आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्करोगाचे निदान असतानाही झाली आई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझ्या पत्नीला लग्न झाल्यापासून मासिक पाळीचा त्रास होता तिची पाळी तीन-चार महिन्यांतून एकदाच यायची लग्नापूर्वी नियमित येत होती. पाळी नियमित नसल्यामुळे तिला गर्भधारणा होत नव्हती, काही दिवसांनी सुदैवाने गर्भवती राहिली पण दुसऱ्या महिन्यातच गर्भपात झाला खूप निराश झाली, गर्भापाताचे कारण कळले नव्हते. नंतर काही दिवसांनी पुन्हा दिवस गेले त्यावेळी आम्ही कामानिमित्त सूरतमध्ये राहत होतो, साडेतीन महिन्यांचा गर्भ होता डॉक्टरांनी सोनोग्राफीचा सल्ला दिला सोनोग्राफीत समजले की हा गर्भ नसून गर्भातील कॅन्सरचा गोळा आहे त्याचा गर्भपात करावा लागेल, गर्भपात केल्यावर तो गोळा तपासणीस पाठवला त्याचा रिपोर्ट डॉक्टरांनी कॅन्सर असल्याचे सांगितले (ट्रोफोब्लास्टिक डिसिज). तुमच्या पत्नीला भविष्यात आई होण्याची काहीही खात्री नाही तिची गर्भपिशवी काढावी लागू शकते आणि तिला पाच केमोथेरपीच्या इंजेक्शनचा कोर्स करावा लागेल. ही सर्व परिस्थिति बघून आम्ही घरातील सर्वजण खूप घाबरलो काय करावे काहीच सुचत नव्हते त्याच काळात आमच्या नातेवाइकाने दिव्य मराठी मध्ये दिनांक २५ जून २०१३ रोजी श्री अजयकुमार पाठक यांना होमिओपॅथिक उपचाराने फायदा झाल्याचे वाचले होते.

दरम्यान आम्ही एकच केमोथेरपीचे इंजेक्शन घेतले व त्यानंतर लगेच १५ जुलै २०१३ पासून होमिओपॅथिक उपचार सुरू केले. त्यामुळे पत्नीच्या प्रकृतीत खूप सुधारणा झाली तिला वारंवार होणारी सर्दीपण कमी झाली एक वर्षाच्या उपचारानंतर तीची मासिक पाळीपण नियमित सुरू झाली. याच कालावधीत तिला दिवस गेले व आमच्या डॉक्टरांनी आम्हाला सोनोग्राफी करण्यास सांगितली परंतु मनात खूप भीती होती पूर्वी सारखेच तर होणार नाही ना? पुन्हा त्या भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागते की काय याची मनात खूप भीती होती, परंतु हातात नॉर्मल रिपोर्ट व त्यात कॅन्सरची कुठही शक्यता नसल्याचे बघून खूप आनंद झाला. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे पुढे उपचार सुरूच ठेवले. १८ मार्च २०१५ रोजी पत्नीची घरीच नैसर्गिक प्रसूती झाली तिने एका सुंदर मुलीला जन्म दिला, हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठीदेखील वेळ मिळाला नाही. नंतर आईची तपासणी केली कुठलाही त्रास नसल्याचे समजले तसेच बालरोग तज्ज्ञाकडून बाळाचीपण तपासणी केली बाळदेखील नॉर्मल असल्याचे समजले एकूण खूप आनंद झाला. हे सर्व शक्य झाले ते फक्त दैनिक दिव्य मराठी व अजयकुमार पाठक यांच्यामुळे त्यांनी जर त्यांची व्यथा दिव्य मराठीमध्ये दिली नसती आणि दिव्य मराठीने ती प्रसिद्ध केली नसती तर आम्हाला होमिओपॅथिक उपचाराचा मार्ग मिळाला नसता कारण होमिओपॅथित अशा भयानक परिस्थितीत उपचार होतात हे माहितीच नव्हते. अजयकुमार पाठक, दैनिक दिव्य मराठी आणि होमिओपॅथिक डॉक्टरांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत.
(मो. ९८२३०१४७८४)