आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साहित्य-शिक्षणातून भाषा संवर्धन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशात मजल दरमजल भाषा ही बदलते. त्यातच काही भाषा या लाेप पावत चालल्या अाहेत. हीच बाब हेरून फक्त देशातील सर्वच भाषा संवर्धनासाठी एक भाषा भवन असावे, असा विषय घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनात पुढे अाला अाणि विशेष म्हणजे रविवारी (दि. १६) पंजाबातील किसनकाेट येथे या भाषा भवनाचे भूमिपूजन हाेणार अाहे.
मागील वर्षी पंजाबातील घुमान येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचे ठरले तेव्हापासूनच या ठिकाणी संमेलन घेऊन काय भाषामंथन हाेणार अाहे? असा नकारात्मक सूर अनेकांनी अाळवला हाेता, पण तरीही त्यावेळच्या साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डाॅ. माधवी वैद्य अाणि पदाधिकाऱ्यांनी सरहद संस्थेच्या माध्यमातून ते पाऊल उचललेच अाणि संमेलन यशस्वीही करून दाखवले. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या भाषणात घुमान येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय व भाषा भवन व्हावे, अशी मागणी केली होती. या वेळी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी या मागणीला तत्काळ होकार देत अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी ६ एकर जागा व भाषा भवनासाठी ४ एकर जागा देण्याचे आपल्या भाषणात आश्वासन दिले होते. अाता महाविद्यालय उभेही राहिले अाहे. तर भाषा भवनाचे भूमिपूजन रविवारी (दि. १७) हाेत अाहे. अखिल भारतीय संमेलन झाल्यानंतर यावर्षी येथे राष्ट्रीय बहुभाषा संमेलनानची मुहूर्तमेढ राेवली गेली. या निमित्ताने विविध भाषिकांना एकत्र करून विविध भाषांतील साहित्याचे मंथन हाेण्याचा उद्देश अाहे.

अाता उभ्या राहणाऱ्या भाषा भवनातूनही हाच उद्देश साध्य केला जाणार अाहे. देशातील सर्वच भाषांचा येथे अभ्यास करता येणार अाहे. तसेच देशातील विविध मान्यवरांचे साहित्य, त्यावरील संशाेधन, साहित्याचे अनुवाद, साहित्यिकांच्या भेटी, भाषा-उपभाषा यांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने ठाेस उपाययाेजना, सर्व भाषांतील साहित्यासाठी माेठे ग्रंथालय, साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार अाहे.
मराठी भाषेचा पुढाकार
लाेप पावत चाललेल्या भाषांचे संवर्धन व्हावे यासाठी अाम्ही प्रयत्नशील अाहेत. म्हणूनच भाषा भवन या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी मराठी भाषेने साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पुढाकार घेतला हे विशेष. हे भाषा भवन पंजाबात जरी असले तरी येथे सर्वच भाषांचा अाणि विशेष करुन लाेप पावत चाललेल्या भाषांचा अभ्यास अाणि साहित्य मंथन हाेणार अाहे.
अरुण नेवासकर, स्वागताध्य, राष्ट्रीय बहुभाषा साहित्य संमेलन

लाेप पावत चाललेल्या भाषांसाठी
खरं तर इंग्रजीला विराेध वा इतर काेणत्या भाषेला विराेध म्हणून नाही तर देशातील भाषा समृद्ध व्हाव्या अाणि लाेप पावत चाललेल्या भाषा मुख्य प्रवाहात याव्या हा यामागील उद्देश अाहे. या निमित्ताने साहित्य मंथनाबराेबरच राेजगार निर्मिती हाेईल, अनुवाद वाढतील, असा प्रयत्न अाहे. त्यासाठी येथे दहा हजार चाै. फुटांचे ग्रंथालय उभारले जाणार अाहे.
संजय नहार, सरहद संस्था

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...