आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्न स्वच्छ भारताचे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारत देश स्वच्छ करण्यासाठी दोन आॅक्टोबर २०१४ ते दोन आॅक्टोबर २०१९ पू. म. गांधीजींची दीडशेवी पुण्यतिथी या पाच वर्षांच्या कालावधीत भारत स्वच्छ करण्याचे आवाहन केले आहे. स्वच्छता आरोग्याशी निगडित असल्याने प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे हे मनाला पटते. औरंगाबाद महानगरपालिकेनेही जाहिरातीद्वारे जाहीर आवाहन केले आहे की, प्रत्येक वस्तीतल्या नागरिकांनी दैनंदिन स्तरावर स्वत: स्वच्छता करावी. त्यासाठी एखादा रस्ता, एखादी झोपडपट्टी, एखादे सार्वजनिक शौचालय, एखादी शाळा, दवाखाना, उद्यान, चौक, पुतळे स्वच्छतेसाठी दत्तक घ्यावेत व महापालिकेला सहकार्य करावे. स्पष्ट बोलते, माफ करा; पण बायका-मुली त्यांचे विटाळाचे कपडे कागदात गुंडाळतात आिण रस्त्यावर फेकतात. रस्त्यावरची कुत्री कागदातील त्या रक्ताळलेल्या कपड्यांच्या किंवा सॅनिटरी नॅपकीनच्या चिंधड्या-चिंधड्या करतात. मग त्या रस्ताभर विखुरतात. पण बायांनो, तुम्ही आधी हे माहीत करून घ्या की, यामुळे रोगराई पसरते. रोगजंतू वाढतात. म्हणून हे विटाळाचे सॅनिटरी नॅपकीन संडासात नळाखाली आधी स्वच्छ करा, नंतर कागदात गुंडाळून कचरापेटीत टाका.
जनता जनार्दनाची एकच मागणी
रस्त्यावरच्या कचराकुंडीची करावी निगराणी
यासाठी सुचली विशेष कचराकुंडीची कल्पना
ज्यामुळे कुंडीच्या भवती साचणार नाही कचऱ्याची अल्पना
कचराकुंडी असावी दहा बाय चार फूट क्षेत्रफळाची
त्याची उंची असावी फक्त तीन फुटाची
कुंडीला असावा दहा फुटांचा सरकता दरवाजा
त्याची किल्ली असावी सफाई गाडीवानाजवळ सदा
कुंडीची वरची बाजू असावी उघडी
म्हणजे घरातल्या कचऱ्याची टोपली सहज करता येईल उपडी
कचराकुंडीच्या खालच्या बाजूला असावी दणकट जाळी
ओलेपणा िझरपून जमिनीची मशागत होईल योग्य वेळी
प्रत्येकाने घरातला कचरा कुंडीतच टाकावा
बाहेर फेकला तर शंभर रुपये दंड करावा
सफाई कामगारांनी स्वत:जवळच्या किल्लीने उघडावे दार
उचलावा कचरा, गाडीत टाकावा आिण बंद करावे दार
यामुळे काय होईल, शंभर रुपयांचा दंड भरावा लागू नये म्हणून
प्रत्येक जण कचरा कंुडीतच टाकेल
सरकत्या दरवाजाने काय होईल
कचरा उचणे सोपे जाईल