आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About Madhurima Readers Feedback On Education

वाचक प्रतिसाद... शिक्षणाचे दडपण नको

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालक नेहमी आपल्या पाल्यावर शिक्षणाचे दडपण टाकतात. एका विशिष्ट गुणवत्तेतच आपला मुलगा किंवा मुलगी आली पाहिजे हा आग्रह असतो. पण आपल्या मुलांना नेमकी कशाची आवड आहे हे पाहिले जात नाही. खरे पाहायला गेले तर आपल्या मुलाची खरी आवड कशात आहे हे शाळेतच कळते. एखादा संगीतात हुशार असतो, एखादा चित्रकलेमध्ये तर कोणी खेळात. पण हे सगळे जाणूनबुजून दुर्लक्षित केले जाते पालकांकडूनच. प्रत्येक आईवडिलांनी फक्त एकच इच्छा आपला मुलगा/मुलगी डॉक्टर, इंजिनिअरच झाला पाहिजे. आता तर नवनवीन शिक्षण पद्धती आल्या आहेत. त्यामुळे पारंपरिक शिक्षण पद्धतीकडे दुर्लक्ष केले जाते. ठरावीक शिक्षण सोडले तर दुसरा विचार सध्या कुणीच करण्यास तयार नाही. नुकतेच आपण वाचले की 51 एमबीए कॉलेज बंद पडली आहेत. यास फक्त एकच कारण आहे, ते म्हणजे सगळेच फक्त एकाच शिक्षणाचा विचार करत राहिले तर नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होणार?
योग्य वयात, स्वत:ला कशाची नेमकी आवड आहे हे पाहूनच पुढचे निर्णय घेतले पाहिजेत. हे माझ्याच अनुभवावरून सांगत आहे, की लहानपणापासून गाण्याची आवड असलेली मी. एक चांगली संधी सोडून वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. इथेही खूप संधी आहेत, पण ज्या संधी मला संगीतात मिळाल्या असत्या त्या वाणिज्य शाखेत मिळाल्या नाहीत. असो. पण आता वेळ न दवडता मी माझे पुढचे संगीतातले शिक्षण पूर्ण करून संगीत विशारद होण्याचे ठरवले आहे.
- अरुंधती गोडबोले, सोलापूर