आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयाच्या कप्प्यात डाेकावताना..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘दिलसे दिलतक जाने के लिये दिल पक्का अाैर सच्चा हाेना चाहिये’ असे म्हणतात... पण अाजच्या धकाधकीच्या जीवनात दिल दिलतक पाेहाेचेपर्यंतच कधी अल्पविराम लागताे, तर कधी पूर्णविरामच लागताे. अर्थात हृदयविकार सुरू हाेताे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात तर वयाच्या १० वर्षांच्या अाधीपासूनच हृदयराेग दिसून येताे अाहे. मग अशावेळी हृदयराेगाची कारणं, समज-गैरसमज शाेधणं महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच मग २९ सप्टेंबरला साजऱ्या हाेणाऱ्या जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने हृदयाची काळजी, त्याचे उपचार, त्यासंदर्भात असलेले समज-गैरसमज या विषयी निरामय या विशेष पानातून वेळाेवेळी जाणून घेऊया काही माहिती, टिप्स अाणि उपचार.
सन २००० पासून सर्वत्र २९ सप्टेंबर हा जागतिक हृदयदिन म्हणून साजरा केला जाताे. हृदयाच्या बाबतीत सर्वांनी जागरूक राहावे, विशेषतः अकाली हृदयाचा त्रास होणे टाळता यावे, हृदयराेगामुळे अचानक होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण घटावे, या उद्देशाने हृदय दिनाच्या निमित्ताने जनजागृती व्हावी हा यामागील उद्देश. या दिवशी अनेक कार्यक्रम, चर्चासत्रे, प्रदर्शने, व्याख्याने आयोजित केली जातात. पण या गाेष्टी बरेचदा क्षणिक ठरतात.
हृदयाचीच नव्हे, तर शरीराच्या प्रत्येकच अवयवाची काळजी कायमच घेतली पाहिजे. ताे अापल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला पाहिजे. खरंतर असे अनेकांना वाटत असते पण, त्यासाठी अापण नक्की काय केले पाहिजे याचे मार्गदर्शन मिळत नाही. शिवाय त्यासंदर्भात मनात अनेक शंका, समज-गैरसमजही असतात. शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा अवयव म्हणजे हृदय अाणि मेंदू. सध्याच्या धावपळीच्या जगण्यात हृदयविकार काेणातही दिसून येताे. एेन तरुणपणात हृदयविकाराचा झटका येऊन अकाली मृत्यू येताे किंवा ब्लाॅकेजेस असतात. असे हाेऊ नये किंवा हाेत असेल, तर त्यावर माेठ्या शस्त्रक्रियांव्यतिरिक्त इतर उपचार अाहेत का? याचाही विचार झालाच पाहिजे. म्हणूनच काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष वेधावे लागते.

ब्लाॅकेजेसबद्दल गैरसमज:
हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये blockages चे निदान झाल्यावर फक्त शस्त्रक्रियेद्वारे (angioplasty) उपचार हा एकुलता एक विकल्प असतो.

ब्लाॅकेजेस संदर्भातील समज
*कोणत्याही आजारात चिकित्सेचे तीन प्रमुख उद्देश असतात. १. त्या आजारामुळे संभावणाऱ्या मृत्यूचा धोका कमी करणे. २. त्या आजारामुळे निर्माण होणाऱ्या विकृती/वैगुण्य कमी करणे. ३. त्या आजारामुळे होणारी जीवन गुणवत्तेतील कमी जास्तीत जास्त प्रमाणात भरून काढणे.
*Chronic stable coronary artery disease/जीर्ण हृदय रोग : म्हणजे असा हृदयरोग ज्यात हृदयाला रक्त पुरवठा करणारी एक व एक हून अधिक रक्तवाहिन्या (आलिंदा) मध्ये blockage तयार झल्याने त्या रक्तवाहिनीतून हृदयाच्या एखाद्या भागाला चीर काळापासून पुरेसा रक्तपुरवठा पोहोचत नसतो व या कारणाने त्या रुग्णात हृदयरोगाची विविध लक्षणे व चिन्हे निर्माण होत असतात
*जर एखाद्या व्यक्तीला छातीतले दुखणे, दम लागणे, छातीत जळजळ, छातीत काम करताना दाबल्यासारखा त्रास होत असतील, जर त्याला heart attack येऊन गेला असला किंवा त्याच्या angiography च्या रिपोर्ट मध्ये एकाहून अधिक blockages असण्याचे सांगितले असले, तर अशा व्यक्तीला जीर्ण स्वरूपच हृदय रोग असू शकतो.

असे अाहे संशाेधन
*NJEM (द न्यू जर्नल इंग्लंड अाॅफ मेडीसिन) मध्ये प्रकाशित झालेल्या अाॅप्टिमल मेडीकल थेरपी विथ अाॅर विदाऊट पीसीअाय फाॅर स्टेबल काॅराेनरी अार्टरी डिसीस या संशोधन पत्रानुसार जर रुग्णाचा हृदयाचा आजार हा स्टेबल काॅराेनरी अार्टरी डिसीस असेल, तर त्यात औषधी उपचारांसह पीसीअाय (अॅन्जीअाेप्लास्टी) केल्याने मृत्यूचा धोका कमी करण्यात काही फायदा होत नाही किंबहुना संशोधकांना आपल्या संशोधनात असे आढळले की हृदयविकार (स्टेबल काॅराेनरी अार्टरी डिसीस)असणाऱ्या लाेकांमध्ये अॅन्जिअाेप्लास्टी न करता फक्त औषधी चिकित्सा (अाॅप्टीमल मेडीकल थेरपी)दिल्यावर असे रुग्ण जिवंत राहण्याची संख्या जास्त होती. हाच निकष अशा इतर संशोधनामध्ये लागला आहे.
*या संशोधनासाठी १९९९ ते २००७ साली २२८७ रुग्ण हे अमेरिका व कॅनडा येथील ५० हॉस्पिटलमध्ये नोंदविले गेले अाहेत. संशोधनांती त्यातील काही रुग्णांना PCI (अॅन्जिअाेप्लास्टी) करून औषधी चिकित्सा करायचे ठरवले तर इतर रुग्णांना नुसतीच औषधी चिकित्सा द्यायचे ठरवले. अशारित्या ११४९ लोकांना पीसीआय ग्रुप, तर ११३८ लोकांना औषधी चिकित्सा देण्यात आली. संशोधनासाठी घेतलेल्या सर्व लोकांना किमान एक ७० टक्के किंवा ७० टक्क्यांपेक्षा जास्त लोक होते (प्राॅक्सिमल एपीकॅर्डीकल काॅराेनरी अार्टरी स्टेनाेसिस) ज्या मुळे हृदयाला रक्त पुरवठा खंडित होत होता (एसटी व्हेव इन्व्हर्जन अाॅर ट व्हेव इन्व्हर्जन अाॅन रेस्टिंग इसीजी)
*दुसरीकडे २०११ मध्ये प्रकाशित इफेक्ट्स अाॅफ एक्सरसाइज ट्रेनिंग अाॅन काॅराेनरी काॅलेटरालायझेशन अॅण्ड कन्ट्राेल अाॅफ काॅलेटरल रेसिस्टंन्स. जर्नल अाॅफ अप्लाइड फिझीयोलोजी एका दुसऱ्या संशोधन पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, कार्डिअॅक रिहॅब नावाची एक नवी चिकित्सा पद्धतीची जोड जर औषधी चिकित्सेत दिली तर हृदयरोग निर्माण करणाऱ्या कारणांना आटोक्यात आणते व blockage मुळे उत्पन्न होणारा संभाव्य धोका खूप(४५% पर्यंत) कमी होतो, हृदयरोगामुळे निर्माण होणारी लक्षणे दूर होतात व रुग्ण हा लवकरच आपले सुखी आयुष्य जगू शकतो, या चिकित्सेने नैसर्गिकरित्या (शस्त्रक्रिया विरहित) शरीरात नव्या रक्त वाहिन्यादेखील निर्माण करता येतात. या चिकित्सेचे फायदे नोंदविणारे जगभरात ५०,००० हून जास्त संशोधनात पत्रं नमूद आहेत.

निष्कर्ष
>हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये blockages चे निदान झाल्यावर फक्त
शस्त्रक्रियेद्वारे उपचार हा एकुलता विकल्प नसतो.
>हृदयरोग जर जीर्ण स्वरूपाचा असेल, तर औषधी उपचार व त्या जोडीला cardiac rehab ही एक सोपी चिकित्सा पद्धती रुग्णास खूप उपयोगी ठरते.
>हृदयरोग डॉक्टरांनी दिलेले औषध कधीच बंद करू नाही व औषध घेण्यात कधी खंडदेखील करू नये.
बातम्या आणखी आहेत...