Home | Magazine | Divya Education | article about coaching in Marathi

प्रथम हे जाणून घ्या की मार्गदर्शनाची गरज आहे का

दिव्य मराठी | Update - Feb 22, 2016, 03:00 AM IST

प्रवेश परीक्षेत यशस्वी होण्यासाठी कठोर कष्टांसह योग्य मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता असते.

 • article about coaching in Marathi
  प्रवेश परीक्षेत यशस्वी होण्यासाठी कठोर कष्टांसह योग्य मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता असते. ही आवश्यकता कोचिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पूर्ण होते तेव्हा नि:संशय यास आजमावू शकतो. पण काही गोष्टी(मुद्दे) लक्षात ठेवून-

  - कोणत्याही कोचिंगच्या निवडीपूर्वी स्वत:ला हा प्रश्न जरूर विचारा की, याच कोचिंग क्लासची निवड का केली जावी? पण याहीपूर्वी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा की आपल्याला खरोखरच कोचिंग (मार्गदर्शनाची) ची गरज आहे का?
  - विषयाशी संबंधित आधारभूत ठरणाऱ्या गोष्टींचे संपूर्ण झान असेल तर आपल्याला कोचिंग घेण्याची विशेष गरज नाही. कारण की अधिकतर कोचिंग संस्था या फक्त विषयाच्या मूलभूत गोष्टींची माहिती देतात व त्याच्या आधारावर परीक्षेची तयारी विद्यार्थ्याला स्वत:लाच करायची असते.
  - कोचिंग संस्थेची निवड फक्त याच आधारावर करू नका की आपले मित्र व सहकारी यांनी ती संस्था निवडली वा प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या अधिकतर विद्यार्थ्यांनी त्या कोचिंगला निवडले आहे म्हणून.
  - कोणत्याही कोचिंग संस्थेला यासाठी नका निवडू की आपण त्याच्या जाहिराती केवळ पाहतो आहोत म्हणून. खरे तर निवड करताना इन्स्टिट्यूटची प्रतिष्ठा व गेल्या काळातील त्याचा प्रभाव (निकाल आदी) यावरही लक्ष दिले पाहिजे. पण केवळ जाहिरातीचा आधार ती कोचिंग निवडण्यासाठीचा होऊ शकत नाही.
  - कोचिंग संस्थेच्या नावाखाली त्याद्वारे उपलब्ध केल्या जाणाऱ्या स्टडी मटेरियलची गुणवत्ता आणि फॅकल्टी (प्राध्यापकवृंद) ला प्राथमिकता द्या.
  - अधिकतर प्रतिष्ठित कोचिंग संस्थांच्या स्टडी मटेरियलची गुणवत्ता व फॅकल्टी जवळपास समसमान स्तरावरील असतात. यासाठी तुलनात्मक रूपाने त्याच मुद्द्यांवर लक्ष दिले पाहिजे, ज्या दुसरे कोचिंग संस्था आपल्याला देऊ शकतील. या अतिरिक्त मुद्द्यांमध्ये संस्थेद्वारे दिली जाणारी अतिरिक्त व्याख्यानांची व्यवस्था, विशेष वर्ग आदींना सामील केले जाऊ शकते.
  - कोचिंग एक फक्त सहायकाचे माध्यम आहे. पण असे बिल्कुलच नाहीये की ज्याने कोचिंग नाही घेतली तो उत्तीर्णच होऊ शकत नाही. आपल्याला स्वत:च्या पात्रतेवर, योग्यतेवर विश्वास हवा. योग्य पद्धतीने परीक्षांच्या विविध टप्प्यांची तयारी करू शकता. तर यात उत्तम वा आश्चर्यकारक काहीही नाही. आपण इंटरनेट व दुसऱ्या इतर सहायक माध्यमांची मदतही घेऊ शकता.

Trending