आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किचन स्पेशल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘स्मार्ट सखू’ या सदरात नाशिकच्या जयश्री माधव यांनी पाठवलेल्या टिप्स

कारल्याची कोरडी भाजी करताना, बाहेरील खडबडीत भाग खरवडून काढावा, पण आतल्या बिया मात्र भाजीतच असू द्या. अशी परतलेली भाजी जास्त कुरकुरीत होते.

उकड घेऊन केलेल्या अळूच्या वड्या आडव्या कापून फोडणीच्या भातात टाकून परतावे. एक नवीन छान पदार्थ होईल.

लाल कोबी किसावा. त्यात काळे मीठ, साखर, जिरे पावडर, दही घालून कोशिंबीर करावी. एक छान वेगळा पौष्टिक पदार्थ तयार होईल.

शेवग्याच्या शेंगा उकडताना, त्यात थोडी साखर, थोडे मीठ घालावे. तुरट न लागता चवदार होतात.
गवारीची भाजी करताना फोडणीमध्ये प्रथम अर्धवट कुटलेले धणे, नंतर तीळ, जिरे, ओवा अनुक्रमे टाकावेत. भाजीला छान स्वाद येतो.

लाल कोबी पाण्यात उकळून सूपमध्ये घालावा. छान रंग येईल. निळसर जांभळे आणि पौष्टिक सूप तयार होते.