त्याचे अभिवाचन अथवा चर्चा ठेवण्यात येते. तसेच पुस्तकाच्या लेखकाशी वाचकांचा संवाद व्हावा. ते पुस्तक लिहिण्यामागची पार्श्वभूमी समजून घ्यावी. चर्चा व्हावी जेणेकरून सर्वांनाच त्या माहितीचे आदान-प्रदान करता येईल. लेखकाचा त्या मागचा दृष्टिकोन समजू शकेल. असा प्रयास असताे. आजवर पंधरा ते वीस पुस्तकांवर अक्षरांगणच्या व्यासपीठावर चर्चा झाली आहे. सत्तर ते ऐंशी लोक आज अक्षरांगणमध्ये आहेत. केवळ मराठी, हिंदी, इंग्रजीच नव्हे तर यासह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरांवर गाजलेल्या मान्यवर लेखकांच्या पुस्तकांवरही या अक्षरांगणमध्ये चर्चा ठेवण्यात येते. येणाऱ्या वाचकांची नोंदही करून घेतली जाते आहे. अक्षरांगणचे हे व्यासपीठ सर्वांसाठी आहे. वाचन संस्कृती वाढावी वृद्धिंगत व्हावी यासाठी अक्षरांचे सजलेले हे अंगण वाचकांना जोडणारा आणि विचार प्रगट करणारा एक नवा प्रयास शहरातील मान्यवर मंडळींनी केला आहे.

तरुणांना जोडण्याचा प्रयास
येत्या काळात तरुणांनी देखील यात सहभागी व्हावे. त्यांच्या आवडीची पुस्तके कोणती आहेत. त्यांना नेमके काय वाचायला आवडते हे जाणून घेण्यासाठी त्यांचा या अक्षरांगणात सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

पुस्तके वाचलीच पाहिजे
डॉ.भालचंद्र कांगो आणि अजित दळवी यांच्या संकल्पनेतून अक्षरांगणची सुरुवात झाली. पुस्तके वाचावीत त्यावर चर्चा व्हावी. विचारांची देवाण-घेवाण व्हावी हा उद्देश आहे. बऱ्याच वेळी काही नवीन विषय असेल आणि त्याबद्दल लेखकाची भूमिका काय हे जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष लेखकाशी संवाद आणि चर्चाही या उपक्रमांतर्गत असते. सर्वसंमतीने पुस्तकाची निवड करून कार्यक्रम आखला जातो. पुस्तकांचे अंगण वाचकप्रेमींनी सजले जावे. हाच यामागचा मानस आहे, असे उपक्रमाच्या समन्वयक नीना निकाळजे म्हणाल्या.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...