आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिल्ली विद्यापीठातून मान्यताप्राप्त मराठी भाषेला वगळले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातील प्रमुख चार विषयांतून काही भाषांसाेबत मराठीला बाहेर काढून जे भेदपूर्ण वर्तन दिल्ली विद्यापीठाने केले अाहे. त्याकडे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाद भालचंद्र जाेशी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पत्र दिले अाहे. त्याची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अाणि शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनाही देण्यात अाली अाहे. 
 
याअगाेदर भारतीय भाषांच्या साैहार्दपूर्ण एकतेचे दर्शन घडविणाऱ्या प्रतीकाच्या स्वरूपात असलेल्या दिल्लीच्या अाकाशवाणी भवनातून मराठीसह इतर भारतीय भाषांमधून प्रसारित हाेणार राष्ट्रीय वार्तापत्रे बंद करण्याचा निर्णय घेऊन ती त्या-त्या भाषिक राज्यात पाठविण्यात अाली हाेती. त्यावेळीही माहिती व प्रसारणमंत्री व्यंकय्या नायडू यांना महामंडळातर्फे पत्र देण्यात अाले हाेते. दिल्ली विद्यापीठाने अाता चार प्रमुख विषयांतून मराठीसाेबतच मल्याळम, कन्नड अाणि तामीळ या दक्षिण भारतीय भाषा तसेच उडिया अाणि नेपाळी या भाषादेखील वगळल्या अाहेत.
 
पत्रातील प्रमुख मुद्दा असा
दिल्ली विद्यापीठात मान्यताप्राप्त नसलेली भाषा चार प्रमुख विषयांमध्ये एक विषय म्हणून घेतल्यास एकूण गुणांमधून २५ टक्के गुण कपात करण्याची जणू शिक्षाच ठाेठावण्यात अाली अाहे. मात्र, त्याचवेळी पंजाबी, हिंदी, उर्दू या उत्तरेतील भाषा व संस्कृती, उर्दू, अरेबिक, बंगाली यांचा समावेश करणे, हे जे दिल्लीत भारतीय भाषांबाबत भेदभाव करणे चालले अाहे ते भारतीय राज्य घटनेचे उल्लंघन करणारे असून, भाषिक साैहार्दतेलाही हानिकारक असल्याने पंतप्रधानांनी याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती जाेशी यांनी केली अाहे. दिल्ली व अासपासच्या परिसरात ७ लाख मराठी भाषिक असल्याचेही निदर्शनास अाणून दिले अाहे.