आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Fitness By Leena Mogre In Madhurima

चला सुरुवात करूया...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नमस्कार मैत्रिणींनो,
मला खात्री आहे की तुम्ही ‘वर्क आऊट’ला सुरुवात केली असेल. किमान चालण्यास तर नक्कीच...
पंचवीस वर्षांच्या अनुभवावरून मला प्रामुख्याने दोन प्रकारच्या व्यक्ती भेटल्या आहेत. पहिली व्यक्ती एक तारखेपासून किंवा सोमवारपासून किंवा नव्या वर्षापासून व्यायामास सुरुवात करण्याचे ठरवणारे आणि दुसरी म्हणजे आम्हाला वेळच मिळत नाही, असे सांगून व्यायाम टाळणारे... अशा व्यक्तींना मी नेहमीच सांगत आले की कुठलीही चांगली गोष्ट सुरू करण्यासाठी कधीही वाट पाहू नका. ताबडतोब अमलात आणा. स्वत:साठी नेहमीच वेळ काढा आणि म्हणून सर्वप्रथम स्वत:वर प्रेम करायला शिका. ज्याप्रमाणे सकाळी उठून आपण दात घासतो किंवा ब्रश करतो, त्यासाठी वेळ नाही अशी सबब कधीच सांगत नाही, त्याप्रमाणे व्यायाम अथवा चालण्यास जाण्यासाठी सबब नव्हे, तर सवड काढा. याचा तुम्हाला येणा-या काळात म्हणजे वार्धक्यात नक्कीच फायदा होईल. ‘ओबेसिटी’ ही सर्व आजारांची सुरुवात आहे. ओबेसिटी टाळण्यासाठी व्यायाम अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर व्यायाम किंवा चालण्यास जाण्यासाठी शक्य असेल तर सोबत अथवा जोडीदार तयार करा. याचे एकमेव कारण म्हणजे कंटाळा असल्यास व ‘दांडी’ मारण्याचे विचार आल्यास आपला जोडीदार कदाचित त्या विचारापासून आपणास परावृत्त करू शकेल. तसेच एकमेकांना मोटिव्हेट करण्यास उपयुक्त ठरू शकता. व्यायाम करण्यासाठी सुरुवातीस काही खर्च असतो. ‘त्या’ खर्चास कधीही खर्च म्हणून न समजता आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त गुंतवणूक असे ठरवा. व्यायामामुळे आपल्या शरीरातील ‘एन्केफेलिन’ आणि ‘एन्डॉरफनिस’ या आनंद वाढवणा-या हॉर्मोन्सची वाढ होते. आपण आनंदी असलो की आपल्याला सर्वच जण आनंदी दिसतात. आपल्यातील सकारात्मक ऊर्जेची वाढ होते व त्याचा फायदा इतरांना होतो. आपल्या चार शुक्रवारांच्या गप्पांमध्ये ब-याच गोष्टी राहून गेल्या असतील तर अधिक माहितीसाठी ‘टोटल फिटनेस द लीना मोगरे वे’ हे माझे पुस्तक तुम्हाला उपयोगी ठरेल. तर मैत्रिणींनो, उद्याची किंवा सोमवारची वाट पाहू नका, कल करे सो आज कर... या उक्तीप्रमाणे आपण सर्वांनी आजपासून ‘वर्क आऊट’ला सुरुवात करूया...

सो... बिगीन फ्रॉम नाऊ...

mkspostbox@gmail.com