आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाळबोध अक्षर घडसून करावे सुंदर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कितीही खराब अक्षर असले तरी योग्य प्रयत्न केल्यास ते सुंदर बनते. आपले हस्ताक्षर इतके सुंदर असायला हवे की, चतुर (हुशार/विद्वान) लोकांनी ही अक्षरे पाहून/पाहिल्यानंतर त्यांना समाधान वाटले पाहिजे... असे समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये लेखनक्रिया निरुपणात सांगितले आहे.

सन २००२मध्ये म्हणजे जवळपास तेरा वर्षांपूर्वी माझे अक्षर गुरू इंजिनिअर मधुसूदन रायते (रायते काका) यांच्याकडे मी ‘सुंदर हस्ताक्षर कसे काढावे?’ (मराठी-प्रिंट इंग्लिश-कर्सिव्ह) याचे धडे घेतले. हस्ताक्षराचे धडे घेत असताना भविष्यात हेच माझे करिअर होईल, असे मला कधीच वाटले नव्हते. मात्र आज पूर्ण वेळ ‘अभिजित अक्षर वर्गा’च्या माध्यमातून शालेय विद्यार्थी, लहान मुले-कॉलेज स्टुडंट‌्स, शिक्षक, पालक, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, व्यापारी, महिला अशा विविध क्षेत्रांतील हजारो लोकांनी माझ्याकडे सुंदर हस्ताक्षराचे प्रशिक्षण घेतले आहे. घेत आहेत.

(प्रयत्ने) बाळबोध अक्षर। घडसून करावे सुंदर
जे देखताचि चतुर। समाधान पावती

कितीही खराब अक्षर असले तरी योग्य प्रयत्न केल्यास ते सुंदर बनते. आपले हस्ताक्षर इतके सुंदर असायला हवे की, चतुर (हुशार/विद्वान) लोकांनी ही अक्षरे पाहून/पाहिल्यानंतर त्यांना समाधान वाटले पाहिजे. असे समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये लेखनक्रिया निरूपणात सांगितले आहे.

कोणत्या वयात हस्ताक्षर शिकता/सुधारता येते?
तसे पाहिले तर, शिक्षणाला किंवा कोणतीही कला अवगत करण्यासाठी वयाची कुठलीच नट नसते. पण अक्षर शिकण्यासाठी किमान सात वर्षं वय पूर्ण असणं आवश्यक आहे. याकरिता कमाल वयोमर्यादेची अजिबात अट नाही. माझी आई सुनिता मुकुंद भडंगे हिला मी तिच्या वयाच्या ५०व्या वर्षी सुंदर हस्ताक्षराचे धडे दिले. एरवी, बालवयात अक्षरांचा सराव केल्याने, लिखाणची गोडी लागते व बुद्धी तल्लख होण्यास मदत होते.

व्यक्तिमत्त्वाची ओळख
ज्याचे अक्षर सुंदर असते, ती व्यक्ती कुठेही कार्यरत असो; ‘सुंदर हस्ताक्षर’ ही त्या व्यक्तीची ‘ओळख’ बनते.
‘पत्रलेखन’ : सुंदर अक्षरात पत्र लिहिले असेल तर लिहिणाऱ्या व वाचणाऱ्या दोन्ही माणसांना आनंद होतो. लंडनच्या राजपुत्रास प्रिन्स विलियम यांना २२ जुलै २०१३ रोजी ‘पुत्ररत्न’ झाल्यानंतर, मी त्यांना कर्सिव्ह अक्षरांत पत्र पाठवून अभिनंदन केले. १५ दिवसांतच मला राजघराण्यातून पत्रोत्तर आले व त्याचबरोबर त्यांचा ओरिजनल फोटोही त्यांनी पाठवून दिला.

फ्रँकलिन रुझवेल्ट हे अमेिरकेचे ३२वे राष्ट्राध्यक्ष होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्यांची जागतिक राजकारणात महत्त्वाची भूमिका होती. ते नेहमी त्यांच्या स्वीय सचिवास म्हणत की, छापील शब्द चांगले दिसत असले तरी हस्तलिखितामध्ये जी शक्ती असते, ती कुठेच दिसून येत नाही. त्यामुळे औपचारिक पत्र प्रभावी करण्यासाठी त्यात हस्तलेखनाचा छोटासा भाग महत्त्वाचा आहे.
बातम्या आणखी आहेत...