आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात दिवसांत बरे करा, हे चुकीचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या शरीराला आणि मनाला वेगवेगळ्या पद्धतीच्या दुखण्याची जाणीव होऊ शकते. सांधेदुखी, दाढदुखी, पोटदुखी, पाठदुखी इत्यादी दुखणे हे स्थान सापेक्ष आहे. पण त्या वेदनांचे पुन्हा पोटप्रकारदेखील आयुर्वेदाने सांिगतले आहेत. टाेचल्याप्रमाणे, फुटल्याप्रमाणे, िपळल्याप्रमाणे, मंुग्या येणे, बधिर होणे, जखडणे अशा प्रकारच्या वेदनाही शरीरामध्ये अंतर्बाह्य होऊ शकतात.

वातदाेष आणि दूषित झालेले रक्त हे दाेन प्रधान घटकच कारणीभूत : शरीरातील वातदाेष आणि दूषित झालेले रक्त हे दाेन प्रधान घटकच प्राधान्याने वेदनेला कारणीभूत असतात. आमवात, संधीवात, वातरक्त, टाचदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी, हातापायाला मुंग्या येणे, टेनिल एल्बाे, सायटिका इत्यादी विकारांमध्ये म्हणूनच वाताच्या आणि रक्ताच्या आयुर्वेदीय उपचारांना अनन्य साधारण महत्त्व आहे.

वेदनाशामक औषधाने बरे होतो हा गैरसमज : बऱ्याचदा घसादुखी, संग्रहणी, आव, मूळव्याध, उंदीर, विंचू इत्यादी प्राण्यांचे दंश, विषसेवन, अितव्यायाम, अितचिंता, साेरायसिस, महाराेग, आनुवंशिकता, आघात, पाण्डुराेग, विद्रधी, ग्रंथी, अर्बुद, गुप्तराेग, गर्भाशयाचे राेग, रजाेदृष्टी, गर्भारपण, बाळंतपण, तीव्र मधुमेह, अितरक्तदाब, रक्तपित्त, मद्यपान, धूम्रपान, स्थूलपणा, कृशपणा, अस्थी विकृती, जन्मजात विकृती अशा साधारण ४०० राेग कारणांचा आणि १५०० उपकरणांचा विचार वेदनेच्या बाबतीत आयुर्वेदीय ग्रंथांमधून पूर्वापार काळापासून केलेला आहे.

एका िदवसात एकदम कोणीही आजारी पडत नाही : मनुष्य एका िदवसात कधीही एकदम आजारी पडत नाही. सर्व आजारांची पायाभरणी एक ते सात वर्षांपर्यंत शरीरात सुरू असते. त्यामुळे सात िदवसांत बरे करा, या रुग्णाच्या मागणीला काहीही अर्थ नसताे. याेग्य निदान, याेग्य आैषधे, याेग्य खाणे - िपणे, वागणे, याेग्य पंचकर्म, याेग्य रसायन, िचकित्सा, सुज्ञ रुग्ण, सुज्ञ परिचारक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दक्ष, आयुर्वेदाचा सखाेल अभ्यास केलेला, प्रत्यक्षाचा अनुभव असलेला, बुद्धी, मनांत िहणकस नसलेला वैद्य, अशी याेजना झाल्यास रुग्ण वेदना कमी होणार हे नक्की जाणावे.

योगोपचार व पंचकर्म
कोणत्याही शरीराच्या अवयवाच्या रचनेमध्ये अिस्थ, मांस, रक्त, मेद, कण्डरा, िसरा, स्नायू, तरुणास्थी, कफ, िपत्त यांचे अंश, श्लेष्मल त्वचा, इत्यादींचा समावेश असताे. त्यामुळे वरील प्रकारच्या राेगांमध्ये या सर्वांवर काम करणारी उपचारप्रणाली, खाणे, िपणे, वागणे, व्यायाम, याेगाेपचार तसेच पंचकर्माचा वापर करावा लागताे.

वेदनांच्या नाशावर उपाय
साक्षात आजार बरा करण्यासाठी गुग्गुळकल्प, आैषधी तेले आणि तुपे यांचा अंतर्बाह्य वापर करावा लागताे. यासह अिग्नकर्म, उपनाह, लेप, रक्तमाेक्षण आणि पंचकर्मातील वमन, विरेचन, बस्ती यांचा वापर केल्यास वेदनांचा नाश होतो.

आजारांची पायाभरणी
सर्व आजारांची पायाभरणी एक ते सात वर्षांपर्यंत शरीरात सुरू असते त्यामुळे केवळ वेदनाशामक आैषधे घेऊन बरे होतो, असे कोणीही समजू नये. थाेडावेळ बरे वाटते म्हणून अशा प्रकारची आैषधे घेऊन वृक्क, जठर, रक्तवािहन्या, मस्तिष्क, यकृत, मेद, शुक्रधातू यावर घातक परणिाम होऊन त्याचे निराळे आजार वेदनेसह शरीरात घर करून बसतात.