आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article By Dipti Raut About Reasons Behind Farmers Suicide

मुलीची वरात जाते, आणि... (शेतीमाय)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रातिनिधिक छायाचित्र - Divya Marathi
प्रातिनिधिक छायाचित्र
घरातल्या मुलीचं लग्न आणि एखादं आजारपण शेतकऱ्याचं सारं आर्थिक गणित कोलमडण्यास कारणीभूत ठरत आहे. मराठवाड्याच्या गावागावांतून एेकायला मिळणाऱ्या या कहाण्या; पण विदर्भ, उत्तर महाराष्ट्रही याला अपवाद नाही. मुलीची वरात जाते, आणि शेतकरी बापापुढे आत्महत्येशिवाय पर्याय उरत नाही...
अनेक बँकांच्या जाहिराती असतात, ‘आजच तजवीज करा - मुलीच्या लग्नासाठी आणि मुलाच्या शिक्षणासाठी...’
मनात यायचं, आजही चाकोरी बदललेली नाही. मुलीचं लग्न हे केवढा मोठा बोजा वाटतो, समाजाला. गेल्या आठवड्यात मराठवाड्यात दोन लग्नं झाली. औरंगाबादला आणि बीडला. औरंगाबादला झाला, तो शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मुलीचा जंगी विवाह सोहळा. पाच हजारांच्या पंगती, पंचतारांकित हॉटेल्सचं बुकिंग, संगीताच्या तालावर नाचणारी कारंजी आणि सोनेरी प्रकाशात झळाळणारा परिसर. कोण म्हणेल, मराठवाड्यात दुष्काळ आहे? शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपासून भाजप मंत्री नितीन गडकरी अशी सर्वांची हजेरी. कोण म्हणेल, मराठवाड्यात दुष्काळ आहे, असा सारा बडेजाव.

खैरेंच्या मुलीच्या या लग्नावर टीका झाली. खैरे समर्थकांनी मात्र त्यांची बाजू सावरून धरली. लग्न हा त्यांचा वैयक्तिक सोहळा होता, म्हणे. वर, एका लग्नानं दुष्काळावर काय परिणाम झाला असता, असा नाक वर करून उपस्थित केला जाणारा प्रतिप्रश्नही. का तर म्हणे, ते त्यांच्या घरातलं शेवटचं लग्न होतं, खैरेंचा जनसंपर्क दांडगा, थाटामाटात लग्न करणं त्यांना भागच होतं, इत्यादी इत्यादी... औरंगाबादमधल्या लॉ कॉलेजच्या एका विद्यार्थिनीने त्यावर चपखल प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, युथ फेस्टिवल आणि गॅदरींग हे कॉलेजच्या मुलांसाठी खूप महत्त्वाचे इव्हेंट्स. पण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने यंदाचा युवा महोत्सव रद्द केला. सर्व कॉलेजेसनी गॅदरिंग्ज रद्द केली. त्या युवतीचा प्रश्न होता, जो सुज्ञपणा आम्ही कॉलेजचे युवक दाखवू शकतो, तो हे लोकनेते का दाखवत नाहीत?

जे या लोकनेत्यांना जमलं नाही, ते दुसऱ्याच दिवशी शेजारच्या बीड जिल्ह्यात दोन अभिनेत्यांनी करून दाखवलं. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम’ फाउंडेशनतर्फे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या मुलींची सामूहिक लग्नं लावण्यात आली. ‘नाम फाउंडेशन’चा ‘एक गाव एक लग्न तिथी’ असा हा उपक्रम. लग्नाला जमलेल्या पंचक्रोशीतल्या गावातल्या तरुणांना मकरंद कळकळीने सांगत होता, बाबांनो, हुंडा घेऊ नका, दुष्काळाच्या झळीत लग्नावरचा खर्च टाळा. एक गाव एक लग्न तिथीचा अवलंब करा.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतीवरचं आर्थिक संकट याबाबत करण्यात आलेल्या अनेक अभ्यासांमधून एक बाब सूर्यप्रकाशाएवढी स्पष्ट झाली आहे. बेभरवशी हवामान, पावसाची दडी ही नैसर्गिक कारणे आहेतच; पण त्याशिवाय घरातल्या मुलीचं लग्न आणि एखादं आजारपण शेतकऱ्याचं सारं आर्थिक गणित कोलमडण्यास कारणीभूत ठरत आहे. खोट्या प्रतिष्ठेपायी मुलीच्या लग्नाची अगतिकता आज बळीराजाला हतबल करते आहे. अशा वेळी खाजगी सावकाराकडून उचलवारी कर किंवा पीककर्ज वापर हा जुगार शेतकरी करतात. लग्न होतं, गावकी जेवते, पण त्या जुगारात शेतकरी बाप मात्र दुहेरी फसतो. पीक कर्जाचा हातातला आधार संपलेला, दुसरं पीकही अशक्य बनलेलं आणि परतफेडीचा तगादा. अशा वेळी कर्जाच्या चिखलात रुतत जातो, तो पुन्हा कधीही वर न येण्यासाठी. मराठवाड्याच्या गावागावातून एेकायला मिळणाऱ्या या कहाण्या. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रही याला अपवाद नाही. मुलीची वरात जाते, आणि शेतकरी बापापुढे आत्महत्येशिवाय पर्याय उरत नाही...

एका बाजूला कर्जाचा बोजा आणि दुसऱ्या बाजूला दुष्काळाचा सामना यात भरडलेल्या शेतकऱ्या घरी लग्न हा आनंदाचा सोहळा न ठरता, कर्जाचा डोंगर ठरतो. दुष्काळामुळे मराठवाड्यातल्या गावांमध्ये शेतकऱ्याच्या मुलामुलींची लग्नं रखडली आहेत. लातूरच्या स्वाती पिठले या विद्यार्थीनीने आत्महत्या केली. एसटीच्या पासला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या करीत असल्याचं तिनं चिठ्ठीत लिहिलं. म्हणून तिच्या नावे परिवहन खात्याने पास योजना सुरू केली; पण स्वातीच्या चिठ्ठीतल्या दुसऱ्या वाक्याकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केलं. स्वातीनं लिहिलं, बाबा, माझ्या पश्चात माझा कोणताही अंत्यविधी करू नका आणि वाचलेले पैसे ताईच्या लग्नासाठी ठेवा... हृदय पिळवटून टाकणारं वाक्य. ताईच्या लग्नाची निकड, त्यासाठी पैसे नसल्यानं ओढवलेली परिस्थिती, त्याचा वडलांवर असलेला भार त्या लहानग्या स्वातीला कळत होतं. पण वीस वीस वर्षं लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या, शेतकऱ्यांच्या मतांवर राज्य करणाऱ्या राजकीय नेत्यांना कळत नाही, यापेक्षा शेतकऱ्याचं दुर्दैव ते कोणतं?

निसर्ग आपल्या हातात नाही; पण प्रतिष्ठेच्या नावानं करावी लागणारी लग्नावरची उधळपट्टी थांबवणं सहज शक्य आहे की नाही? ही अपेक्षा त्या पिचलेल्या, नडलेल्या शेतकऱ्यांकडून करणं वेडेपणा आहे. आधीच खंगलेला तो असा काही वेगळा विचार करण्याच्याही मन:स्थितीत नसतो. त्यात गावकीचं दडपण. अशा वेळी लोकनेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. राजकीय नेत्यांनी स्वत:च्या घरांपासूनच लग्नातल्या बडेजावाला फाटा दिला, साधेपणाने लग्न करण्याचा पायंडा घालून दिला, सामूहिक विवाहांमध्ये लग्न लावण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला, त्याचा पुरस्कार केला, त्याला प्रोत्साहन दिलं, तर लोकांसाठी पुढला मार्ग सुकर होऊ शकतो. शेतकरी मूर्ख आहेत, लग्नात उधळपट्टी करतात कशाला किंवा लग्नातला खर्च ही आमची वैयक्तिक बाब आहे, हे दोन्ही प्रतिवाद निरर्थक आहेत. लोकांमधून निवडून जाणाऱ्या राजकीय नेत्याचं उत्तरदायित्व लोकांसोबत असतं, आपल्या खाजगी आयुष्याशी नाही. खाजगी आयुष्यात सार्वजनिक हिताचे संकेत घालून देण्याची परंपरा सांगणारा महाराष्ट्र. नेत्यांच्या मुलांच्या लग्नातली उधळपट्टी हा त्यांचा खाजगी विषय ठरतो कसा?

शिवसेनेनं त्यावर उत्तर दिलं, ते बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेचं. खैरेंनी त्यांच्या मुलीच्या लग्नात लखलखती उधळपट्टी केली असली, तरी आतापर्यंत अनेक सेना नेत्यांनी या योजनेअंतर्गत अनेक मुलींची सामूहिक लग्नं कशी लावून दिली, हजारो रुपयांचे संसारोपयोगी सामान त्यांना कसे घेऊन दिले, याची जंत्री वाचण्याची. भाजपही यात मागे कसा राहील? राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हेही या स्पर्धेत उतरलेत. त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातल्या १,१३० मुलींच्या लग्नाची जबाबदारी उचलली आहे. बाकी मणीमंगळसूत्र, आहेराचे कपडे, संसारोपयोगी साहित्य, भोजनखर्च हा सारा शिवसेनेप्रमाणेच कार्यक्रम आहे. अधिक भर म्हणून, जोडप्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. प्रश्न काय आणि आपण त्यावर उत्तरे देतो कोणती? म्हणजे, आधी सामूहिक लग्नांचा बडेजाव, यावर राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा लागणार. पण यातून मूळ प्रश्न संपणार का? हजार मुलींची लग्न लावली, इतरांचं काय? साधेपणातली सामूहिक लग्न, हा महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचा कार्यक्रम का नाही होऊ शकत? एक गाव एक लग्न तिथी, असे उपक्रम राजकीय कार्यकर्ते का नाही सुरू करत?

आजाराच्या मूळ कारणापर्यंत कुणालाच पोहोचायचं नाहीए. ना नेत्यांना, ना त्यांच्या प्रमुखांना. शेतकऱ्यांच्या पोटी जन्मलेल्या प्रत्येक मुलीचा हा आकांत. लग्नाच्या मंडपात तिला दिसणारा, बापाच्या अंत्यविधीचा कार्यक्रम. हे थांबवणं ज्यांच्या हातात आहे त्यांना जाग येणार केव्हा?
मुलीची वरात जाते, आणि... (शेतीमाय)
दीप्ती राऊत

diptiraut@gmail.com